भारतकोश
संग्रह पर लौटें

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

सार्थ तुकारामगाथा ३०९ ६२८ कोण सुख धरोनि संसारीं । राहों सांग मज वा हरी ॥ अवघ्या नाशवंता परी । थिता दुरी अंतरसी ॥ १ ॥ प्रथम केला गर्भी वास । काय ते सांगावे सायास । दुःख भोगिले नव ही मास । आलों जन्मास येथवरी ॥ २ ॥ बाळपण गेलें नेणतां । तारुण्यदशे विषयव्यथा । वृद्धपणीं प्रवर्त्तली चिंता । खरें मागुता जन्म धरूं ॥ ३ ॥ क्षण एक तो ही नाहीं विसावा । लक्ष चौऱ्यांशी घेतल्या धांवा । भोवंडिती पाठीं लागल्या हांवा । लागो आगी नांवा माझ्या मीपणा ॥ ४ ॥ आतां पुरे ऐसी भरोवरी । रंक होऊनि राहेन द्वारीं । तुझा दास मो दीन कामारी । तुका म्हणे करीं कृपा आतां ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- थिता-जवळ स्थिर असलेला, भरोवरी-धम अर्थ :- श्रीहरी, या संसारामध्ये मी कोणते सुख मानून राहू रे ? तू साग एकदा ना. येथील सर्व सुखें नाशवंत आहेत. तू एक जवळ स्थिरपणे उभा होतास तोही दूर होतोस अंतरतोस. १ प्रथम मी आईच्या गर्भात निवास केला. तेथील कष्ट काय सांगावेत ? नऊ महिने परिपूर्ण असे मी दुख भोगले आणि मग कसा तरी या जन्मास आलो. २ सर्व बालपण काही न कळताच गेले. तरुणपणी विषयचिंतनाचा आयुष्य गेले. म्हातारपणी आता कसे होणार या चिंतेने मी ग्रासून गेलो. बरे मरून मोकळे व्हावे तर पुनः जन्म आहेच. ३ या संसारात एका क्षणा- चाही विसावा नाही. चौऱ्यांशी लक्ष जन्माच्या खेपा केल्या तरी, जी हाव पाठीशी लागली आहे ती काही केल्या संपत नाही. माझ्या या देहपणाच्या जाणिवेस आग लागो व ती नष्ट होवो. ४ पण देवा, आता हे थम पुरेत. दरिद्री होऊन मी तुझ्या दारात उभा राहीन. वाटेल ती कामे करणारा मी तुझा दास होईन. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आता मजवर कृपा करा ना एकदा. ५ ६२९ सुख या संतसमागमें । नित्य दुणावे तुझिया नामें । दहन होती सकळ कर्में । सर्वकाळ प्रेमें डुलतसों ॥ १ ॥ म्हणोनि नाहीं कांहीं चिंता । तूंचि आमुचा मातापिता । बहिणी बंधु आणि चुलता । आणिकां गोतां सर्वांठायीं ॥ २ ॥ ऐसा हा कळला निर्धार । माझा तुज न पडे विसर । अससी देउनियां धीर । बाह्य अभ्यंतर मजजवळ ॥ ३ ॥ दुःख तें कैसें नये स्वप्नासी । भुक्षितमुवित जात्या कामारी दासी । त्याचें वर्म तूं आम्हापाशीं । सुखें राहिलासी प्रेमाचिया ॥ ४ ॥ जेथें तझ्या कीर्तनाचा घोष । जळती पापें पळती दोष । काय तें उणें आम्हां आनंदास । सेवून ब्रह्मरस तुका म्हणे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- संतसमागमें-संताच्या सहवासाने, दहन-नष्ट, कामारी-काम करणान्या. अर्थ :- देवा, या संतांच्या सहवासात काय सुख आहे म्हणून सांगू ? तुझ्या नामाने तर ते नित्य दुपटीने वाढत राहते. सर्व कर्मे त्यामुळे नष्ट होऊन जातात. जळून जातात. त्यामुळे मी मोठ्या प्रेमात व तुझ्या नाम- स्मरणात डुलत असतो. १ म्हणून देवा, आता मला कसलीही चिंता उरलेली नाही तूच आता आमची माता, आमचा पिता, बंधू, चुलता, आमची बहीण सर्व काही तूच आहेस देवा. सर्व नातेवाईकही तूच आहेस. २ आता

३१० सार्थ तुकारामगाथा हा विचार निर्धाराने मला समजला आहे. देवा, तुला माझा विसर कधीच पडणार नाही, हेही मला पक्के माहीत आहे. तू मला धीर देऊन सदैव जवळच असतोस. अंतर्बाह्य स्वरूपात तूच माझ्याजवळ असतोस. ३ दुःख कसे असते ते स्वप्नातही मला दिसत नाही. मुक्ती व भोगवृत्ती या काम करणाऱ्या दासी होऊन राहिल्या आहेत. त्या सर्वांचे रहस्य तुझ्यात असून तू तर प्रेमाच्या सुखासाठी आम्हाजवळ राहिला आहेस. ४ ज्या ठिकाणी तुझ्या कीर्तनाचा नित्य घोष असतो, तेथे सर्व पापे जळून नष्ट होतात. मग आमच्या आनंदास कमतरता कसली ? तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही मोठ्या प्रीतीने या ब्रह्मरसाचे, ईश्वराच्या ऐक्याचे सेवन करू. ५ ६३० देवा तूं आमचा कृपाळ । भक्तप्रतिपाळ दीनवत्सळ । माय तूं माउली स्नेहाळ । भार सकळ चालविसी ॥ १ ॥ तुज लागली सकळ चिंता । राखणें लागे वांकडें जातां । पुढती निरविसी संतां । नव्हे विसंबतां धीर तुज ॥ २ ॥ आम्हां भय चिंता नाहीं धाक । जन्म मरण कांहीं एक । जाला इहलोकीं परलोक । आलें सकळिकवैकुंठ ॥ ३ ॥ न कळे दिवस कीं राती । अखंड लागलीसे ज्योती । आनंदलहरीची गती । वर्णू कीतीं तया सुखा ॥ ४ ॥ तुझियां नामाचीं भूषणें । तों ये मज लेवविलीं लेणें । तुका म्हणे तुझियान गुणें । काय तें उणें एक आम्हां ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- कृपाळ-कृपाळू, प्रतिपाळ-सांभाळ. अर्थ :- देवा, तू आमच्याविषयी फार कृपाळू आहेस रे भक्तांचा सांभाळ करणारा तू दीनवत्सल आहेस तू मोठी स्नेहाळ अशी माउली आहेस. आमचा सर्व भार तू घेतला आहेस १ आमची सर्व चिंता देवा, तुलाच लागली आहे. आमचे पाऊल वाकडे पडले तर तूच आमचे त्यावेळी रक्षण करितोस. मग पुढे तू आम्हास संतांच्या स्वाधीन करतोस आम्हाला दूर लोटण्यास तुला धीर कसा होणार ? २ त्यामुळे आता आम्हाला भय नाही की कसली चिंता नाही कसलाही धाक नाही जन्ममरणाविषयी काळजी नाही इहलोक व परलोकही आम्हास एकसारखाच झाला. सर्व ठिकाणे आम्हास वैकुंठाप्रमाणेच झाली. ३ दिवस आहे की रात्र आहे, हेही आम्हास समजेनासे झाले आहे. तुझ्या नामस्वरूपाची अखंड ज्योत अंतःकरणात लागली आहे या आनंदलहरींचे वर्णन देवा, मी करू तरी किती? या सुखाचे वर्णन किती करावे ? ४ देवा, तुझ्या नामाच्या भूषणाचे अलंकार तू मला घातले आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्यामुळे आम्हास काहीही कमी पडणारे नाही. ५ ६३१ न पवे सन्निध वाटते चिंता । वरि या बहुतांची सत्ता । नुगवे पडत जातो गुंता । कर्मा बळिवंता सांपडलो ॥ १ ॥ बहु भार पडियेला शिरीं । मी हें माझें मजवरी । उघडचा नागविलो चोरीं । घरिच्याघरीं जाणजाणतां ॥ २ ॥ तुज मागणें इतुले आतां । मज या निरवावें संतां । जाला घंटस्फोट आळवितां । उदास आतां न करावें ॥ ३ ॥ अति हा निकट समय । मग म्यां करावे तें काय । दिवस गेलिया ठाकील छाय । उरेल हाय रातिकाळीं ॥ ४ ॥

होईल संचिताची सत्ता । अंगा येईल पराधीनता । ठाव तो न दिसे लपतां । बहुत चिंता प्रवर्तली ॥ ५ ॥ ऐसी या संकटाची संधी । धांव घालावी कृपानिधी । तुका म्हणे माझी बळबुद्धी । सकळ सिद्धी पाय तुझे ॥ ६ ॥

शब्दार्थ व टोपा :- पवे-पावत नाही, ठाकील-येईल, छाव-अंधार, संधी-काळी.

