भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 79, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 79

सार्थ तुकारामगाथा ५३ नाव चंद्रभागे तीरीं । उभी पुंडलीकाचे द्वारीं ॥ कट धरुनियां करीं उभाउभी पालवी ॥ ३ ॥ तुका म्हणे फुकासाठीं । पायीं घातली या मिठी ॥ होतो उठाउठी । लवकरीच उतार ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा – पोळें-गर्भात, निघ-निघी, साठा, प्रबोध-उपदेश, जागृति, कट-कटी, पालवी-खुणा- वतो, बोलावतॊ. अर्थ :- एवढा जन्म वाया चालला, अजून तरी डोळे उघड. अजूनही तुला जर काहीच समजले नसेल तर मग तू आपल्या आईच्या पोटीं बरेच दगड म्हणून जन्मलास असे मानणे भाग आहे १ चांगला मनुष्यदेह तुला मिळाला आहे. याच मोलाच्या साठ्यामुळे तुला काय साधावयाचे आहे ते तू साध, असाच बोध संतानी केला असून ते स्वतःही संसार-सागराच्या पलीकडे गेले आहेत २ तुझ्यासाठीं ही नाव पंढरपुरास चंद्रभागेच्या तीरावर पुंडलिकाच्या दारात हात कटीवर ठेवून उभी आहे. ती सर्वांना मोठ्या प्रेमाने आपल्याकडे उभ्या उभ्यानेच बोलावीत आहे, खुणावीत आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, या नावेस काही किंमत मोजावी लागत नाही, ही फुकटच आहे नुसती पायास मिठी घालायी; मग या भवसागरातून पलीकडच्या तीरावर जावयास उशीर काहीच नाही ४ ११२ न करी संग राहे रे निश्चळ । लागो नेदी मळ ममतेचा ॥ १ ॥ या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान । अनुभवावांचून बडवड ते ॥ २ ॥ इंद्रियांचा जय वासनेचा क्षय । संकल्पा¹ ही न ये घरी मन ॥ ३ ॥ तुका म्हणे न ये जाणीव अंतरा । अंतरीं या धारा आनंदाचा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - संग-संगत, निश्चळ-स्थिर, अद्वैत-आपण व ईश्वर, जीव व शिव, आत्मा व परमात्मा एक आहोत ही अनुभूती, क्षय-नाश, जाणीव-मी वेगळा ही दुजेपणाची कल्पना अर्थ :- तू आता इतर कुणाच्याही संगतीत पडू नकोस, अगदी स्थिर रहा तू. कुठल्याही संबंधाचा किंवा ममत्वाचा मळही तू स्वतःस लावून घेऊ नकोस. १ अशा या अवस्थेसच ब्रह्मज्ञान किंवा अद्वैतज्ञान असे नाव असून याची जाणीव अनुभवाखेरीज येणार नाही. अनुभवाशिवाय बोलणे व्यर्थ बडबडच मानावी लागेल २ या अवस्थेत इंद्रियांची विषयाचा जय होऊन वासनेचा नाश होत असतो विविध विषयावरील वासनाची आसक्ती संपते आणि देहादिक वृत्तींचे किंवा बाह्य प्रपंचाचे मनातील संकल्पही संपतात. ३ मी निराळा, मी वेगळा अशी जाणीवच या अवस्थेत मनात उरत नाही. सर्वच आनंदी आनंद याचेच राज्य असते, असे तुकाराम महाराज म्हणतात. ४ ११३ पंढरीचा महिमा । देता आणीक उपमा ॥ १ ॥ ऐसा ठाव नाही कोठें । देव उभाउभी भेटे ॥ २ ॥ आहिति सकळ । तीर्थे काळें देती फळ ॥ ३ ॥ तुका म्हणे पेठ । भूमिवरी हे वैकुंठ ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - ठाव-ठिकाण, काळें-कालांतराने, पुष्कळ काळाने, उभाउभी-ताबडतोब, पेठ-बाजाराचे मुख्य ठिकाण, अर्थ :- पंढरपूरचा महिमा वर्णन करताना दुसरी उपमाच उपयोगी पडत नाही १ कारण या क्षेत्रासारखे ठिकाण इतरत्र कुठेच नाही देव येथे ताबडतोब भेटतो २ बाकीची तीर्थे पुष्कळ असली तरी त्यांचेकडून इष्ट फळ बऱ्याच काळानंतर मिळते ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे पंढरपूर म्हणजे भक्तीचे मुख्य ठिकाण असून हे भूवरचे प्रत्यक्ष वैकुंठच आहे. ४ १ सकल्पा ही धरी न ये मन