सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 73, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंशब्दार्थ व टीपा :- माया-ईश्वरी शक्ती, अविद्या, भ्रम, ब्रह्म-ईश्वर, परमात्मा, जगाचे आदिकारण, मायाब्रह्म याची वरवर एकसारखी चर्चा करून लोकांना फसविणाऱ्या भोंदू गुरूंच्यावर उपरोधाने टीका करण्यासाठी हे शब्द वापरले आहेत, घमंडक-भोंदू लोक, नागविले-लुटले, नांदा-हो हो करणारा नंदीबैल, अतिष्याई-अत्याचार, पंज़िट-फ्रेज, पिंडाचे-शरीराचे. अर्थ:- जगात वरवर दिसणारा जो प्रपंच ती माया व खरे असणारे ब्रह्म अशा भावेत मायाब्रह्माचे भोंदू साधुलोक निरूपण करतात किंवा वरवर दिसणारा मायिक पसारा हेच ते ब्रह्माचे रूप मानतात. असे विवेचन करून ते स्वतःही फसतात व स्वतःप्रमाणेच इतरांनाही फसविततात. १ अशी माणसे केवळ विषयामध्ये आसक्त असतात व लोकांना वाटेल तसा खोटा बोध करतात आणि आपण मात्र स्वतः ओढाळ मनामागे नंदीप्रमाणे होऊन फिरतात. २ कोणतीही गोष्ट नीट रीतीने करायला हवी. नीट स्वयंपाक करून राई व सुरण या दोन्ही वस्तू शिजल्यावर त्या पचतील, पण अत्याचार करून त्या तशाच कच्च्याच खाल्ल्या तर मात्र खाणारास दुःख होईल. ३ कडू औषध द्यायचे असेल तर गुळासारखा गोड पदार्थ पुढे करून लहान मुलाची समजूत घालावी लागते. ४ म्हणून खरोखरी असे आहे की आपणांस तरायचे असेल तर अगोदर वेदवाणी काय आहे ते शोधा, ती समजावून घ्या व अशा भोंदू लोकांची वृथा बोलणी प्रथम दूर करा. ५ तुकाराम महाराज म्हणतात, ज्यांचे केवळ शरीरपोषण हेच एक ध्येय असते त्यांची व ईश्वराची भेट कधीही होणार नाही. ६ विवरण :- भोंदू साधुसंतापासून सावध असावे असे सांगताना तुकाराम महाराज या अभंगात 'तरावया आधी शोधा वेदवाणी' असे सांगतात हे ध्यानात घ्यावयास हवे. भागवत संप्रदाय किंवा वारकरी पंथ जरी गीता- भागवतादी ग्रंथातून आकारास आला असला तरी त्यास वेदांचे व उपनिषदांचे महत्त्व मान्यच आहे. सर्व उपनिषदांचे सार गीतेत आले आहे व त्यावर भागवत धर्माची इमारत उभी आहे वेदविरोधी असे भागवत धर्मात काहीही नाही कालमानाप्रमाणे जातिबंधने व वर्णव्यवस्था यांच्या विचारात थोडाफार बदल संतांनी सुचविला असला तरी वेदांचे महत्त्व त्यांनी अनेकदा मान्य केले आहे 'वेदु स्पृष्टु होय ठावँ । परी कृपणु ऐसा आनु नाहीं' अशी टीका ज्ञानदेवांनी केली असली तरी भाषेपुरती मर्यादित आहे. सर्वांना सुलभ होईल अशा लोकभाषेत परमार्थनिरूपण करावे अशा भूमिकेवर हे लिहिणे आहे. पुढील संतांनी वेदमान्यतेचेच धोरण स्वीकारले आहे. वेदांचेच सार तुकारामांनी 'वेद अनंत घोलिला । अर्थ इतकाचि साधिला ॥ विठोबासी शरण जावें' अशा शब्दांत काढले आहे. 'सकळ शास्त्रांचे हे सार । हैं वेदांचें गव्हार' म्हणून आणखी एका अभंगात बुवांनी वेदगौरव केलेला आहे 'वेदविहित तुम्हीं आइका हो कर्म । योजितों तीं धर्म संतांपुढें' या अभंगात तुकाराम महाराजांनी सर्वांची वेदविहित अशी कर्मे सांगितली आहेत. इतकेच नव्हे तर आपण प्राकृत वाणीच बोलत असू व उच्च कुळात आपला जन्म झाला नसला तरी प्रभुकृपेने आपणास केवढे सामर्थ्य आले आहे याचे वर्णन करताना त्यांनी म्हटले आहे, 'वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा । येरांनी वाहावा भार माथा ।' सारांश, वारकरी पंथातील संतांना अभिमान हा स्पष्ट आहे. एका विशिष्ट सूत्रांत जोडलेल्या परंपरेतून वेदापासूनच भागवत धर्माचा विकास झाला आहे. हा ओघ अखंड आहे. 'हैं धर्मजात आघवे । युगायुगीं म्या रखायें । ऐसा ओघ हा स्वभावें । आद्य असे' अशी ज्ञानेश्वराची साक्ष आहे. ९९ मृगजळ दिसे साचपणा ऐसें । लोटियाचें पिसें ऊर फोडी ॥ १ ॥ जाणोनि कां करा आपुलाले घात । विचार रे हित लवलाहीं ॥ २ ॥ संचित सांगातीं बोळवणें सर्वै । आचरलें द्यावें फळ तेणें ॥ ३ ॥ तुका म्हणे शेखीं स्मशान तोंवरी । संबंध गोवरी अंगो सर्वै ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- मृगजळ-हरिणांना वाटणारा पाण्याचा भास, साचपणा ऐसे-सत्यासारखे, संचित-पूर्वे जन्मीचे कर्म, सांगातीं-बरोबर, शेखीं-शेवटी, आगीसवें-अग्नीबरोबर अर्थ :- मृगजळ हे खरे नसूनही बिचारी हरणे धापा टाकीत टाकीत त्याच्या मागे धावतात, त्यांना ते पाणी खरेच वाटते. १ या प्रमाणे वरवरचा देहादिक प्रपंच खरा नाही असे जाणून आपला घात करण्याचे थांबवा, व