अर्थ :- देवा, तुझी जयलोक प्राप्त होत नाही म्हणून मला फारच चिंता वाटत आहे रे. या माझ्या देहावर व प्रपंचाच्या वृत्तींवर पुष्कळांची सत्ता आहे. या बंधनांतून सुटका करवून घेण्याचा मी फार प्रयत्न करतो, पण मी त्यांत जास्त जास्तच गुंतत जातो. बलाढ्य अशा कर्मसत्तेच्या तावडीत मी सापडतो. १ माझ्या मस्तकावर पुष्कळच ओझे आहे. मी हा, हा देह माझा या भावनेमुळे या चोरामुळे मी नागवून उघडा झालो आहे. घरच्या घरीच असूनही माझी अशी अवस्था झाली आहे. २ देवा, तुला मागणे फक्त आता इतकेच आहे. मला तू या संतांच्या स्वाधीन करावेस. तुला विनविता विनविता माझा घसा फुटण्याची वेळ आली. मला आता निराश करु नकोस. ३ आता ही वेळही फार बिकट व कठिण आहे. यावेळी मी आता काय बरे करावे ? आयुष्याचे दिवस संपतील व संध्याकाळचा अंधार दाटून येईल आणि मग भयाण अंधाराचेच राज्य सुरु होईल. ४ मग संचित कर्माचीच सत्ता सुरू होईल. मग मी पराधीन होऊन बसेन. कुठे लपून बसावे तरी मला जागा सापडणार नाही. फारच चिंता त्यावेळी निर्माण होईल. ५ अशा या संकटाच्या वेळी हे कृपेच्या सागरा, तू धावून ये. तुकाराम महाराज म्हणतात, माझे सर्व बळ, सर्व बुद्धी, सर्व सिद्धी यांना मी तुझ्याच पायांवर समर्पित केले आहे. ६

६३२ आतां धर्माधर्मी कांहीं उचित । माझें विचारावें हित । तुज मी ठाउका पतित । शरणागत परि जालों ॥ १ ॥ येथें राया रंका एकी सरी । नाहीं भिन्नाभिन्न तुमच्या घरीं । पावलों पाय भलत्या परी । मग बाहेरी न घालावें ॥ २ ॥ ऐसें हें चालत आलें मागें । नाहीं मी बोलत वाउगें । आपुलिया पडिल्या प्रसंगें । कीर्ति हे जगें वाणिजेते ॥ ३ ॥ घालोनियां माथां बैसलों भार । सांडिला लौकिक वेव्हार । आधीं हे विचारिली धार । अविनाश पर पद ऐसें ॥ ४ ॥ येयें एक वर्म पाहिजे धीर । परि म्यां लेखिलें असार । देह हें नाशवंत जाणार । धरिलें सार नाम तुझें ॥ ५ ॥ केली आराणूक सकळां हातीं । धरावें धरिलें तें चित्तीं । तुका म्हणे सांगितलें संतीं । देईं अंतीं ठाव मज देवा ॥ ६ ॥

३१२ सार्थ तुकारामगाथा राहिलो आहे. सर्व लौकिक व्यवहारही सोडून दिला आहे. आपल्या अविनाशी स्वरूपाचा विचार आधी करूनच मी तुमचा आश्रय घेतला आहे. ४ या ठिकाणी धैर्य हे एकच धर्म जाणावयास हवे. या धैर्याच्या बळावर मी हा माझा देह नाशवंत व न टिकणारा आहे असाच मानला. तुझे नाम हेच एक जीविताचे सार मी मानले. ५ सर्व लौकिक वृत्तींच्याकडून सुटका करून घेऊन मी विश्रांतीस पावलो आहे. चित्तात जे धरावयास हवे ते धरले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जे संतांनी सांगितले तेच मी केले. आता मला जपवेस देवा, तू आश्रय द्यावास. ६ ६३३ बरवें झालें आलों जन्मासी । जोड जोडिली मनुष्य देहा ऐसी । महा लाभाची उत्तम रासी । जेणें सुखासी पात्र होईजे ॥ १ ॥ दिलीं इंद्रियें हात पाय कान । डोळे मुख बोलावया वचन । जेणें तूं जोडसी नारायण । नासे जीवपण भवरोग ॥ २ ॥ तिळेंतीळ पुण्य सांचा पडे । तरि हें बहुतां जन्मीं जोडे । नाम तुझें वाचेसी आतुडे । समागम घडे संतांचा ॥ ३ ॥ ऐसिये पावलिलों ठायीं । आतां मी काई हों उतराई । येवढा जीव ठेवीन पायीं । तूं माझें आई पांडुरंगे ॥ ४ ॥ फेडियेला डोळियांचा कवळ । धुतला गुणदोषांचा मळ । लावूनि स्तनीं केलों सीतळ । निजबिलों बाळ निजस्थानीं ॥ ५ ॥ नाहीं या आनंदासी जोडा । सांगतां गोष्टी लागती गोडा । आला आकारा आमुच्या चाडा । तुका म्हणे भिडा भक्तीचिया ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- आतुडे-प्राप्त होते, येते, कवळ-दोष, चाडा-लोभासाठी अर्थ :- बरे झाले; मी या नरजन्मास आलो. हा एक फार मोठा लाभच मला झालेला आहे. यायोगे ईश्वरसान्निध्याच्या सर्व सुखांचा लाभ मला घेता येईल. १ ईश्वराने मला हात, पाय, कान, डोळे, मुख इत्यादी इंद्रिये दिली आहेत यांच्या उपयोगाने नारायणा, मला तुझी प्राप्ती होईल व मला जीवपणाचा व भवरोगाचा जो रोग लागला आहे तो नाहीसा होईल. २ यामुळे तिळतिळ असा पुण्याचा साठा हातून होईल व बहुत जन्मांच्या संचिताने तुझ्या नामाची जोड माझ्या वाचेस प्राप्त होईल. ३ अशा या महत्त्वाच्या ठिकाणी देवा, तुम्ही मला आणले आहे. आता याचा उतराई मी होऊ तरी कसा ? पण पांडुरंगा, तू माझी माउली असल्याने मी माझा एवढा जीव जरी तुझ्या पायी अर्पण केला तरी तो थोडाच होईल. ४ देवा, तू माझ्या डोळ्यांचा दोष नाहीसा केलास, अंतःकरणा- तील गुण-दोषांचा मळ तू धुऊन काढलास आणि तू प्रेमाने मला स्तनपान देऊन तृप्त केलेस, व या बालकाला आपल्या हृदयाशी झोपविलेस. ५ या अलौकिक आनंदास दुसरी जोडच नाही. याची नुसती हकीकत सांगताना सुद्धा गोड लागते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही आमच्या लोभासाठी व आमच्या भक्तीच्या कौतुकासाठी तू या सगुण आकारास आला आहेस. ६ ६३४ अल्प भाव अल्प मती । अल्प आयुष्य नाहीं हातीं । अपराधाची वोथिलों मूर्ती । अहो वेदमूर्ती परियेसा ॥ १ ॥ किती दोषा देऊं परिहार । गुणदोषे मळिलें अंतर । आदि वर्तमान भविष्याकार । गेला अंतपार ऐसें नाही ॥ २ ॥ विविध कर्म चौऱ्यांशी फेरा । त्रिविध भोग या शरीरा । कर्मकोठार पांजरा । जन्मजरामरणसांठवण ॥ ३ ॥

