सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 72, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें४६ सार्थ तुकारामगाथा लंगोटी । नामा वाळवंटीं कीर्तन करी' म्हणून नामदेवांचे वर्णन आहे. गुणसंकीर्तन, नामसंकीर्तन व लीलासंकीर्तन असे कीर्तनाचे तीन प्रकार प्राचीन काळापासून मानण्यात आले आहेत. भगवान नारदमुनी हे कीर्तनसंस्थेचे आद्य प्रवर्तक होत. भागवतपुराण, नारदपुराण यातून कीर्तनाचे माहात्म्य विस्ताराने वर्णन केले आहे. स्त्रीशूद्रादिकांपर्यंत सर्वांना सुलभ असणारे हे साधन महाराष्ट्रातही लोकप्रिय झाले. नारद, परीक्षिती, ध्रुव, व्यास, वाल्मीकी यांचीही नावे या परंपरेशी निगडित आहेत. नारदाची वीणा आजही कीर्तनकारांना अतिशय प्रिय आहे. नामदेव, ज्ञानदेव, चोखादा, एकनाथ, तुकाराम रामदास या सर्वांनीच कीर्तनावर भर दिला होता. 'नाचू कीर्तनाचे रंगीं । ज्ञानदीप लावू जगीं।' अशी नामदेवांची प्रतिज्ञा आहे. तुकाराम महाराजांचे तर शेकडो अभंग कीर्तनाचा महिमा वर्णन करणारे आहेत 'सोपें धर्म आम्हां सांगितलें संतीं । टाळ दिंडी हातीं घेऊनि नाचा- 'अमृत हें क्षीर हरिकथा माउली । सेवितो सेविली वैष्णवजनीं', 'आनंदें कीर्तन कथा हरी प्रोष । आवडीचा रस प्रेमसुखें' 'कथा देवाचे ध्यान । कथा साधन महन । हृदयाऐसें पुण्य आणिक नाहीं सर्वथा' अशी शेकडो वचने कीर्तनाचे माहात्म्य सांगणारी मिळतात. रामदासांनाही या कीर्तनभक्तीचे मोठे प्रेम होते. 'भगवंतास कीर्तन प्रिय । कीर्तने समाधान होय । बहुन जनांसी उपाय । हरिकीर्तने कलियुगीं' असे सांगून समर्थांनी कीर्तनाचे महत्त्व विशद केले आहे. कलियुगात मान्यता पावलेल्या या कीर्तनभक्तीचा महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणावर आधुनिक काळातही झाला. हरिदासी व वारकरी अशा दोन पद्धती मुख्यतः आज कीर्तनभक्तीच्या दिसतात. नृत्य, संगीत, वाद्य यांच्या साह्याने परमेश्वराचे गुणगान कीर्तनात सामुदायिक रीतीने साधता येते. नमन, स्तवन, सद्गुरुस्मरण झाल्यावर बहुधा तुकारामाचाच अभंग निरूपणास घेऊन तत्त्वज्ञान वा परमार्थ यांचे निरूपण प्रथमार्धात करण्याचा प्रघात आहे. हा झाला पूर्वरंग, आणि उत्तररंगात पहिल्या निरूपणास शोभेल अशा एका भक्ताचे, संताचे समग्र चरित्र कथात्मक पद्धतीने सांगावयाचे असे स्थूल स्वरूप आजही कीर्तनाचे टिकून आहे. ९७ कंठी कृष्णमणी । नाहीं अशुभ ते वाणी ॥ १ ॥ हो का नर १ अथवा नारी । राड तयें नांवे खरी ॥ २ ॥ नाहीं हाती दान । शूरपणाचे काकण ॥ ३ ॥ बाळियेली संतों । केली वोडोनि फजिती ॥ ४ ॥ तुका म्हणे ताळा । नाही त्याची अवकळा ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीका - कंठी-गळ्यात; कृष्णमणी-श्रीकृष्णाच्या नामाचा मणी. बाळियेली-दूर काढल; वोडोनि-हजामत करुन, निकरान टीका करून. ताळा-मर्यादा. अर्थ - ज्याच्या गळ्यात श्रीकृष्ण नामाचा मणी नाही त्याची वाणी कितीही गोड असली तरी अशुभच समजावी. १ मग तो पुरुष असो अथवा स्त्री असो, ती रांड व तो रंड्या अशीच नावे त्यांना शोभून दिसतात. २ ज्याच्या हातात दान देणारे शूरपणाचे कंकण नाही त्याचा काय उपयोग ? ३ अशा स्त्रीपुरुषांना संतांनी आपल्या मेळ्यातून दूर काढले असून त्यांनी त्यांची पुरती फजिती केली आहे. ४ तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचा ताळ सुटला आहे म्हणजे ज्याच्या वागण्यात मुळीच मर्यादा नाही असे झाले आहे त्यास अवकळाच येणार, त्याचा नाश होणार. ५ ९८ माया ब्रह्म ऐसे म्हणती धर्मठक । आपणासरिसे लोक नागविले ॥ १ ॥ विषयीं लपट शिकवी कुविद्या । मनामागे नाद्या होऊनि फिरे ॥ २ ॥ करुनी खातां पाक' जिरे सुरण राई । करिता अतित्याई दुःख पावे ॥ ३ ॥ औषध द्यावया चाळविले बाळा । दावूनिया गुळा दृष्टीपुढें ॥ ४ ॥ तरावया आधीं शोधा देववाणी । वाटत बोलणीं द्वारा त्याचीं ॥ ५ ॥ तुका म्हणे जया पिंडाचे पाळण । न घडे नारायणभेट तयां ॥ ६ ॥ १ पुरुष