सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 94, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें६६ सार्थ तुकारामगाथा करों तुज जों करवती । आणिक नामें घेऊं किती ॥ ५ ॥ तुका म्हणे काळा । रीग नाहीं निघती ज्याळा ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- चाल-चल, समज, कोडी-कोटी, जमान-जामीन, रीग-प्रवेश. अर्थ :- अनेक वेळा विठ्ठल विठ्ठल असे नामस्मरण कर; चल, ताबडतोब दुष्कर्मांतून मोकळा होशील. १ जवळ राहणारे असे एकही पाप तुझे नामस्मरण सुरू होतांच उरणार नाही. २ पंचमहापातकांची पापे केवढीही, कोट्यावधी जरी केलीस तरी ती एका नामस्मरणाने एका क्षणात जळून जातील. ३ मागे काही पापे तू केली असशील, पण त्यांत आता तू राहू नकोस, त्या सर्वांच्याबद्दल मी फार तर जामीन राहीन. ४ तुला हवीत तेवढी तू पापे कर; किती पापांची नांवे घेऊ मी ? ती सर्व तू कर. ती सर्व सपतील. ५ तुकाराममहाराज म्हणतात, ती सर्व पापे जळून भस्म होतील कारण हरिनामात प्रत्यक्ष यमालाही प्रवेश नाही. पापांचीही ज्वालात राख होऊन जाईल ६ १३५ बाळ बापा म्हणे काका । तरी तो कां निरपराध ॥ १ ॥ जैसा तैसा भाव गोड । पुरवी कोड विठ्ठल ॥ २ ॥ साकरेसि म्हणतां धोंडा । तरी कां तोंडा न रुचे ॥ ३ ॥ तुका म्हणे आरुष बोल । नव्हे फोल आहाच ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- आरुष-कठिण, दुर्बोध, आहाच- व्यर्थ, निष्फळ अर्थ :- एखाद्या लहान मुलाने चुकून वडिलात काका म्हटले तर काही बिघडत नाही; त्यामुळे बाप काही परका होत नाही. १ तसेच भक्ताने थेटेवाकडे नाव परमेश्वराचे घेतले तरी बिघडणार नाही, त्यातील भाव पाहून ईश्वर त्याचे मनोरथ पूर्ण करतो. २ साखरेस धोंडा म्हटले तर काही तिची गोडी तोंडाला कमी लागत नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, भक्ताचे बोल ओबडधोबड, दुर्बोध असले तर ते काही व्यर्थ ठरत नाहीत, वाया जात नाहीत. ते परमेश्वरास अधिक आवडतात. ४ १३६ चित्तीं नाहीं तें जवळीं असोनि काय । वत्स सांडी माय तेणें न्यायें ॥ १ ॥ प्रीतीचा तो वायु गोड लागे मात । जरी जाय चित्त मिळोनियां ॥ २ ॥ तुका म्हणे अवघे फिके भावाविण । मीठ नाहीं अन्न तेणें न्यायें ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- वायु-लहर, मात-गोष्ट. अर्थ :- आपल्या मनातच नाही ते अगदी जवळ असून काय उपयोग ? एखादे मोठे वासरू रात्रदिवस आपल्या आईजवळ असले आणि आईच्याच मनात प्रेम नसले तर काय त्या जवळ असण्याचा उपयोग ? १ पण दोघाचे चित्त जर एकमेकात मिळून गेले असेल तर मात्र प्रीतीच्या संभाषणांच्या वाऱ्याची लहर किंवा झुळूक गोड लागेल. २ तुकाराम महाराज म्हणतात, सर्व काही एका भावनेशिवाय फिके असून सुग्रास अन्नात मीठ नसल्यामुळे ते जसे बेचव होते तशीच अवस्था भावाशिवाय जीवनाची होते. ३ १३७ काय काशी करिती गंगा । भीतंरि चांगा नाहीं तो ॥ १ ॥ अधणीं कुचर बाहेर तैसा । नये रसा पाकासि ॥ २ ॥ काय टिळे करिती माळा । भाव खळा नाहीं त्या ॥ ३ ॥ तुका म्हणे प्रेमें विण । बोले भुंके अवघा शीण ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- भीतरि-अंतरगात, चांगा-चांगले, कुचर-कठिण दाणा. अर्थ :- जर अंतरंग शुद्ध नसेल तर बाहेरच्या काशीयात्रेचे व गंगास्नानाचे काय महत्त्व ? मनच जर चांगले नसेल तर काशी व गंगा याचा काही उपयोग नाही: १ एखादा कठिण दाणा अधणात शिजविला तरी तो तसाच टणक