सार्थ तुकारामगाथा ३१३ जीवा नाहीं कुडीचें लाहातें । ये भिन्न पंच भूतें । रचतें खचतें संचितें । असार रितें फलकट ॥ ४ ॥ पुत्र पत्नी सहोदर । मायबाप गोताचा पसर । मिळतां काष्ठें लोटतां पूर । आदळों दूर होती खळाळों ॥ ५ ॥ म्हणोनि १नासावें अज्ञान । इReport/इतुलें करीं कृपादान । कृपाळु तूं जनार्दन । धरूनि चरण तुका विनवी ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- वोळिलों-बनलो, अंतर-अंत करण, लाहातें-संबध, पसर-पसारा, खळाळों-लाटा अर्थ :- अहो वेदमूर्ती देवा, माझी बुद्धी फार अल्प असून तुमच्या विषयी भावही थोडा आहे माझे आयुष्य थोडे असून जे आहे तेही माझ्या स्वाधीन नाही. मी तर अनंत अपराधाची मूर्तीच बनलो आहे. तरी माझी एक विनंती तुम्ही ऐका ना. १ माझ्या दोषांचा परिहार किती करू ? किती दोष घालवायचे म्हटले तरी ते जात नाहीत, इतके माझे अंत करण दोषांनी मलीन झाले आहे. प्रारंभीचे, वर्तमानकाळचे, पुढील काळचे कर्म किती आहे याचा नीट सुगावा काही लागत नाही. २ हे कर्म विविध प्रकारचे असून त्याच्यामुळे चौऱ्याशी लक्ष योनींच्या फेऱ्यात सापडावे लागते. या शरीरालाही आध्यात्मिक, आधिदैविक व आधिभौतिक अशा स्वरूपाचे तीन मोगही वारंवार भोगावे लागतात. हे शरीर म्हणजे नानाविध कर्माचे भांडारच आहे असे वाटते थ त्यातच जन्म, म्हातारपण व मरण यांची साठवण आहे. ३ तसे पाहिले तर जीव व शरीर यांचा काही संबंध नाही. भिन्न भिन्न पंचमहाभूतांचा हा देह बनलेला आहे. तो कर्माप्रमाणे, संचिताप्रमाणे कधी रचला जातो, कधी खचला जातो. याप्रमाणे हा देह असार असून फोलकटाप्रमाणे व्यर्थ आहे. ४ पुत्र, पत्नी, बंधू, मायबाप, इतर नातेवाईक याच्या नात्याचा पसारा कसा आहे ? तर एखाद्या मोठ्या नदीत महापूर यावा, त्यात काही लाकडे योगायोगाने जवळ यावीत व मग लाटाची खळबळ झाली की ती दूर वाहून जावीत, तसा हा नात्यातील माणसाचा परस्परांशी क्षणिक संबंध आहे. ५ म्हणून मासांठी अज्ञान नाहीसे करावे. इतकी तरी देवा, तू माझ्यावर कृपा करावीस. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तू कृपाळू आहेस ना ? जनार्दना, मी तुझे चरण धरून तुला अशी विनंती करीत आहे. ६ ६३५ ऐसी हे गर्जूं चेलरी । केशव मुकुंद मुरारी । राम कृष्ण नामें बरीं । हरी हरी दोष सकळ ॥ १ ॥ जनार्दना जगजीवना । विराटस्वरूपा वामना । महदादि मधुसूदना । भवबंधना तोडितिया ॥ २ ॥ चक्रपाणी गदाधरा । असुरमर्दना वीर्यवीरा । सकळमुगुटमणि शूरा । अहो दातारा जगदानिया ॥ ३ ॥ मदनमूर्ती मनमोहना । गोपाळगोपिकारमणा । नटनाट्यकौशल्य कान्हा । अहो संपन्ना सर्वगुणें ॥ ४ ॥ गुणवंता आणि निर्गुणा । सर्वसाक्षी आणि सर्वजाणा । करोनि अकर्ता आपणा । भेदो अभिमाना आतळों ॥ ५ ॥ कासयानें घडे याची सेवा । काय एक समर्पावें या देवा । वश्य तो नव्हे वांचुनि भावा । पाप जीयावेगळें न करी तुका ॥ ६ ॥ १ नसावे. तु. गा...४०

३१४ सार्थ तुकारामगाथा

शब्दार्थ व टीपा :- वैखरी-वाणी, महदादि-महत् तत्त्वाचा आरंभ ज्याच्यापासून आहे असा, जगदानिया- सर्व जगाला दान देणारा, आतळों-स्पर्श होणे. अर्थ :- देवा, केशव, मुकुंद, मुरारी, राम, कृष्ण या चांगल्या नावांनी सर्व दोषांचे हरण होत असल्याने माझ्या वाणीने नेहमी त्याचाच उच्चार करावा. १ जनार्दना, सर्व जगाचे जीवन असणाऱ्या, तू विराट स्वरूपाचा असून वटू वामन मूर्तीचाही तू होतोस. मधुसूदना, महदादो तत्त्व तुझ्यापासूनच निर्माण होते तू माझी सर्व भवबंधने सोडून टाक. २ हे चक्रपाणी, गदाधरा, असुरांचा नाश करणाऱ्या देवा, शूरामधील शूर देवा, तू अतिशय शौर्यवान आहेस. सर्व जगास दान देणारा तू दाता आहेस ३ देवा, तुझी मूर्ती मदनासारखी सुंदर आहे. सर्व गोपाळ व गोपिका यांचे मन हरण करणारा तू आहेस नटनाट्यात व नृत्यात तू कान्हा कुशल आहेस तू सर्वगुणसंपन्न असा आहेस. ४ तू जसा गुणवंत आहेस तसा निर्गुणही आहेस. जसा सर्व काही पाहणारा आहेस, तसेच सर्व जाणणाराही तूच आहेस सर्व काही करुन तू अकर्ता असतोस तू कुणाला अभिमानाचा स्पर्श करू देत नाहीस. ५ या देवाची सेवा मला कोणत्या प्रकाराने घडणार आहे ? या देवाला मी समर्पण तरी काय करू ? हा देव भक्तिभावावाचून मात्र वश होणारा नाही. या देवाच्या पायांमधून हा तुकाराम आपला जीव काही वेगळा करणार नाही. ६

६३६ होतों तें चित्तीत मानसीं । नवस फळले नवसी । जोडिले नारायणा ऐसी । अवित ज्यासी नाश नाहीं ॥ १ ॥ धरिले जीवी न सोडों पाय । आलें या जीवित्वाचें काय । कैं हे पाविजेती ठाय । लाविली सोय संचितानें ॥ २ ॥ मज तों पडियेली होती भुली । चित्ताची अपसव्य चाली । होती मृगजळें गोवी केली । दृष्टि उघडली बरे जालें ॥ ३ ॥ आता हा सिद्धि पावो भाव । मध्यें चांचल्यं न व्हाया जीव । ऐसी तुम्हां भाकीतसे कीव । कृपाळुवा जगदानिया ॥ ४ ॥ कळों येते आपुले बुद्धी । ऐसें तों न घडतें कधी । केवढें आघात ते मधी । लज्जा रिद्धी उभी आड ठाके ॥ ५ ॥ कृपा या केली संतजनीं । माझी अळंकारिली वाणी । प्रीति हे लाविली कीर्तनीं । तुका चरणीं लोळतसे ॥ ६ ॥

सार्थ तुकारामगाथा २१५ भावाने अलंकृत केली, कीर्तनाच्या प्रसंगी मला चांगली प्रीती जवून दिली. त्या संताच्या चरणावर हा तुकाराम लोटांगण घेत आहे. ६ ६३७ तुझिया पार नाहीं गुणां । माझी अल्प मति नारायणा । भवताराका जी सुजाणा । एक विज्ञापना पायांपाशीं ॥ १ ॥ काय जाणावें म्यां दीनें । तुझिये भक्तीचीं लक्षणें । धड तें तोंड धोऊं१ नेणें । परि चिंतने काळ सारों ॥ २ ॥ न लवीं आणीक कांहीं पिसें । माझिया मना वांयां जाय ऐसे । चालवीं आपुल्या प्रकाशें । हातीं सरिसे धरोनियां ॥ ३ ॥ तुज समर्पिली काया । जीवे भावें पंढरीराया । सांभाळीं समविषम डाया । करों छाया कृपेची ॥ ४ ॥ चतुर तरीं चतुरां राव । जागता तरीं जीवांचा जीव । न्यून तो कोण एक ठाव । आल्प भाव परि माझा । ५ ॥ होतें तें माझें भांडवल । पायापें निवेदिले बोल । आदरा ऐसे पाविजे मोल । तुका म्हणे साच फोल तूं जाणसी ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- पार-अंत, विज्ञापना-विनंती, डाया-प्रसग, आल्प-वांकडे, वेडेवाकडे, साच-खरे, फोल-खोटे अर्थ - नारायणा, तुमच्या गुणाना अत नाही माझी बुद्धी अतिशय अल्प असल्यामुळे मी त्याने वर्णनही करू शकत नाही तुम्ही ससारसागर तारून नेणारे असून सुजाण आहात. तुमच्या पायाशी माझी एक विनति आहे. १ देवा, तुमच्या भक्तीची लक्षणे माझ्यासारख्या दीनाने काय जाणावीत ? मला खरे म्हणजे माझे तोंडसुद्धा धुता येत नाही, इतका मी अज्ञानी आहे पण देवा, तुमच्या चिंतनात कसा तरी वेळ काढीत आहे. २ देवा, जे परिश्रम वाया जातील व जे व्यर्थ होईल असे दुसरे कसलेही वेड मला लावू नका मला नीट हाताशी घरा व आपल्या कृपेच्या प्रकाशात मला चालवा ३ पढरीराया, मी ही माझी काया तुलाच जीवेभावे समर्पण केली आहे जे काही चागले वाईट प्रसग येतील त्यातून देवा, तू माझा साभाळ कर. तुमच्या कृपेच्या छायेत मला पूर्ण विश्राती मिळावी ४ देवा, तू इतका चतुर आहेस की सर्व चतुराचा राजा तू आणि ज्ञानो तर इतका आहेस की सर्व ज्ञानी जीवाचा जीवच तू आहेस कुठलो म्हणून तुझ्यात कमतरता नाही पण देवा, माझा हा वेडावाकडा भाव तू पाहा. ५ देवा, माझ्याजवळ भक्तिभावाचे जे काही भाडवल होते, ते सर्व मी आपल्या पायाशी अर्पण केले आहे सर्व हकीगत आपल्या चरणाशी निवेदन केली आहे माझा जो जसा आदर असेल तसे मोल मला मिळेल तुकाराम महाराज म्हणतात, यातील खरे खोटे तू जाणशीलच ६ ६३८ का हो माझा मानियेला भार । ऐसा दिसतसे फार । अनंत पावलिलों उद्धार । नव्हेचि थार मज शेवटीं ॥ १ ॥ पाप बळिवंत गाढें । तुज ही राहो सकते पुढें । मागील कांहीं राहिलें ओढें । नवल कोडें२ देखियेले ॥ २ ॥ काय मानिती संतजन । तुमचे हीनत्ववचन । कीं वृध्द जाला नारायण । न चले पण आधील तो ॥ ३ ॥ १ धुऊ, २ कंवडें

