सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 85, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ५७ ११८ अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा । ओळखा जातीचा अंत्यज' तो ॥ १ ॥ वेद श्रुति नाहीं ग्रंथ ज्या प्रमाण । श्रेष्ठाचे वचन न मानी जो ॥ २ ॥ तुका म्हणे मद्यपानाचे मिष्टान्न । तैसा तो दुर्जन शिवो नये ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - अतिवादी-वृथा वादविवाद करणारा अर्थ - विनाकारण वितंडवाद करून भांडणारा मनुष्य हा शुद्ध बीजाचा नाही असेच समजावे. तो जातीने अंत्यज म्हणजे महार समजावा १ कारण त्याला वेदांचे किंवा श्रुतींचे वचनच मान्य नसते, श्रेष्ठ माणसांचे वचन तो ऐकत नाही, मानीत नाही २ तुकाराम महाराज म्हणतात, मद्यपानाचे गोड अन्न जसे त्याज्य तसे या दुर्जनास शिवू सुद्धा नये ३ ११९ शब्दा नाहीं धीर । ज्याची बुद्धि नाहीं स्थिर ॥ १ ॥ त्याचे न व्हावे दर्शन । खळा पंगती भोजन ॥ २ ॥ संतास जो निंदी । अधम लोभासाठीं वंदी ॥ ३ ॥ तुका म्हणे पोटीं । भाव अणीक ज्या होंटीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - धीर-एकवाक्यता खळा-दुष्टाच्या होंटीं-ओठात अर्थ - ज्याच्या बोलण्यात एकवाक्यता नाही, निश्चय नाही, त्याची बुद्धीच स्थिर नाही असे समजावे १ त्याचे दर्शनसुद्धा घेऊ नये, की या दुर्जनाच्या पंगतीला जेवण घेऊ नये २ कारण हा दुष्ट मनुष्य संतसज्जनांची निंदा करतो व अधम लोकांची स्तुती करतो त्याची संगतच नको ३ तुकाराम महाराज म्हणतात, त्याच्या पोटात भाव एक व ओठात म्हणजे बोलण्यात दुसराच, त्याचे दर्शनसुद्धा नको १२० चोरे चोरांतें करावा उपदेश । आपुला अभ्यास असेल तो ॥ १ ॥ शिंदळीच्या मार्गे वेचिता पाऊले । होईल आपुले तिच्या ऐसे ॥ २ ॥ तुका म्हणे भितो पुढील्या दत्ता । म्हणऊनि चिंता उपजली ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - शिंदळीच्या-वाईट चालीच्या स्त्रीच्या, दत्ता-पुढे उभे राहिलेल्या, उपजली- निर्माण झाली अर्थ - चोराने चोरालाच उपदेश दिल्यावर तो तरी दुसरा काय देणार? जो त्याचा नित्याचा चोरीचा अभ्यास असेल तोच शिकविणार तो १ एखाद्या वाईट चालीच्या स्त्रीच्या घरी आपण गेलो तर आपण तिच्या- प्रमाणेच होणार २ तुकाराम महाराज म्हणतात, यापुढे आता अशा विपरीत संगतीमुळे पुढे काय काय भयानक स्थिती लोकांची होणार या संबंधी चिंत्ताच वाटू लागली आहे ३ १२१ मांडवाच्या दारा । पुढें आणिला म्हातारा ॥ १ ॥ म्हणे नवरी आणा रांड । जाळा नवऱ्याचे तोंड ॥ २ ॥ समय न कळे । काय उपयोगों ये वेळे ॥ ३ ॥ तुका म्हणे खरा । येथूनिया दूर करा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - खरा-गाढवाला अर्थ - कोणत्या वेळी काय बोलावे हे न समजणाऱ्या लोकांना उद्देशून बुवा म्हणत आहेत एका लग्नात पुढारीपण एका म्हाताऱ्यास दिले मांडवाच्या दारातच त्याला उभे करून व्यवस्था पाहायला सांगितली १ तर १ अधम, २ अगणी तु गा ८