श्रीमद्भगवद्गीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र (लोकमान्य बाल गंगाधर तिलक)

श्रीमद्भगवद्गीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र (लोकमान्य बाल गंगाधर तिलक)
Srimad Bhagavad Gita Rahasya by Bal Gangadhar Tilak
लोकमान्य बाल गंगाधर तिलक द्वारा
DevanagariHindipublished956 पृष्ठ
पृष्ठ 47, कुल 956 में से
संदर्भ में पढ़ेंपृष्ठ 47
॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॐ तत्सत् .
- श्रीमद्भगवद्गीता-रहस्य - अथवा
- कर्मयोग-शास्त्र. - प्रकरण १ लें. विषय प्रवेश . नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम्। देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् ॥ महाभारत - आदिपर्व श्रीमद्भगवद्गीता हा आमच्या धर्मग्रंथांपैकीं एक अत्यंत तेजस्वी व निर्मल हिरा आहे. पिंडब्रह्मांडज्ञानपूर्वक अध्यात्म- शास्त्राचीं पवित्र तत्त्वें थोडक्यांत पण असंदिग्ध रीतीनें सांगून, त्यांच्याच आधारें, मनुष्यमात्रास या प्रपंचांत, आध्यात्मिक दृष्टीने, नेहमीं म्हणजे परम पुरुषार्थाची ओळख पटवून देणारा व त्या अनुरोधानें आपापलीं संसारांतील कर्तव्यकर्मे आचरण्याचा मार्ग दाखविणारा, ऐहिक व पारलौकिक कल्याणाचा असा अपूर्व समन्वय करणारा ग्रंथ संस्कृत वाङ्मयांत किंवा जगांतील इतर वाङ्मयांत देखील सांपडणें दुर्मीळ होय. केवळ काव्यदृष्टीनें जरी या...