२१६ सार्थ तुकारामगाथा आतां न करावी चोरी । बहुत न धरावें दुरी । पडदा काय घरच्याघरीं । धरिलें दुरी तेव्हां धरिलें ॥ ४ ॥ नको चाळवूं अनंता । कासया होतोसि नेणता । काय तूं नाहीं धरीत सत्ता । तुका म्हणे आतां होई प्रगट ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- भार-ओझें, धार-आश्रय. अर्थ :- देवा, तुम्ही माझे फार मोठे ओझे मानले असे मला फार दिसते. पण तुम्ही आजपर्यंत अनेक लोकांचा उद्धार केलात. असे असूनही मला तुमच्यापाशीं कांही आश्रय मिळणार नाही हे कसे ? १ माझे पापच एवढे बलवान दिसते की, ते तुझ्यासारख्यापुढेही टिकू शकते ! तुझ्यासमोरही माझ्या मागील जन्मांची कर्मकटकट शिल्लक राहिली, असे मोठे नवलच मी आज पाहिले ! २ देवा, हा नारायण आता वृद्ध झाला असून पूर्वीचे त्याचे सामर्थ्य काही आता उरलेले दिसत नाही, असे तुमच्या कमीपणाचे वर्णन मी केले तर ते संत लोकांना कधी मान्य होईल काय ? ३ देवा, आता असे चोरटेपणाचे वर्तन करून मला दूर करू नकोस. स्वतःच्याच घरी असा पडदा धारण करणे काय बरोबर आहे काय ? आतापर्यंत तुम्ही मला दूर धरलेत ते धरले. ४ अनंता, आता मला विनाकारण नका फसवू. जाणूनबुजून तू नेणता का होतोस ? तुकाराम महाराज म्हणतात, माझे रक्षण करण्याची सत्ता काय तुझ्यावळ नाही? देवा, तू आता माझ्यासाठी प्रगट हो ना. ५ ६३९ मज ते हांसतील संत । जाँहीं देखिलेतो मूर्तिमंत । म्हणोनि उद्वेगलें चित्त । आहाच भक्त ऐसा दिसें ॥ १ ॥ ध्यानीं म्या वर्णविति कैंसे । पुढें एकीं स्तुति केली असे । तेथूनि जीव निघत नसे । ऐसिये आते लागलोंसें ॥ २ ॥ कासया पाडिला जो धडा । उगाचि वेडा आणि वांकडा । आम्हां लेकरांसि पीडा । एक मागें जोडा दुसऱ्याचा ॥ ३ ॥ सांगा कोणाचा अन्याय । ऐसें मी धरीतसें पाय । तूं तंव समचि सकळां माय । काय अन्याय एक माझा ॥ ४ ॥ नये हा जरी कारणा । तरी कां व्यालेसि नारायणा । वचन द्यावें जी वचना । मज अज्ञाना समजावीं ॥ ५ ॥ बहुत दिवस केला बोभाट । पाहातां भ्रमलो ते वाट । तुका म्हणे विस्तारलें ताट । काय वीट आला नेणों स्वामी ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- आहाच-उगाच, धडा-रीत, कारणा-उपयोगी अर्थ - देवा, ज्या साधुसंतानी तुला मूर्तिमंत असे पाहिले आहे ते मला हसतील, या विचाराने माझे चित्त उद्विग्न होऊन गेले आहे. मी भक्त उगाच आहे की काय असे मला वाटते. १ तुझ्या ध्यानाचे वर्णन तरी कसे करावे ? माझ्याच्या कित्येक संतानी तुझी स्तुती केलेली आहेच. देवा, या विचारातून माझा आता जीव निघतच नाही. या एकाच आशेत मी गुंतलो आहे. २ अशी ही वेडीवाकडी रीत महाराज, कशासाठी निर्माण केली आहे ? आम्हा मुलांना त्याचा त्रास होतो ना यासाठी का एकामागून दुसरे दुज असे तू निर्माण केले आहेस ? ३ सांगा देवा, हा अन्याय तरी कुणाचा आहे ? मी तुमचे पाय धरून विचारतो आहे. कारण तू सर्वांची सारखीच आई आहेस; तर सांग, माझा तरी काय अन्याय आहे ? ४ नारायणा, जर माझ्या या देहाचा काही उपयोग नव्हता, तर मला तुम्ही निर्माण तरी का केलेत ? का प्रसवलात मला ? माझ्या प्रश्नास आता नीट उत्तर द्या तुम्ही. माझ्यासारेख्या अज्ञानी

सार्थ तुकारामगाथा ३१७ मुलाची नीट समजूत काढा. ५ देवा, अशा प्रकारचा बोभाटा पुष्कळ दिवस करून मी तुमची वाट पाहून थकून थकून गेलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ताट वाढून ठेवलेले असावे व त्याचा वीट आलेला असावा, तसा माझा कंटाळा स्वामी करतात की काय ? ६ ६४० बरें जालें आजिवरी । नाहीं पडिलों मृत्याचे आहारीं । वांचोन आलों एथवरी । उरलें तें हरी तुम्हां समर्पण ॥ १ ॥ दिला या काळें अवकाश । नाहीं पावलें आयुष्य नाश । कार्या कारण उरलें शेष । गेलें तें भूस जावो परतें ॥ २ ॥ बुडणें खोटें पावतां थडी । स्वप्नीं झाली ओढाओढी । नासली जागृतीची घडी । साच जोडी शेवटीं गोड घास ॥ ३ ॥ तुम्हांसि पाथविली हाक । तेणें निरसला धाक । तुमचें भातें हें कवतुक । जे शरणागत लोक रक्षावे ॥ ४ ॥ रवीच्या नांवें निशीचा नाश । उदय होतांचि प्रकाश । आतां कैंचा आम्हां दोष । तूं जगदीश कैवारी ॥ ५ ॥ आतां जळो देह सुख दंभ मान । न करीं याचें साधन । तूं जगदादि १ नारायण । आलों शरण तुका म्हणे ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- भूस-फोलकटाप्रमाणे व्यर्थ, थडी-पैल तीरास, भातें - कौतुकाचे भांडवल, साऊ, निशीच्या-रात्रीच्या अर्थ.- देवा, आजपर्यंत मी मृत्यूच्या दाढेत सापडून नाश पावलो नाही हे बरेच झाले. येथपर्यंत वाचून राहिलो हे ठीक झाले. आता माझे उरलेले सर्व आयुष्य देवा, मी तुम्हास समर्पण करीत आहे. १ आजपर्यंत या काळानेच संधी दिली म्हणूनच माझा नाश झाला नाही. काही कार्य करणे उरले आहे म्हणूनच हे आयुष्य उरले आहे. मागचे आयुष्य फोलकटाप्रमाणे व्यर्थ गेले ते जाऊ द्या २ एकदा पैल तीरावर पोचल्यावर मग नदीत बुडलो हे सर्व खोटेच ठरते. किंवा स्वप्नात वाटेल तेवढी ओढाओढी झाली तरी जागृत अवस्था आल्यानंतर मग ते सर्व खोटेच ठरते. तसाच खरा आनंद मला शेवटी तुमच्या भेटीचा गोड घास मिळणार आहे यातच वाटतो. ३ मी तुम्हास प्रेमाने हाक मारली त्यामुळेच देवा, माझी भीती नाहीशी झाली आहे. शरण आलेल्यांचे रक्षण करावे हे जे तुम्ही कौतुकाने करून शरणागतास प्रेमाचा साऊ देता तोच मोठा आहे. ४ सूर्य उगवल्याबरोबर रात्रीचा जसा नाश होतो, प्रकाशाचा उदय होतो, त्याप्रमाणे तू जगाचा स्वामी आमचा कैवारी असताना आम्हांस दोष कसा लागणार ? ५ आता माझ्या अंगी असणारा देहसुखाचा, दंभाचा, मानाचा अभिमान जळून जावो. मी आता त्याच्याकडे ढुंकूनही पाहणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तू जगाचा स्वामी आहेस, नारायणा, मी तुला शरण आलो आहे. ६ ६४१ आतां माझा नेणो परतों भाव । विसावोनि पायीं ठेविला जीव । सफळां लाभांचा हा ठाव । ऐसा भाव जाला चित्ताठायीं ॥ १ ॥ भांडवल गांठी तरि विश्वास । जालों तों जालों निश्चय दास । न पाहें मागील ते वास । पुढती सोस सेवेचाची ॥ २ ॥ आहे तें निवेदिलें सर्व । मी हें माझें मोडियला गर्व । अकाळीं काळ अवघें पर्व । जाला भरवसा कृपेलाभाचा ॥ ३ ॥ १ जगदीश.

