भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 84, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 84

५६ सार्थ तुकारामगाथा ११६ देखोनि पुराणिकांची दाढी । रडे फुंदे नाक ओढी ॥ १ ॥ प्रेम खरें दिसे जना । भिन्न अंतरीं भावना ॥ २ ॥ आवरितां नावरे । खुर आठवी नेवरे ॥ ३ ॥ बोलों नये मुखावटां । म्हणें होता व्यांचा तोटा ॥ ४ ॥ दोन्ही सिंगे चारी पाय । खुणा दावी म्हणे होय ॥ ५ ॥ मनां आणितां बोकड । मेला त्याची चरफड ॥ ६ ॥ होता भाव पोटीं । मुखा आलासे शेवटीं ॥ ७ तुका म्हणे कुडें । फळो येतें तें रोकडें ॥ ८ ॥ शब्दार्थ व टीपा :- नावरे-आवरत नाही, नेवरे-पाडरे, फुडें-खोटे अर्थ - या अभंगात हरिदासपुराणिकाच्या कीर्तनात येणारी एक गमतीची पण मोठ्या बोधाची गोष्ट विनोदी पद्धतीने तुकाराम सांगतात. ज्याचा एक लाडका बोकड नुकताच मेला आहे असा धनगर पुराणिक बुवांचे पुराण कसे तन्मयतेने पण एका निराळ्याच अर्थाने समजावून घेत होता त्याचे मोठे गमतीचे वर्णन येथे आहे. पुराणिक बुवांची दाढी पाहताच त्याला स्फुंदून स्फुंदून रडू आले; नाक पुसण्याचा प्रसंग आला लोकांना वाटले काय निरूपणाचा परिणाम ! किती प्रेमळ श्रोता ! त्याच्या मनातील भाव मात्र निराळा होता. नुकताच मेलेला आपल्या दाढीवाला बोकड त्यास आठवला १ त्याच्या मनात खरे प्रेम नव्हते तरी वरवर लोकांना ते खरेच प्रेम वाटले २ त्याला रडे आवरेना. बोकडाचे खूर व नख्या त्याला एकसारख्या समोर दिसत होत्या ३ तो म्हणू लागला, काय सांगू हो ? हा माझा बोकड वियाण्याचा म्हणून राखलेला होता तोच गेला हो. पुराणिकांना एका बीजाचा हा विस्तार असा हे सांगितले तेव्हा त्यास आपल्या 'व्याच्या' बोकडाची आठवण झाली ४ पुराणिक बुवा सांगत होते, एक पुरुष, एक प्रकृती, चार वेद किंवा ईश्वराची चार रूपे तो धनगर बुवांच्या दोन व चार बोटाचा अर्थ मनाशी समजत होता, हो हो माझ्या बोकडास दोन शिंगे होती, चार पाय होते. ५ कारण या धनगराच्या अंतःकरणात मेलेल्या बोकडाचे दुःख होते. त्याचे चित्त पुराणात नव्हतेच ६ जो भाव त्याच्या अंतःकरणात होता तोच शेवटी त्याच्या मुखातून बाहेर पडला. ७ तुकाराम महाराज म्हणतात, अंतःकरणात असणारी खोटी भावना शेवटी केव्हा तरी प्रकट होतेच ८ ११७ दुर्जनाची गांधी विष्ठेचिया परी । देखोनियां दुरी व्हावें तया ॥ १ ॥ अइका हो तुम्ही मात हे सज्जन । करूं संघट्टन नये बोलों ॥ २ ॥ दुर्जनाचे अंगीं अखंड विटाळ । वाणी रजस्वला स्रवे तेशी ॥ ३ ॥ दुर्जनाचें भय धरावें त्यापरी । पिसाळलेवरी धांवे श्वान ॥ ४ ॥ दुर्जनाचा भला नव्हे अंगसंग । बोलिलासे त्याग देशाचा त्या ॥ ५ ॥ तुका म्हणे किती सांगावें पृथक । अंग कुंभीपाक दुर्जनाचें ॥ ६ ॥