सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 590, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंठिकाणी सुख नेहमीच उचंबळून येते ५ तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकाराने पापाजवळ तोटा व पुष्या जवळ, सत्याजवळ फायदा अगदी शेजारी शेजारी अशाच या गोष्टी आहेत ६ १२३८ जळते संचित । ऐसी आहे धर्म नीत ॥ १ ॥ माझ्या विठोबाचे पाय । वेळोवेळा मनीं ध्याय ॥ २ ॥ नेदी कर्म घडो । कोठें आडराणे पडो ॥ ३ ॥ तुका म्हणे मळ । राहो नेदी ताप जाळ ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - धर्मनीत-धर्माची नीती अर्थ - आपले सर्व संचित कर्म जळून जाते अशी या धर्माची नीती आहे १ यासाठीच माझ्या या विठोबाच्या पायाचे चिंतन सतत करीत असावे २ त्यामुळे तुमच्या हातून कधी पापकर्म घडणार नाही, की आडरानातून सापडण्याचाही प्रसंग येणार नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे हे विठ्ठलाचे नाम व त्याचे चिंतन याच्यामुळे तापाचा जाळ व पापाचा मळ राहूच शकत नाही ४ १२३९ संतापाशीं बहु असावे मर्यादा । फलकटाचा धदा उर फोडी ॥ १ ॥ बासर तो भुके गाढवाचे परी । उडे पाठीवरि दड तेणे ॥ २ ॥ समय नेणे ते येडें चाहाटळ । अवगुणाचा ओगळ मान पावे ॥ ३ ॥ तुका म्हणे काय वाया चाळवणी । पिटपिटघाणी हागवणेची ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - फलकटाचा धदा-हलकटपणाचा उद्योग उरफोडी-घात करील बासर-स्वैर, स्वच्छंदी अर्थ - संताच्याजवळ जाताना नेहमी मर्यादेत वागावे, उगाच हलकटपणाचा उद्योग केला तर, त्यापासून घात होण्याचा संभव फार असतो १ स्वैरपणाने बोलणारे आहेत त्यांचे बोलणे म्हणजे गाढवाच्या ओरडण्याप्रमाणेच आहे याचे फळ म्हणजे शेवटी पाठीवर दंडाचे वळच उठलेले दिसतील २ ज्यास प्रसंग समजत नाही तो चावटच समजला पाहिजे तो येडाच असतो त्यास ओंगळ अशा अवगुणाची पदवी मात्र प्राप्त होते ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे त्याचे वागणे उगाच आहे हगवण लागलेल्या पोराची पिटपिटवाणी घाण असते तसेच त्याचे वागणे ओंगळ आहे ४ १२४० घेसी तरी घेई संताची हे भेटी । आणीक ते गोष्टी नको मना ॥ १ ॥ सर्वभावे त्याचे देव भांडवल । आणीक ते बोल न बोलती ॥ २ ॥ करिशील तो करीं संताचा सांगत । आणीक ते मान नको मना ॥ ३ ॥ बैससी तरी बैस संताचे मधीं । आणीक ते बुद्धि नको मना ॥ ४ ॥ जासी तरि जाई संतांचिया गांवा । होईल विसांवा तेथें मना ॥ ५ ॥ तुका म्हणे संत सुखाचे सागर । मना निरंतर धणी घेईं ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - आणीक-दुसऱ्या सांगत-संगत सोवत धणी-तृप्ती अर्थ - मना, तुला भेटच जर घ्यावयाची असेल तर, तू संताची घ्यावीस याखेरीज दुसऱ्या गोष्टीच तू मनात आणू नकोस १ कारण या संताचे सर्व भांडवल म्हणजे तो एक देव झालेला असतो या देवाशिवाय ते दुसरे बोलणे कधीच बोलत नसतात २ मना तुला संगतच जर करायची असेल तर ती संताचीच कर आणखी याखेरीज दुसरी कोणतीच गोष्ट तुला मग करायला नको ३ तुला जर बसायचेच असेल तर तू संतांच्याच मध्य बैस या खेरीज दुसरी कसलीच बुद्धी तुला नको ४ तुला जर गावालाच जायचे असेल, तर तू संतांच्याच गावाला जा तुझा