३१८ सार्थ तुकारामगाथा वेव्हारीं वेव्हारा अनंत । नाहीं यावांचुनी जाणत । तरी हें समाधान चित्त । लाभहानी नाहीं येत अंतरा ॥ ४ ॥ करूनि नातळों संसारा । अंग भिन्न राखिला पसारा । कळवळा तो जोवनीं खरा । बीजाचा थारा दुरी आघात ॥ ५ ॥ बहु मतापासूने निराळा । होऊनि राहिलों सोंवळा । बैसल्या रूपाचा कळवळा । तुका म्हणे डोळां लेइलों तें ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- वाव-निश्चय, वास-वाट, सोस-हौस. अर्थ :- देवा, तुझ्या पायांशीं येऊन मी विसावलो आहे. आतां काही माझा भक्तिभाव तुझ्यापासून दूर होऊं नये. तुझ्या प्राप्तीमुळे मला सर्व लाभाचा लाभ मिळाला, असाच निश्चय माझ्या मनाशीं झालेला आहे. १ तुझ्या- वरचा विश्वास हेच माझे आता मुख्य भांडवल असून मी तुझ्या निश्चयाने सेवक झालो आहे. मी मागच्या प्रपंचाची मग वाटच पाहणें सोडून दिले आहे मला सर्व हौस आता यापुढे तुमच्या सेवेचीच आहे. २ देवा, माझ्या मनात जे आहे, ते सर्व मी तुमच्यापुढे सांगितले आहे. मी माझा सर्व गर्व सोडून दिला आहे. वाईट काळ, चांगला काळ हे सर्वच आम्हांस आता पर्वकाळाप्रमाणे वाटत आहेत. हा मोठा विश्वास देवा, तुमच्या कृपेने मला प्राप्त झाला आहे. ३ आता माझ्या या सर्व व्यवहारांतही या ईश्वराशिवाय दुसरे काही मी जाणीतच नाही म्हणूनच माझ्या मनात पूर्ण समाधान असून लाभहानीविषयी मुळीच विचार येत नाही. ४ असा मी संसार करूनही त्यामधून वेगळा आहे. सर्व बाह्य पसारा मी माझ्या अंगापासून दूरच ठेविला आहे तुझ्याविषयी प्रेम हेच जीवनात खरे सुख प्राप्त झाले. यामुळे नामरूप बीजाचा आश्रय मिळून इतर आघात होते ते संपले, दूर झाले ५ मी अनेक मतांपासून निराळाच राहिलो. सोंवळा होऊनच मी आहे तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुझ्या रूपाचे जे ध्यान माझ्या हृदयात वसले आहे, तेच मी माझ्या डोळ्यांनी पाहात आहे. ६ ६४२ तुळसीमाळा घालुनी कंठीं । उभा विटेवरी जगजेठी । अवलोकोनि पुंडलीका दृष्टी । असे भीमातटीं पंढरीराय ॥ १ ॥ भुक्तिमुक्ति जयाच्या कामारी । रिद्धिसिद्धि वोळगती द्वारों । सुदर्शन घरटी करी । काळ कांपे दुरी धाकें तया ॥ २ ॥ जगज्जननी असे वाम भागीं । भीमकी शोभली अर्धांगीं । जैसी विद्युल्लता चमके मेघीं । दरुषणें भंगी महा दोष ॥ ३ ॥ सुखसागर परमानंदु । गोपीगोपाळां गोधनां छंदु । पक्षिश्वपदां जयाचा वेधु । वाहे गोविंदु पांवा छंदें ॥ ४ ॥ मुखमंडित चतुर्भुजा । मनमोहन गरुडध्वजा । तुका म्हणे स्वामी माझा । पावे भक्तिभाजा लवलाहीं ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - कामारी-दासी, वोळगती-प्राप्त होतात, घरटी करी-रक्षणासाठी फिरत असते, वाम भागीं-डाव्या अंगास, भीमकी-रुक्मिणी, भंगी-नाहीसा होतो, लवलाहीं-लगबगीने अर्थ :- गळ्यामध्ये तुळशीच्या माळा घालून हा जगजेठी पांडुरंग आपल्या दृष्टीने पुंडलिकाकडे पाहून भीमा नदीच्या तीरावर विटेवर उभा राहिला आहे. १ अष्टमहासिद्धी व रिद्धी व नाना भोग आणि चारो मुक्ती या याच्याच दासी असून सुदर्शन चक्र जगाच्या रक्षणासाठी फिरत असते याच्या भीतीने यम देखील दूर पळून जातो. २ सर्व विश्वाची माता असणारी याच्या डाव्या अंगात अर्धांगी म्हणून ही रुक्मिणी शोभत आहे. मेघामध्ये जशी चमक- णारी वीज शोभावो तशी ही वाटते. तिच्या दर्शनानेच महापातकांचे दोष नष्ट होतात. ३ हा माझा विठ्ठल सुखाचा

सार्थ तुकारामगाथा ३१९ सागर व परमानंदाचे प्रत्यक्ष रूपच आहे. गोपी, गोपाळ, गाई यांना याचाच एक नाद असून पशू आणि पक्षी यांनाही याचा छंद नेहमी असतो. हाही यांच्याच छंदाने पावा वाजवीत असतो. ४ याने मुकुट सुशोभित असून हा चतुर्भुज आहे. हा भक्तांचे मन हरण करणारा असून याच्या ध्वजावर गरुडाचे स्थान आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हा माझा स्वामी लगबगीने भक्तांच्या कामासाठी धावत येत असतो. ५ ६४३ हातींचें न संडावें देवें । शरण आलों जीवें भावें । आपुलें ऐसें म्हणायें । करितों जीवें निबलोण ॥ १ ॥ बैसतां संतांचे पंगती १ । कळों आलें कमळापती । आपुलीं कोणीच नव्हती । निश्चय चित्तीं दृढ जाला ॥ २ ॥ येती तुझिया भजना आड । दाविती प्रपंचाचें कोड । कनिष्ठों रुचि ठेऊनि गोड । देखत नाड फळतसे ॥ ३ ॥ मरती मेलों नेणों किती । तोचि लाभ तयाचे संगतीं । म्हणोनि येतों काकुलती । धीर तो चित्तीं दृढ द्यावा ॥ ४ ॥ सुखें निंदोत हे जन । न करीं तयांशीं वचन । आदिपिता तूं नारायण । जोडी चरण तुमचे तें ॥ ५ ॥ आपलें आपण न करूं हित । करूं हें प्रमाण संचित । तरी मी नष्टचि पतित । तुका म्हणे मज संत हांसती ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- कोड-हौस, नाड-फजिती. अर्थ :- देवा, मला आता हाताशी धरले आहे ते सोडू नये. मी तुम्हांस जीवेभावे शरण आलेलो आहे. मला तुम्ही आपला आहे असे म्हणावे. मी माझे जीव तुमच्यावरून ओवाळून टाकीन. १ हे कमळापती, मला या संतांच्या पंगतीस बसल्यावर समजून आले की, माझे हे सर्व आप्त लोक मला कधीही उपयोगी पडणारे नाहीत. ते आपले नव्हेतच. हाच माझ्या मनात निश्चयाचा दृढ भाव झाला. २ ही सर्व नातेवाईक माणसे तुझ्या भजनाच्या आड येतात. देवा, मला प्रपंचाची हौस वाटावी असे करतात, प्रपंचादी मुखासारख्या कमी प्रतीच्या गोष्टीत त्यांना रुची वाटते. पण त्याची पुढे होणारी फजिती मला समजते. ३ ह्यातील कित्येकजण मरून गेले. मलाही त्यांच्या संगतीत एवढा एकच लाभ झाला असता; म्हणून तर देवा, मी फार काकुळतीस येऊन विनवणी करीत आहे की, माझे चित्त त्यांच्यात जडू नये, एवढा धीर मला तुम्ही द्यावा. ४ मग माझी निंदा हे माझे आप्त लोक सुखाने करू द्या ना. मी त्यांच्याशी भाषणही करणार नाही. देवा, तूच आदिपिता आहेस माझा. नारायणा, मी तुमचे पाय काही मग सोडणार नाही. ५ मी आपले हित आपणच साधून घेणार आहे. पूर्वसंचिताप्रमाणेच मी हे करीन. तुकाराम महाराज म्हणतात, मी जर हे न करीन तर मी नष्टच होईन, पतितच राहीन. मग सारे संतजन मला हसतील ना. ६ ६४४ वरयें जालें लागलों कारणों । तुमचे राहिलों चरणीं । फेडीन संतसंगती धणी । गर्जइल गुणीं वैखरी ॥ १ ॥ न वेंचे शरीर सेवेसी । काया वाचा आणि मनेसीं । जालों संतांची अंदणी दासी । केला याविशीं निर्धार ॥ २ ॥ जीवनों राखिला जिव्हाळा । जालों मी मजसीं निराळा । पंचभूतांचा पुतळा । सहज लीळा वर्ततसे ॥ ३ ॥ १ संगती.

