छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)
Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj
के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा
पृष्ठ 18, कुल 127 में से
संदर्भ में पढ़ेंकी, “शहाजीने निजामशहाचा एक नातलग हाती धरून त्याला निजामशाहीतील एका बळकट गडावर नेऊन ठेवले आणि स्वातंत्र्य पुकारले.” यावरून असे स्पष्ट दिसते की नाममात्र बादशहा गादीवर बसवून शहाजीला स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची महत्त्वाकांक्षा असावी. स्वतंत्र झाल्यावर आणि आपली बाजू बळकट झाल्यावर महत्त्वाकांक्षी शहाजीची नजर दौलताबाद किल्ल्याकडे वळली. कारण हा किल्ला ताब्यात आला तर शहाजीचा मोठा फायदा होणार होता. आपल्या पूर्वजांचे मूळ गाव असलेले वेरूळ आणि मराठवाड्याचा बराचसा प्रदेश शहाजीच्या वर्चस्वाखाली येणे शक्य होते. यावेळी दौलताबादचा किल्ला फतेखानाच्या ताब्यात होता. आदिलशाहाच्या मदतीने दौलताबादचा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न शहाजीने सुरू केला. शहाजीच्या हालचाली पाहून फतेखानाने मुघल सरदार महाबतखान यास दौलताबादचा किल्ला ताब्यात घेण्यासाठी बोलाविले. महाबतखानाने जून १६३३ मध्ये दौलताबादचा किल्ला जिंकला. फतेखानाने शरणागती पत्करली. निजामशाहीचा नामधारी वारस मुघलांच्या ताब्यात आला. शहाजहानने या नामधारी वारसाची हुसेनशहाची रवानगी ग्वाल्हेरच्या किल्ल्यावरील तुरुंगात केली. अशाप्रकारे निजामशाही पूर्णपणे संकटात आली. तरीपण हताश न होता निजामशाही वाचविण्याचा प्रयत्न शहाजीने सुरू ठेवला. शहाजीची ही झुंज जवळजवळ ३ वर्षे चालू होती. शेवटी प्रत्यक्ष शहाजहान बादशहाला शहाजीचा पाडाव करण्यासाठी दक्षिणेत यावे लागले. शेवटचा लढा दौलताबाद मुघलांच्या ताब्यात गेल्यावर जुन्नरच्या गडावर बंदोबस्तात ठेवलेल्या निजामशाहीच्या वारसास शहाजीने नगर जिल्ह्यातील पेमगड या ठिकाणी ठेवले. आदिलशाहाकडून मुरारपंत आणि मातब्बर सरदार रणदुल्लाखान शहाजीच्या मदतीसाठी आले. आदिलशाहा व शहाजी एकत्र आलेले पाहून शहाजहानला चिंता वाटू लागली. या सुमारास आदिलशाहीच्या दरबारातच सुंदोपसुंदी सुरू झाली. खवासखान आणि मुस्तफाखान या दोन सरदारांमध्ये संघर्ष सुरू झाला. त्यात खवासखानने आपल्या रक्षणासाठी उत्तरेतून शहाजहान बादशहाला बोलविले. जानेवारी १६३६ मध्ये शहाजहान नर्मदा ओलांडून दक्षिणेमध्ये आला. निजामशाही नष्ट करण्याचा त्याचा अंतस्थ हेतू होता. दक्षिणेत येताच त्याने कुतूबशहास सामोपचाराने आपल्याकडे वळविले. आदिलशाहाच्या १२ छत्रपती शिवाजी महाराज