सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 593, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ५४७ शब्दार्थ व टीपा - भावबळें-भक्तीच्या प्रभावाने, आर्त-इच्छा अर्थ :- देवा, तू भक्ताच्या वळामुळे कसा लहान, सगुण व सुंदर झाला आहेस. याच ध्यानाचे वर्णन यापूर्वी तुझ्या सतमंडळींनी केले आहे. १ देवा, ते ध्यान उचित आहे, असे मला करून दाखवा ना. केशवा, मायवापा, अशी प्रचीती द्या ना तुम्ही २ मग मी डोळे भरून तुम्हास पाहीन व सुखाच्या दोन गोष्टी बोलून संतुष्ट होईन. तुझ्या पायावर आलिंगन देऊन तुला मी मिठीच मारीन मग. ३ मी माझी दृष्टी तुझ्या चरणावर लावून मी नीट न हालता समोर पाहीन, मी तुझ्यापुढे हात जोडून उभा राहीन. ४ तुकाराम महाराज म्हणतात, ही वासना माझी अतिशय उत्कंठित झालेली आहे, म्हणून नारायण, माझी इच्छा तुम्ही पूर्ण करावी ५ १२४५ कृपाळु म्हणोनि बोलती पुराणे । निर्धार वचनें यांचीं मज ॥ १ ॥ आणीक उपाय नेणेचि मी कांहीं । तुझें वर्म ठायीं पडे तैसेँ ॥ २ ॥ नये घड कांहीं बोलतां वचन । रिघालो शरण सर्वभावे ॥ ३ ॥ कृपा करिसी तरि थोडे तुज काम । माझा तरि श्रम बहु हरे ॥ ४ ॥ तुका म्हणे मज दाखवी श्रीमुख । हरेल या भूक डोळियाची ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - निर्धार-विश्वास, हरे-दूर होणार आहेत अर्थ - देवा, तू मोठा कृपाळू आहेस, असे सर्व पुराणे गर्जून सांगतात व माझाही त्याच्या वचनावर विश्वास आहे. १ मी तुझ्या चिंतनाखेरीज दुसरा कुठलाच विचार मनात आणीत नाही तुझे रहस्य जेणेकरून ध्यानात राहील असेच मी पाहतो २ मला तर एक शब्दही नीट घडपणे बोलता येत नाही पण सर्व भावाने मी तुलाच देवा, शरण आलो आहे. ३ देवा, तू जर माझ्यावर कृपा करशील, तर ते फार थोडे काम तुला आहे पण त्यामुळे माझे श्रम मान मोठ्या प्रमाणात दूर होणार आहेत ४ तुकाराम महाराज म्हणतात, श्रीहरी, मला तुमचे श्रीमुख एकदा दाखवा ना. माझ्या डोळ्याची मग तहानभूक हरून जाईल ५ १२४६ सर्वभावे आलों तुजचि शरण । कायावाचामनेंसहित देवा ॥ १ ॥ आणीक दुसरे नये माझ्या मना । राहिली वासना तुझ्या पायीं ॥ २ ॥ माझिये वारचें कांहीं जडभारी । तुजविण वारी कोण एक ॥ ३ ॥ तुझे आम्ही दास आमुचा तूं ऋणी । चालत दूरूनी आले¹ मागें ॥ ४ ॥ तुका म्हणे आतां घेतले धरणे । हिशोबाकारणे भेटी देई ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- जडभारी-मोठे सकट वारी-निवारण करील. अर्थ :- देवा, मी तुला आता कायावाचामनेकरून शरण आलेलो आहे. १ देवा, आता तुझ्याशिवाय दुसरे काहीही मनात येत नाही. माझी सर्व वासना तुझ्याच पायाशी दृष्टी देऊन राहिलेली आहे २ माझ्यावर जर एखादे मोठे संकट आले तर देवा, ते तुझ्याशिवाय दुसरे कोण पूर्ण करणार ? ३ देवा, आम्ही तुझेच दास आहोत, तू आमचा ऋणी आहेस असा हा तुझा व आमचा संबंध पूर्वीपासूनच चालत आलेला आहे ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आता मी तुझ्या दाराशी धरणेच घेऊन बसलो आहे, मागील सर्व ऋणाचा हिशोब पूर्ण करण्यासाठी आता तू मला भेट द्यावीस ५ १२४७ कई मात माझे ऐकती कान । बोलतां वचन संतां मुखीं ॥ १ ॥ केला पाडूरंगें तुझा² अंगीकार । मग होइल धीर माझ्या जीया ॥ २ ॥ म्हणऊनि मुख अवलोकितो पाय । हेचि मज आहे थोरी आशा ॥ ३ ॥ १ आलो, २ माझा