.३२० सार्थ तुकारामगाथा जयाचें जया होईल ठावें । लाहो या साधियेला भावें ॥ ऐसें होतें राखियले जीवें । येथूनि देवें भोवहुनी ॥ ४ ॥ आस निरसली ये खेपे । अवघे पंथ जाले सोपे । तुमचे दीनबंधु कृपें । दुसरें कांपे सत्ताधाकें ॥ ५ ॥ अंकिले पणें आनंदरूप । आतळों नये पुण्यपाप । सारूनि ठेविले संकल्प । तुका म्हणे आपे आप एकाएकीं ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- धणो-तृप्त होईपर्यंत, थैलरी-वाणी, न वंचे-कुचराई करणार नाही, भोवहुनी-दूर काढून, आतळों न ये-स्पर्श करीत नाही. अर्थ :- देवा, मी तुमच्या चरणांशी आलो, यात माझे जीवित कारणी लागल्यासारखे झाले हे फार चांगले झाले. मी आता तृप्त होईपर्यंत या संतसंगाचा लाभ घेईन व वाणीने तुझे गुण गर्जून सांगेन. १ तुझ्या सेवेत माझे शरीर कधी कुचराई करणार नाही. काया, वाचा व मन यासहित मी तुझी सेवा करीन. गादण शिल्ल्या दासी- प्रमाणेच मी या संताचा सेवक झालो आहे. माझा आता याविषयी पक्का निर्धार झालेला आहे २ माझ्या जीवनात आता तुझ्याबद्दल जिव्हाळा निर्माण झाला असून मी देह व देहसंबंध याच्यापासून निराळाच झालो आहे त्यामुळे पंचमहाभूतांचा हा देह सहज लीलेने आता वर्तणूक करीत आहे. ३ ज्याचे चिंतन आम्ही करीत आहोत त्याला हे सर्व नीट समजेल, असा विश्वास आमच्या मनात आहे. माझ्या जीवासही असेच वाटत होते या प्रपंचरूप स्थितीतून देवाने मला दूर काढून मार्ग दाखविला आहे. ४ या खेपेस मात्र माझी सर्व आशा पूर्ण झालेली आहे. सर्व मार्ग आता सोपे झाले असून देवा, दीनबंधू, तुमच्या कृपेने दुसरा विचारच माझ्या मनात येण्यास थरथरा कापत आहे ५ देवा, तुमचा अंकित होऊन, सेवक होऊन मी आनंद स्वरूपास प्राप्त झालो आहे. आता मला पापपुण्याचा स्पर्श होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी सर्व संकल्पाचा नाश करून मी आपोआप एकटेपणाने राहिलो आहे ६ ६४५ अवघ्या दशा येणें साधती । मुख्य उपासना सगुणभक्ती । प्रगटे हृदयांची मूर्ती । भावशुद्धि जाणोनियां ॥ १ ॥ बीज आणि फळ हरीचें नाम । सकळ पुण्य सकळ धर्म । सफळां फळांचे हे वर्म । निवारी श्रम सकळ ही ॥ २ ॥ जेथें कीर्तन हें नामघोष । करिती निर्लज्ज हरीचे दास । सफळ वोथंबले रस । तुटती पाश भवबंधाचे ॥ ३ ॥ येती अंगा वसतो लक्षणें । अंतरीं देवें धरिलें ठाणे । आपणचि येती तयाचे गुण । जाणें येणें खुंटे वस्तींचें ॥ ४ ॥ न लगे सांडावा आश्रम । उपजलें कुळींचे धर्म । आणीक न करावे श्रम । एक पुरे नाम विठोबाचें ॥ ५ ॥ वेदपुरुष नारायण । योगियांचें ब्रह्म शून्य । मुक्ता आत्मा परिपूर्ण । तुका म्हणे सगुण भोळया आम्हां ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- वोथंबले-निर्माण झाले. अर्थ :- सगुण रूपाची भक्ती हीच मुख्य उपासना असून सर्व सुखांच्या अवस्था याच भक्तीमुळे साध्य होतात. मनात एक शुद्ध भाव असला की, हृदयातील प्रभूची मूर्ती समोर प्रकट होते १ श्रीहरीचे नाम हेच बीज व हेच फळ होय. सर्व पुण्ये, सर्व धर्म, सर्व फला यांचे रहस्य म्हणजे श्रीहरीचे नाम हेच होय. याच्यामुळे सर्व श्रमाचे निवारण

सार्थ तुकारामगाथा ३२१ होते २ ज्या ठिकाणी कीर्तनात श्रीहरीच्या नावाचा घोष होतो, श्रीहरीचे दास मुक्त मनाने नामघोष करीत असतात, तेथे सर्व रसांची प्राप्ती होत असते संसारबंधनाचे पाश तेथे तुटलेले असतात ३ एकदा मनात देवाने स्थान धारण केले आहे असे झाले की, मग ज्ञानाची सर्व लक्षणे प्रकट होतात सर्व गुण आपण होऊन प्रकट होतात मग त्याचे जाणेयेणेही थांबते ४ या प्राप्तीसाठी मग स्वतःचा आश्रमधर्म सोडण्याची जरूरी नाही दुसरे काही श्रम करण्याची आवश्यकता नाही एक विठोबाचे नामस्मरण पुरे आहे ५ हा नारायण साक्षात वेदपुरुषच आहे हेच योगी लोकांचे शून्य ब्रह्म हाच मुक्त व परिपूर्ण असा आत्मा आहे तुकाराम महाराज म्हणतात, परंतु आमच्या- सारख्या भोळ्याभाबड्या लोकांना हे सगुण रूपच पुरे आहे ६ विवरण - बुवांचा हा अभंग अनेक दृष्टींनी महत्त्वाचा आहे सर्वसामान्य लोकांना योगादी साधनांपेक्षा सगुणभक्तीचा व नामसंकीर्तनाचा मार्ग हाच सहजसुलभ व निर्धोक असल्याचा निर्देश अनेक ठिकाणी आहे ईश्वर- प्राप्तीसाठी संसार मोडायला हवा, रानावनात जायला हवे, आश्रमधर्माचे रीतीरिवाज सांडायला हवेत, कुळधर्म सांडायला हवेत, असे नाही ह्या सर्व प्रापंचिक कार्यात मग्न असताना अखंड नाम प्रभूचे चित्तात असावे व सगुणाचे ध्यान मनात ठसावे मग इतर खडतर साधनांची तुकारामबुवांच्या मते जरूरी नाही 'नलगे सायास जाणे वनांतरा । सुखें येतो घरां नारायण' अशीच ग्वाही तुकाराम महाराजांनी दिलेली आहे 'आता गृहादिक आपुलें । ते कांहीं न लगे त्याजावे । जें घेतें झाले स्वभावें । निसंग म्हणूनि' असे ज्ञानेश्वरांनीही म्हटले आहे याचे मुख्य मर्म असे की, घरी प्रपंचात राहून सुख भोगणारे जे मन व स्वभावत च नि मग होऊन केवळ हरिरूप झालेले असते नामसंकीर्तन व सगुणभक्ती यांनी ते केवळ ईश्वराशीच निगडित झालेले असल्यामुळे या भक्तास अव्यक्ताची उपासना करण्यासाठी निर्गुणाकडे, योगमार्गाकडे जाण्याची जरूरी नाही ६४६ श्रीअनंता मधुसूदना । पद्मनाभा नारायणा । जगद्व्यापका जनार्दना । आनंदघना अविनाशा ॥ १ ॥ सकळदेवा¹ आदिदेवा । कृपाळुवा जी केशवा । महा महानुभवा । सदाशिवा सहजरूपा ॥ २ ॥ चक्रधरा विश्वंभरा । गरुडध्वजा करुणाकरा । सहस्रपादा सहस्रकरा । क्षीरसागरा शेषशयना ॥ ३ ॥ कमलनयना कमलापती । कामिनीमोहना मदनमूर्ती । भवतारका धरित्या क्षिती । वामनमूर्ती त्रिविक्रमा ॥ ४ ॥ अगा ये सगुणा निर्गुणा । जगज्जनित्या जगज्जीवना । वसुदेवदेवकीनंदना । बाळरांगणा बाळकृष्णा ॥ ५ ॥ तुका आला लोटांगणी । मज ठाव द्यावा जी चरणीं । हेचि करीतसे विनवणी । भयबंधनीं सोडवावे ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - जगद्व्यापका-जग व्यापून राहिलेल्या, करुणाकरा-करुणेच्या सागरा, क्षिती-पृथ्वी, ठाव-आश्रय अर्थ - श्रीअनंत स्वरूपाच्या देवा, मधू नावाच्या दैत्याचा नाश करणाऱ्या देवा, ज्याच्या नाभीतून कमळ उगवले आहे अशा पद्मनाभा, नारायणा, जगात व्यापून राहिलेल्या जनार्दना, तू अविनाशी आहेस, तू आनंदाचा व कृपेचा मेघ आहेस १ सगळ्या देवांचा देव तू आहेस तू कृपाळू असा केशव आहेस महान आनंद देणारा तू असून तुझ्या संगतीचा श्रेष्ठ अनुभव देणारा तू आहेस सदाशिवा, तू नेहमीच कल्याण करणारा असून तुझे हे रूप सहज १ सकळ देवाधिदेवा तु गाथा ४१

