सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 86, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें५८ सार्थ तुकारामगाथा तो प्रसंग न ओळखता वाटेल तसे बडबडू लागला, म्हणाला, त्या रांड नवरीला आणा त्या नवऱ्याचे तोंड जाळा २ त्याच्या मनात नसेल, पण असे अपशब्द या प्रसंगी का तोंडातून काढावचे? यावेळी त्याचा विपरीत परिणामच होणार ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रसंगातून यासारख्या गाढवांना प्रथम दूर करा ४ १२२ काहीं नित्यनेमाविण । अन्न खाय तोचि श्वान ॥ वाया मनुष्यपण । भार वाहे तो वृषभ ॥ १ ॥ त्याचा होय भूमी भार । नेणे यातीचा आचार ॥ जाला दावेदार । भोगवी अघोर पितरांसि ॥ २ ॥ अखंड अशुभ वाणी । खरे न बोलेचि स्वप्नीं ॥ पापी तयाहूनी । आणीक नाहीं दुसरा ॥ ३ ॥ पोट पोसी एकला । भूतीं दया नाहीं ज्याला ॥ पाठीं लागे आल्या । अतिताचे दाराशीं ॥ ४ ॥ काहीं संताचे पूजन । न घडे तीर्थांचे भ्रमण ॥ यमाचा आदण । सीण थोर पावेल ॥ ५ ॥ तुका म्हणे त्यानीं । मनुष्यपणा केली हानी ॥ देवा विसरुनी । गेलीं म्हणता मी माझें ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - वाया-व्यर्थ वृषभ-बैल, यातीचा-जातिकुळाचा, आदण-देणगी, सीण-श्रम, दुख अर्थ - रोज काही तरी नामस्मरण, नित्यपाठ, भजन, गीताभागवतश्रवण यासारखा नित्यनेम न करता जो अन्न सेवन करतो तो कुत्र्याच्या जातीचा मानावा मनुष्यजन्माला येऊन तो वायाच गेला, केवळ बैलाप्रमाणे संसाराचा फुकट भार त्याने वाहिला १ कारण अशा माणसाचा भूमीला फुकट भार होतो, कारण हा आपल्या घराण्याचा काय आचार आहे, कुलाचार आहे, हेच विसरतो, त्यामुळे तो कुळाचाच दावेदार बनलेला असल्याने त्याचे सर्व पितर अघोर अशा नरकातच खितपत पडतात २ त्याची वाणी नेहमी अमंगल असून तो स्वप्नातही चुकून खरे बोलत नाही त्याच्याशिवाय दुसरा कोणीही पापी नाही ३ तो केवळ स्वतःचे पोट भरीत असतो त्याला इतर प्राणिमात्राबद्दल कधीही दया वाटत नाही दाराशी एखादा अतिथि जरी आला तरी त्याच्या पाठीशी लागून तो त्याला पिटाळून लावतो ४ साधुसंतांचे पूजन करावे, तीर्थांचे भ्रमण करावे या गोष्टी त्याला माहितच नसल्यामुळे हा यमाचेच भक्ष्य बनलेला असतो तो एक थोर असो यमाला विनासायास देणगीच मिळते ५ तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारच्या माणसाने सर्व मनुष्यपणाची हानी केली आहे कारण जगच्चालक परमेश्वरास विसरून हा ‘ मी मी, माझे माझे ’ करीत असतो त्याचा जन्म व्यर्थ गेला असेच समजावे ६ १२३ कन्या गो करी कयेचा विकरा । चाडाळ तो खरा तया नावे ॥ १ ॥ गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण । यातिशीं कारण नाहीं देवा ॥ २ ॥ जे जैसे करिती ते तैसे पावती । भोग ते भोगिती केले कर्मी ॥ ३ ॥ आशाबद्ध नये करुं तें करिती । तुका म्हणे जाती नरकामध्वीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - गो-गाय, विकरा-विक्री, कारण-कर्तव्य अर्थ - स्वतःची मुलगी, गाय किंवा क्या याची विक्री पैसे घेऊन जो करतो तो खरोखरीच नावाने चांडाळच होय १ माणसाचे गुण काय किंवा अवगुण काय हे त्याच्या ईश्वरनिष्ठेवरून ठरवायचे, जातीशी येथे काही कर्तव्य नाही जातीवर काही अवलंबून नाही २ जशी कर्मे एखाद्याच्या हातून होतील तशी फळे त्याला प्राप्त होतील व