सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 343, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ३०९ ६२८ कोण सुख धरोनि संसारीं । राहों सांग मज वा हरी ॥ अवघ्या नाशवंता परी । थिता दुरी अंतरसी ॥ १ ॥ प्रथम केला गर्भी वास । काय ते सांगावे सायास । दुःख भोगिले नव ही मास । आलों जन्मास येथवरी ॥ २ ॥ बाळपण गेलें नेणतां । तारुण्यदशे विषयव्यथा । वृद्धपणीं प्रवर्त्तली चिंता । खरें मागुता जन्म धरूं ॥ ३ ॥ क्षण एक तो ही नाहीं विसावा । लक्ष चौऱ्यांशी घेतल्या धांवा । भोवंडिती पाठीं लागल्या हांवा । लागो आगी नांवा माझ्या मीपणा ॥ ४ ॥ आतां पुरे ऐसी भरोवरी । रंक होऊनि राहेन द्वारीं । तुझा दास मो दीन कामारी । तुका म्हणे करीं कृपा आतां ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- थिता-जवळ स्थिर असलेला, भरोवरी-धम अर्थ :- श्रीहरी, या संसारामध्ये मी कोणते सुख मानून राहू रे ? तू साग एकदा ना. येथील सर्व सुखें नाशवंत आहेत. तू एक जवळ स्थिरपणे उभा होतास तोही दूर होतोस अंतरतोस. १ प्रथम मी आईच्या गर्भात निवास केला. तेथील कष्ट काय सांगावेत ? नऊ महिने परिपूर्ण असे मी दुख भोगले आणि मग कसा तरी या जन्मास आलो. २ सर्व बालपण काही न कळताच गेले. तरुणपणी विषयचिंतनाचा आयुष्य गेले. म्हातारपणी आता कसे होणार या चिंतेने मी ग्रासून गेलो. बरे मरून मोकळे व्हावे तर पुनः जन्म आहेच. ३ या संसारात एका क्षणा- चाही विसावा नाही. चौऱ्यांशी लक्ष जन्माच्या खेपा केल्या तरी, जी हाव पाठीशी लागली आहे ती काही केल्या संपत नाही. माझ्या या देहपणाच्या जाणिवेस आग लागो व ती नष्ट होवो. ४ पण देवा, आता हे थम पुरेत. दरिद्री होऊन मी तुझ्या दारात उभा राहीन. वाटेल ती कामे करणारा मी तुझा दास होईन. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आता मजवर कृपा करा ना एकदा. ५ ६२९ सुख या संतसमागमें । नित्य दुणावे तुझिया नामें । दहन होती सकळ कर्में । सर्वकाळ प्रेमें डुलतसों ॥ १ ॥ म्हणोनि नाहीं कांहीं चिंता । तूंचि आमुचा मातापिता । बहिणी बंधु आणि चुलता । आणिकां गोतां सर्वांठायीं ॥ २ ॥ ऐसा हा कळला निर्धार । माझा तुज न पडे विसर । अससी देउनियां धीर । बाह्य अभ्यंतर मजजवळ ॥ ३ ॥ दुःख तें कैसें नये स्वप्नासी । भुक्षितमुवित जात्या कामारी दासी । त्याचें वर्म तूं आम्हापाशीं । सुखें राहिलासी प्रेमाचिया ॥ ४ ॥ जेथें तझ्या कीर्तनाचा घोष । जळती पापें पळती दोष । काय तें उणें आम्हां आनंदास । सेवून ब्रह्मरस तुका म्हणे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- संतसमागमें-संताच्या सहवासाने, दहन-नष्ट, कामारी-काम करणान्या. अर्थ :- देवा, या संतांच्या सहवासात काय सुख आहे म्हणून सांगू ? तुझ्या नामाने तर ते नित्य दुपटीने वाढत राहते. सर्व कर्मे त्यामुळे नष्ट होऊन जातात. जळून जातात. त्यामुळे मी मोठ्या प्रेमात व तुझ्या नाम- स्मरणात डुलत असतो. १ म्हणून देवा, आता मला कसलीही चिंता उरलेली नाही तूच आता आमची माता, आमचा पिता, बंधू, चुलता, आमची बहीण सर्व काही तूच आहेस देवा. सर्व नातेवाईकही तूच आहेस. २ आता