सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 585, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ५३९ मान्य करून एकदा सर्व चुकते करा ना. म्हणजे लोकांत होणारी फजिती तरी वाचेल तुमची. ३ तुकाराम महाराज म्हणतात, यासाठी मला काही तूट सहन करण्याचा प्रसंग येऊ नये असे तू करावेंस. ४ १२२९ नाहीं मागितला । तुम्हां मान म्यां विठ्ठला ॥ १ ॥ जे हे करविली फजिती । माझी एवढी जना हातीं ॥ २ ॥ नाहीं केला पोट । पुढे घालूनि बोभाट ॥ ३ ॥ तुका म्हणे धरूनि हात । नाही नेलें दिवाणांत ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- पोट-पोट भरण्याचा धंदा. अर्थ :- देवा, विठ्ठला, कोणताही मानसन्मान मी तुमच्याजवळ कधी मागितलेला नाही. १ असे असूनही माझी तुम्ही या सर्व लोकांत एवढी फजिती का आरंभिली आहे? २ मी पोट भरण्यासाठी काही धंदा म्हणून हा मार्ग पत्करल्याचा बोभाटा केलेला नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, किंवा देवा, मी कधी तुम्हांला तुमचा हात धरून कधी भांडणासाठी दिवाणातही नेलेले नाही. ४ १२३० तूं पांढरा स्फटिक मणी । करिसी आणिकां त्याहुनि ॥ १ ॥ म्हणोनि तुझ्या दारा । न येत ठकतो दातारा ॥ २ ॥ तुझी ठावी नांदणूक । अवघा बुडविला लोक १ ॥ ३ ॥ तुका म्हणे ज्याचें घेसी । त्यास हेचि दाखविसी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- आणिकां-दुसऱ्यास, नांदणूक-वागणूक, रीत. अर्थ :- देवा, तू खरे म्हणजे पांढऱ्या स्वच्छ स्फटिक मण्याप्रमाणे आहेस व तू जे कुणी दुसरे तुझ्याकडे येतात त्यांनाही तसेच बनवून टाकतोस. १ म्हणून देवा, तुझ्या दारांत कुणीही येत नाही कारण येथे लोक फसले जातात. २ तू सर्व लोकांना बुडविले आहेस, हे आम्हास चांगलेच माहीत आहे ही तुझी रीत सर्वत्र प्रसिद्ध आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, तू कसा आहेस ? तर ज्याचे सेवारूपी कर्ज तू घेतोस, त्यालाच फसविण्याची रीत तू चांगलीच दाखवितोस. ४ १२३१ बोलतों निकुरें । नव्होत सलगीचीं उत्तरें ॥ १ ॥ माझें संतापलें मन । परपीडा ऐकोन ॥ २ ॥ अंगावरि आलें । तोंवरि जाईल सोसिलें ॥ ३ ॥ तुज भक्तांची आण देवा । जरि २ तुका येथें ठेवा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- निकुरें-निकराला येऊन. अर्थ :- देवा, मी फार निकराला येऊन, एकेरीवर येऊन बोलत आहे, हे ध्यानात ठेवा. हे काही प्रेमाच्या सलगीचे बोलणे नाही १ माझे मन आता संतापून गेले असून तुझ्या सेवकांना तू जी पीडा दिली आहेस, ती मला आता ऐकवतही नाही. २ जोपर्यंत केवळ माझ्यावरच घाताचे ओझे होते, तोपर्यंत ते सहन केले; पण आता सर्वांचीच पीडा पाहून मी दुःखी झालो आहे. ३ देवा, या तुकारामास तू जर आहे तिथेच ठेवशील, तर तुला तुझ्या भक्तांची शपथ आहे. ४ विवरण - तुकाराम महाराज देवाशी कधी कधी विशेष सलगी दाखवून, काही मुद्दे काढून, प्रेमाचे भांडण करितात. वरील महत्त्वाच्या अभंगांतून तुकारामबुवांनी भांडणाचा असाच एक मुद्दा उपस्थित केलेला आहे. देव हा आप- ल्याच सेवकांना ठकविणारा, फसविणारा आहे, तो त्यांच्याकडून सेवेचे भांडवल घेतो, पण त्याच्यावर कृपा मात्र करीत नाही देव अशा प्रकारे सर्वांनाच त्रास देतो, मुद्दलही बुडवितो व व्याज देण्यासही हा खळखळ करितो, असे तुकोबांनी १ लौकिक, २ तरी.