सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 6, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें. तेरा .
या दृष्टीने हे दोन्ही प्रयत्न स्वागताहंच आहेत इंग्रजीत एक म्हणही आहे More the merrier व म्हणूनच मी दोन्ही गाथ्यांना पुरस्कार लिहिण्याचे ठरविले. ह. भ प. शंकर महाराज यांनी आपल्या ' गाथा भाष्यात ' फक्त आरंभाच्या एका अभंगाचा अर्थ देऊन विवरण दिले आहे पुढे मात्र सर्व अभंगाचा अर्थच दिला आहे डॉ जोशी यांच्या ' सार्थ तुकारामगाथा ' या ग्रंथात जास्त माहिती आहे प्रथम अभंग देऊन शब्दार्थ व टीपा दिल्या आहेत, व मग संपूर्ण अभंगाचा अर्थ दिला आहे शब्दार्थ व टीपा दिल्याने कोणत्या शब्दाचा कोणता अर्थ होतो, हे समजण्याची चांगली सोय झाली आहे अर्थ देत असतानाही स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे पण त्यास मदत म्हणून काही अभंगावर अर्थ देऊन विवरणही दिले आहे. हेतू असा की, अर्थाचा खुलासा अधिक व्हावा अभंगाबाबत इतका प्रपंच केल्यामुळे या पहिल्या खंडात सुमारे बाराशे अभंगाचाच विचार झालेला आहे या विवरगामुळे तुकाराम महाराजांचा स्वभाव, अभंगातील विषय मांडण्याची दृष्टी, त्याची सामाजिक, धार्मिक मते, त्याचे तत्त्वज्ञान, यावर प्रकाश पाडण्यास मदत होणारी आहे तुकारामबोवांच्या अभंगाचा, सर्व अभंगाचा अर्थ सर्वांनाच लागेल असे नाही. डॉ जोशी यांनी अभंगाचा अर्थ करताना स्वतंत्र बुद्धीचा, व थोडासा ऐतिहासिक पद्धतीचा उपयोग केला आहे निव्वळ सांप्रदायिक पद्धती जशी थोडी सदोष आहे, तशी संप्रदाय न बघता स्वतंत्र बुद्धीने अर्थ करण्यातही दोष उत्पन्न होण्याचा संभव आहे उदाहरणार्थ, त्याच्या ' बाळो जन मज म्हणोत शिंदळी।' प्रथमचरण, अथवा ' दुजें सकें तरी' ( शेवटचा चरण ) याचे अर्थ पहाण्यासारखे आहेत वस्तुस्थिती अशी आहे की, तुकारामबोवांच्या गाथ्याचा अर्थ करणाऱ्यास संप्रदायाचे ज्ञान व शास्त्रदृष्टी दोन्हीही हवीत. काही काळ तुकोबाच्या गाथ्याची सार्थ प्रत मिळतच नव्हती आता योग असा आला आहे की, दोन वेगवेगळ्या अधिकाराच्या व्यक्तींनी एकाच वेळी आपले अर्थ प्रसिद्ध केले आहेत. यामुळे अभ्यास- वाची सोय चांगली झाली आहे श्रीतुकोबाच्या गाथ्याच्या अभ्यासूस या दोन्ही प्रयत्नाचा उपयोग होऊन त्याला स्वत ला अर्थ ठरवण्यास मदत होईल अशी आशा आहे -- शं. वा. दांडेकर. पुणे २८।२।६६