३२२ सार्थ तुकारामगाथा

असे आहे. २ सर्व विश्वास भरून राहणाऱ्या विश्वंभरा, तुझ्या हातात दुष्टाचा नाश करणारे सुदर्शनचक्र असल्या- मुळे तू चक्रधर आहेस. हे करुणेच्या सागरा, तुझ्या ध्वजावर गरुडाचे स्थान असून तुला हजारो पाय व हजारो हात आहेत देवा, तू क्षीरसागरात शेषावर शयन करणारा आहेस ३ देवा, तुझे डोळे कमळाच्या पानांप्रमाणे असून तू कमलापती म्हणून शोभतोस प्रत्यक्ष लक्ष्मीच तुझी पत्नी आहे. सर्व स्त्रियांना तुझी मोहिनी पडते. तू केवळ मदनाचा पुतळा आहेस. तू मस्तकावर अवतारप्रसंगी पृथ्वी धारण करून आपल्या भक्ताचे रक्षण केले आहेस तीन पावलाचा विक्रम वामनावतारात तू करून भक्ताचा उद्धार केला आहेस. ४ अरे परमेश्वरा, तूच सगुण व तूच निर्गुण आहेस. या जगाची आई व बाप देवा, तूच आहेस सर्व जगाचे जीवन तू आहेस. तूच वसुदेवदेवकी याचा लाडका मुलगा आहेस या रूपाने त्यांच्या अंगणात तू सगुण होऊन रांगत आहेस ५ देवा, हा तुकाराम तुला अनंत लोटांगणे घालीत आहे मला तुमच्या चरणावर विश्रांती द्यावी हीच माझी विनयंती आहे या भवबंधनातून देवा, मला सोडवावे. ६ विवरण :- या पुरा गोड अभंगात तुकारामबुवांनी देवाच्या सगुण रूपाचे अतिशय मनोहर असे वर्णन केले आहे यातील देवाच्या गुणाचे व कर्तृत्वाचे वर्णन करणारे प्रत्येक विशेषण व संबोधन सार्थ व अभिप्राययुक्त आहे या आधीच्या अभंगात ज्या सगुणरूपाची महती बुवांनी वर्णन केली, त्याचे फार बहारीचे वर्णन त्यांनी या अभंगात परमेश्वराच्या गुणविशेषाचे दर्शन घडवून केले आहे नुसता अभंग मोठ्याने म्हणत राहावा, मग प्रत्यक्ष विठुलाचे सगुण रूप डोळ्यापुढे उभे राहते की नाही ते पाहावे या देवास भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे अनेक बाहू, अनेक पाय असले तरी (गीता ११, १६) तो वसुदेव-देवकीच्या घरी अंगणात लहान होऊन खेळत आहे, हेही ध्यानात ठेवावयास हवे श्रीअनंता ! अशी पहिल्यानेच हाक मारून बुवांनी या देवाने अंत नसणारे रूप प्रथम वर्णन केले व अभंगाच्या शेवटी तुकाराम महाराज त्याच्या वाळवंटावर येऊन विसावले आहेत हाच त्यांच्या सगुणप्रीतीचा आदर्श होय याच्या पायावर तुकारामबुवा प्रवृत्त लोटांगणे घालतात. ६४७ आतां येणें बळें पंढरीनाथ । जवळी राहिला तिष्ठत । पाहाता न कळे जयाचा अंत । तोचि हृदयात घालूं आतां ॥ १ ॥ विसरोनि आपुला देहपणभाव । नामेंचि भुलविला पंढरीराव । न विचारी याती¹ कुळ नांव । लागावया पाय संतांचे ॥ २ ॥ बरे वर्म आले आमुचिया हातां । हिंडावे धुंडावे न लगतां । होय अविनाश सहाकारी दाता । चतुर्भुज रता परि धाके ॥ ३ ॥ होय आवडी साने थोर । रूप सुंदर मनोहर । भक्तिप्रिय लोभापर । करी आदर याचकपणे ॥ ४ ॥ ते वर्म आले आमुच्या हाता । म्हणोनि शरण निघालों संतां । तुका म्हणे पंढरीनाथा । न सोडीं आतां जीवे भावे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - पाय-शय अर्थ -- आता या माझ्या भक्तीच्या बलामुळे हा पंढरीनाथ माझ्याजवळच तिष्ठत उभा राहिला आहे. याचा वरवर पाहून नीट थांग लागत नाही तो आता हृदयात घालून त्याची जपणूक करू १ आपण देव आहोत, हा भावच तो विसरून गेला आहे किंवा आपला देहपणाचा भाव विसरून त्याची आळवणी करा, म्हणजे केवळ नामस्मरणानेच हा पंढरीराव भुलविला जातो हा मग आपल्या भक्ताची जात व त्याचे कुळ याची चौकशी करीत नाही संताच्या पायाशी लागले की याची भेट होते २ हे एक चांगले रहस्य आमच्या हातात सापडले आहे. याच्यासाठी फार हिंडावे, धुंडावे लागणार नाही आता. हा अविनाशी असणारा दाता पांडुरंग सहकारी झाला आहे. १ यातु कुळ ठाव.

सार्थ तुकारामगाथा ३२३ हा चतुर्भुज असला तरी संतांचा धाक याला फार मोठाच असतो. ३ भक्तांच्या आवडीप्रमाणे हा लहान, थोर होतो. हा त्यांच्यासाठी सुंदर व सगुण रूप धारण करतो. याला भक्तो अतिशय प्रिय असून भक्ताचा लोभ यास अपार असतो. कारण स्वतः याचक होऊन हा आपल्या भक्तांचा आदरसत्कार करीत असतो. ४ या श्रीहरीचे हे रहस्य आता आमच्या हातात आले आहे. म्हणून तर मी संतांना शरण जाण्यास निघालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, पंढरीनाथा, आता या संतांना मी सोडणार नाही. जीवाभावाने त्यांना संतुष्ट करीन ५ ६४८ माझा तंव खुंटला उपाव । जेणें तुझे आतुडती पाव ॥ करूं भक्ति तरि नाहीं भाव । नाहीं हातीं जीव कवणोविशीं ॥ १ ॥ धर्म करूं तरि नाहीं चित्त । दान देऊं तरि नाहीं वित्त । नेणें पुजों ब्राह्मण अतीत । नाहीं भूतदया पोटा हार्ती ॥ २ ॥ नेणें गुरुदास्य संतसेवन । जप तप अनुष्ठान । नव्हे वैराग्य वनसेवन । नव्हे दमन इंद्रियाेंसी ॥ ३ ॥ तीर्थे करूं तरि मन नये सवें । व्रत करूं तरि विधि नेणें स्वभावें । देव जरि आहे म्हणों मजसवें । तरि आपपरावें न वंचे ॥ ४ ॥ म्हणोनि जालों शरणागत । तुझा दास मी अंकित । यास कांहीं न लगे संचित । जालों निश्चित१ तुका म्हणे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - उपाव-उपाय, आतुडती-प्राप्त होतात, दमन-स्वामित्व, सर्व्हे-पवय, न वंचे-जात नाही. अर्थ. - देवा, जेणेकरून तुझ्या पायांची प्राप्ती होईल, याविषयीचा माझा तर उपाय सारा संपून गेला आहे. तुझी भक्ती नीट करावी, तर एवढा मोठा भावही मजजवळ नाही. कुठल्याही बाबतीत हा माझा जीव माझ्या स्वाधीन नाही. १ धर्माचे आचरण करावे, तर त्यात माझे चित्त नाही. कुठे दान द्यावे तर, त्यासाठी माझ्याजवळ पैसा नाही. त्यामुळे ब्राह्मण अथवा अतिथी यांचे पूजन मी काही करू शकत नाही. आणि पोटात भूतमात्रांविषयी अपार अशी दयाही नाही. २ श्रीगुरुंची सेवा कशी करावी हेही मला समजत नाही. संतांची सेवा मला समजत नाही. जप, तप, अनुष्ठान, वैराग्य, वनवासातील चिंतन, इंद्रियांवर स्वामित्व ठेवणे यांपैकी काहीही मला नीट जमत नाही. ३ तीर्थयात्रा करावी तर, मनास तशी सवय नाही व्रते वगैरे करावीत तर, मला त्यांचा विधी माहीत नाही. देव माझ्याजरोवरच असतो असे मानले तरी माझ्यातील आपपर भाव जात नाही. ४ म्हणून देवा, मी तुला शरण आलो आहे. तुझा मी दास तुझ्याच स्वाधीन असल्यासारखा आहे तुकाराम महाराज म्हणतात, असल्या या स्थिती- साठी काही संचित कर्माची जरूरी लागत नाही; म्हणूनच तर मी निश्चित झालो आहे. ५ ६४९ तरि म्यां आळवावें कोणा । कोण हे पुरवील वासना । तुझयांचूनि नारायणा । लावीं स्तना कृपायंते ॥ १ ॥ आपुला न विचारिँ शिण । न धरौं अंगसंगें भिन्न । अंगीकारिलें राखें दीन । देई जीवदान आवडीचें ॥ २ ॥ माझिया मनासिहे आस । नित्य सेवावा ग्रंथरास । अखंड चरणींचा वास । पुरवी आस याचकाची ॥ ३ ॥ माझिया संचिताचा ठेवा । तेणें हे वाट दायिली देवा । एवढ्या आदराचा हेया । मागें सेवादान आवडीनें२ ॥ ४ ॥ १ निश्चित, २ आवडीचे

