सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 61, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ३५ ७५ आहाकटा त्याचे करिती पितर । वंशीं दुराचार पुत्र जाला ॥ १ ॥ गळेचि ना गर्भ नव्हेचि का वांज । माता त्याची लाजलाया पापी ॥ २ ॥ परपीडे परद्वारीं सावधान । सादरचि मन अभाग्याचे ॥ ३ ॥ न मिळता निंदा चाहाडी उपवास । संग्रहवे दोष सकळ ही ॥ ४ ॥ परउपकार पुण्य त्या नावडे । विषाचे ते कीडें दुग्धीं मरे ॥ ५ ॥ तुका म्हणे विटाळाचीच तो मूर्ति । दया क्षमा शांति नातळे त्या ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - आहाकटा- अरे देवा असे दुःखाने शब्द दुराचार-वाईट चालीरीतीचा, लाजलाया- वंशाला काळिमा लावणारा, सादर-उत्सुक, नावडे-सहन न होण्याजोग, नातळे-शिवत नाहीत अर्थ - आपल्या कुळातील पुत्र वाईट रीतीचा निघाला आहे असे पाहून स्वर्गातील त्याचे पितरही 'हाय रे देवा' म्हणून शोक करतात १ कुळाला लाज लावणारा, काळिमा लावणारा मुलगा प्रसवून, पापी मुलास जन्म देऊन कष्टी झालेली माता पाहून लोक म्हणतात, ही वांझ का नाही राहिली ? किंवा हिचा गर्भच गळून का नाही गेला ? २ या अभागी मुलाचे मन नेहमी दुसऱ्यास पीडा देण्यासाठी व दुसऱ्याच्या स्त्रीविषयी उत्सुक असते ३ कुणाची निंदा किंवा चहाडी करावयास एखाद्या दिवशी त्रास मिळाली नाही तर यास उपवास घडल्याइतके दुःख होते सगळ्या दोषांचा संग्रह करावा अशी त्याची बुद्धी असते ४ दुसऱ्यावर उपकार करावा अथवा काही पुण्य करावे हे त्याला सहनच होत नाही, विषावर जगणारे किडेच ते त्यांना गोड दुधात टाकल्यास ते मरणारच त्यांना विषच बरे वाटते ५ तुकाराम महाराज म्हणतात, तो केवळ विटाळाचीच, अमंगलाचीच मूर्ती असतो त्याच्या चित्तात दया, क्षमा, शांती हे गुण स्पर्श देखील करणार नाहीत ६ ७६ श्वान शीघ्रकोपी । आपणा घातकर पापी ॥ १ ॥ नाहीं भोड आणि धीर । उपदेश जिरें क्षीर ॥ २ ॥ माणसासि भुके । विजातीने द्यावे थुके ॥ ३ ॥ तुका म्हणे चित्त । मळिण करा तें फजित ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - श्वान-कुत्रे शीघ्रकोपी-लवकर संतापणारा, घातकर-घात करणारा, विजातीने-हलक्या जातीच्या लोकांनी अर्थ - लवकर संतापणारा मनुष्य म्हणजे एक प्रकारचा कुत्राच आपला आपणच तो घात करतो १ तो कुणाची भीड धरत नाही, त्याला कसला धीरही नसतो उपदेशरूपी दूधही त्याच्या अंगी पचत नाही २ दुसऱ्या माणसावर तो नेहमी भुकत असतो, इतर हलक्या लोकांनीही त्याच्यावर थुंकावे अशी मग परिस्थिती निर्माण होते ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा माणसाचे चित्त हे पापी असते, त्याची पुरती फजिती करावी ४ ७७ देखोनि हरखली अड । पुत्र जाला म्हणे रांड ॥ तव तो जाला भाड । चाहाड चोर शिवळ ॥ १ ॥ जाय तिकडे पीडी लोका । जोडी भाडवल थुका ॥ थोर जाला चुका । वर का नाहीं घातली ॥ २ ॥ भूमि कापे त्याच्या भारें । कुंभपाकाचीं शरीरें ॥ निष्ठुर उत्तरें । पाप दृष्टी मळिणचित्त ॥ ३ ॥ दुराचारी तो चांडाळ । पाप सागातें विटाळ ॥ तुका म्हणे खळ । म्हणोनिया निषिद्ध तो ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - हरखली-संतुष्ट झाली अड-गुरुत्व साधक चिन्ह भाड-भांडखोर, कुंभपाक-एक प्रकारचा नरक