सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 591, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ५४५ तेथेच खरी विश्रांती लाभेल. ५ तुकाराम महाराज म्हणतात, हे संत म्हणजे सर्वसुखाचे सागर असून त्यांच्यामुळे मनाची निरंतर तृप्ती होते. ६ १२४१ संतांचिये गांवीं प्रेमाचा सुकाळ । नाहीं तळमळ दुःखलेश ॥ १ ॥ तेथें मी राहीन होऊनि याचक । घालितील भीक तेचि मज ॥ २ ॥ संतांचिये गांवीं यरो भांडवल । अवघा विठ्ठल धन वित्त ॥ ३ ॥ संतांचें भोजन अमृताचें पान । करिती कीर्तन सर्वकाळ ॥ ४ ॥ संतांचा उदीम उपदेशाची पेठ । प्रेमसुख साटों घेती देती ॥ ५ ॥ तुका म्हणे तेथें आणिक नाहीं परी । म्हणोनि भिकारी जालों त्यांचा ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- यरो-पुष्कळ, उदीम-व्यापार, परी-प्रकार. अर्थ :- या संतांच्या गावी प्रेमाचा मोठा सुकाळ असतो. त्या ठिकाणी कसली तळमळ असत नाही, की दुःखाचा लेशही उरलेला नसतो. १ त्याच ठिकाणी मी याचक होऊन राहीन तेथे ते मला प्रेमाची भीक घालतील २ संतांच्या गावी श्रीविठ्ठलाचे प्रेम हेच खरे भांडवल आहे. हीच सर्व संपत्ती आहे. ३ संतांच्या घरचे हरिकीर्तनाचे भोजन म्हणजे केवळ अमृताचे पानच होय. कारण ते नेहमीच कथाकीर्तनात दंग झालेले असतात. ४ संतांचा नेहमी व्यापार म्हणजे उपदेशाचाच असतो. ते प्रेमसुखाचीच देवघेव नेहमी करीत असतात. ५ तुकाराम महाराज म्हणतात, त्यांच्या ठिकाणी इतर दुसरे कसलेही प्रकार नसतात. म्हणूनच भिकारी होऊन मी त्यांचा दास झालो आहे. ६ १२४२ संतांचें सुख जालें या देवा । म्हणऊनि सेवा करी त्यांची ॥ १ ॥ तेथें माझा काय कोण तो विचार । वर्णावया पार महिमा त्यांचा ॥ २ ॥ निर्गुण आकार जाला गुणवंत । घाली दंडवत पूजोनियां ॥ ३ ॥ तीर्थे त्यांची इच्छा करिती नित्यकाळ । व्हावया निर्मळ आपणांसी ॥ ४ ॥ अष्टमा सिद्धींचा कोण आला पाड । वार्गो नेदी आड कोणी तया ॥ ५ ॥ तुका म्हणे ते बळिया शिरोमणी । राहिलों चरणीं निकटवासें ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- पार-संपूर्ण, पाड-किंमत. अर्थ :- या संतांच्या संगतीचे सुख देवासही फार मोठे झाले. म्हणून तोच या संतांची सेवा करण्यास उत्सुक असतो. १ अशा या देवाचा संपूर्ण महिमा मी कसा वर्णन करू शकणार ? माझा अधिकार तो किती. २ या भक्तांच्या साठी निर्गुणनिराकार असणारा देव सगुण व साकार झाला. तोच या संतांना दंडवत घालून त्यांची पूजा करीत असतो. ३ सर्व तीर्थे याच संताच्या सहवासाची इच्छा करितात व स्वतःच निर्मल होऊन जातात अनेकांची पापे दूर करण्यात आलेले मलीनत्व तीर्थे या संतांच्या संगतीने धुऊन काढतात. ४ अशा या संतांच्या सामर्थ्यापुढे अष्ट सिध्दींची काय किंमत आहे ? त्यांना कुणी समोर राहू देत नाहीत. ५ तुकाराम महाराज म्हणतात, सर्व बलवंतांमध्ये संत हे बलवान होऊन राहिले आहेत, मी त्यांच्याच चरणापाशी निकटचा गृहून राहिलो आहे. ६ विवरण :- वरील चार अभंगात तुकाराम महाराजांनी संताचा महिमा पुन एकदा मुक्तकंठाने गाइला आहे. संतांचे चरित्र, संतांचा सहवास, संतांचे बोल, संताचा उपदेश, संतांची सेवा, संतांची ईश्वराविषयीची जवळीक व स्वतः ईश्वरासही वाटणारे संताविषयी प्रेम याचा विशेष लोभ सर्वच सज्जनांना वाटत असल्यास नवल नाही. ईश्वराएवढेच महत्त्व भागवत संप्रदायात संतांना दिलेले आहे. इतकेच नव्हे तर तुकारामबुवांनी 'देव सारावे परते । संत पूजावे आरतें' असे म्हटले आहे. कारण 'देव ते संत देव ते संत' असाच त्यांचा निर्णय आहे. या साधुसंताचा व संतसंगतीचा महिमा सर्वच संतानी एकमुखाने वर्णन केलेला आहे. 'संतांचा महिमा कोण जाणे सीमा । सांगता हा तु. गाथा....६९