३२४ सार्थ तुकारामगाथा आळवीन करुणावचनीं । आणीक गोड न लगे मनीं । निद्रा जागृती आणि स्वप्नीं । धरिले ध्यानीं मनीं रूप ॥ ५ ॥ आतां भेट न भेटता आहे । किंवा नाहीं ऐसे विचारूनि पाहे । लागला झरा अखंड आहे । तुका म्हणे साहे' केले अतरीं ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - शिण-त्रास, वास-इच्छा, साहे-साह्य अर्थ - नारायणा, तू जर मला दूर सारलेस, तर मग मी आळवावे तरी कुणास ? माझी इच्छा कोण पुरवील हो ? देवा, तुझ्यावाचून मला स्तनपान कोण देईल ? १ माझ्यासाठी देवा, तुला जर काही त्रास झाला तर, तू त्याचा विचार करू नकोस. तू मला तुझ्या अगसंगापासून दूर नको करूस माझ्यासारख्या दीनाचा तू अंगीकार केला आहेस, तर माझे रक्षण करून मोठ्या आवडीचे असे जीवदान मला दे ना. २ माझ्या मनाची ही एकच इच्छा आहे की, बहुरसाचे सेवन नित्य करीत असावे तुझ्या घराजवळ माझा निवास अखंड असावा या याचकाची एवढी एक इच्छा तू पुरवावीस. ३ माझ्या पूर्वकर्माचा जो ठेवा होता, त्यानेच मला हा मार्ग दाखविला आहे हे या वाटण्याजोगा हा आदर त्यामुळेच निर्माण झालेला आहे मी तुझ्याजवळ मोठ्या प्रीतीने सेवेचे दान मागीत आहे ४ मी तुझी करुण वाणीने स्तुती करीत जाईन देवा याशिवाय माझ्या मनास दुसरे काहीही गोड लागत नाही झोपेत, जागेपणी आणि स्वप्नामध्ये, ध्यानात, मनात देवा, तुझेच रूप मी धारण केले आहे ५ देवा, आता अशी अवस्था झाली आहे की, भेट न होताही भेटल्याचे सुख आहे हे आहे की नाही याचा तूच विचार करून पाहा तुकाराम महाराज म्हणतात, देवा, अशा प्रकारच्या अनुसधानान्चा झरा अखंडपणे मनात आहे हे साह्य माझ्या मनास तू केले आहेस ६ ६५० हेचि भवरोगाचे औषध । जन्म जरा तुटे व्याध । आणीक कांहीं नव्हे बाध । करील थद्य पड्वर्गा ॥ १ ॥ सावळें रूप ध्यावे डोळां । सा चौ अठराचा गोळा । पदर लागो नेदी खळा । नाममंत्रमाळा विष्णुसहस्त्र ॥ २ ॥ भोजना न द्यावे अन्न । जेणे चुके अनुपान । तरीच घेतल्याचा गुण । होईल जाण सत्य भाव ॥ ३ ॥ नये निघो आपुलिया घरा । बाहेर लागो नये वारा । बहु बोलणे ते सारा । संग दुसरा वर्जावा ॥ ४ ॥ पास ते एक द्यावें वरी । नवनीताची होईल परी । होईल गुसळिले ते निवारी । सार भीतरी नाहीं तया ॥ ५ ॥ न्हायें अनुतापीं पाघरे दिशा । स्वेद निघो दे अवघी आशा ।

सार्थ तुकारामगाथा ३२५ वेद, अठरा पुराणे यांचे सारच होय. या रूपाच्या प्राप्तीमुळे दुष्टाचा स्पर्शसुद्धा आपणांस कधी होत नाही. विष्णू- सहस्रनाम व रामकृष्ण हरी हा मंत्र वारंवार जपत जा तू. २ अनुपानात दिल्याने जर चूक होत असेल, तरी मग त्यास भोजनही देऊ नये. असे केले तरच औषध घेतल्याचा गुण येईल हे सत्यच मानावे. ३ आत्मस्वरूपाच्या आपल्या घरातून कधीही बाहेर पडूच नये. बाहेरच्या विचारांचा जरा वारा लागेल असे कधी करू नये. वायफळ बडबड करण्यांचेही दूर सारावे. भलत्याची संगत करू नये. ४ आपल्यापाशी जे एक शुद्ध चित्त आहे तेच श्रीहरीस द्यावे. ते दिल्याने नवनीतच दिल्याचे श्रेय लाभेल व घुसळल्यानंतर असार असे ताक राहील. ते तू दूर सारून टाक. कारण त्याच्या आत काहीच तथ्य नसते. ५ पश्चात्तापाच्या किंवा वैराग्याच्या पाण्याने तू न्हाऊन नीघ. डोक्यावरून सर्व दिशा तू पांघरून घे. तुझ्या अंगातील आशारूपी घाम सारा निघू दे. मग तुकाराम महाराज म्हणतात, यामुळे तू यापूर्वी जसा ब्रह्मस्थिती भावात होतास, तसाच परत होशील. त्यामुळे तुला वैराग्य चांगले प्राप्त होईल. ६ ६५१ मागुता हाचि जन्म पावसी । भोगिलें सुखदुःख जाणसी । हें तों न घडे रे सायासीं । कां रे अंध होसी जाणोनियां ॥ १ ॥ लक्ष चौऱ्याशीं न चुके फेरा । गर्भवासीं यातना थोरा । येउनि पडसी संदेहुपुरा । वोळसा थोरा मायाजाळीं ॥ २ ॥ पशु काय पापपुण्य जाणती । उत्तम मध्यम भोग भोगिती । कांहीं एक उपजतां मरती । बहिरों अंध होती पांगुळ मुकीं ॥ ३ ॥ नरदेह निधान लागलें हातीं । उत्तम सार उत्तम गती । होइन देवचि म्हणती ते होती । तरि कां चित्तीं न धरायें ॥ ४ ॥ क्षण एक मन स्थिर करुनी । सावध होई डोळे उघडोनी । पाहें वेद बोलिले पुराणीं । तुका विनवणी करीतसे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- मागुता-मानंतर, निधान-चांगले साधन अर्थ :- या जन्मात जी सुखदुःखे तू भोगली आहेस ती ध्यानात घेता, यानंतरही तुला माणसाचा जन्म येईल असे काही निश्चयाने घडेल असे नाही हे सर्व समजत असूनही तू याविषयी आंधळा का होतोस रे ? १ चौऱ्याऐंशी लक्ष योनींच्या फेऱ्या काही तुझ्या चुकायच्या नाहीत त्यावेळी गर्भवासातील थोर यातना तुला भोगा- वयास लागतील आणि चुकून माणसाच्या जन्मास आलास तर संदेहाच्या अवस्थेत सापडशील. या प्रपंचात देहादी वृत्तीचे संकट फार थोर आहे. २ तुझी अवस्था पशूसारखी होऊ देऊ नकोस पशू कधी पापपुण्याचा विचार तरी करतात का ? भोग भोगताना ते कधी उत्तम, मध्यम असा तरी विचार करतात का ? काही जन्म होताच मरतात, काही आंधळे होतात, काही पांगळे होतात, काही मुके होतात ३ तेव्हा नीट विचार कर. चांगले नरदेहासारखे साधन हाताशी आले आहे. हेच सर्व उत्तमाचे सार आहे उत्तमातील गती हीच आहे. याच मानवी देहाने मी देवच होणार असे म्हटले तर होण्यासारखे आहे तर मग या श्रीहरीस तू चित्तामध्ये का धारण करीत नाहीस ? ४ क्षणभर मन स्थिर करून मग सावध हो व डोळे उघडून पाहा. तुकाराम महाराज म्हणतात, वेद, पुराणे काय काय बोलतात, हे तू नीट पाहा, अशी माझी तुला विनंती आहे. ५ ६५२ दास्य करी दासांचें । उणें न साहे तयांचें । वाढिलें ठायींचें । भाणें¹ टाकोनियां धांवे ॥ १ ॥ ऐसा कृपेचा सागर । विटे उभा कटीं कर । सर्वस्यें उदार । भक्तांलागीं प्रगटे ॥ २ ॥ १ भाने.

हृदयीं श्रीवत्सलाछन । मिरवी भक्तांचें भूषण । नाहीं तयाचा सीण । सुख धरिले लातेचें ॥ ३ ॥ सत्यभामा दान करी । उजूर नाहीं अगोकारी । सेवकाच्या शिरीं । धरूनि चाले पादुका ॥ ४ ॥ राखे दारवटा बळीचा । सारथी¹ जाला अर्जुनाचा । दास सेवकाचा । होय साचा अंकित ॥ ५ ॥ भिडा नो बोलवे पुंडलिकाशीं । उभा मर्यादा पाठीशीं । तुका म्हणे ऐसी । का रे न भजा माउली ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - आणि-वाढलेले ताट उजूर-सबब, दारवटा-दरवाजा अर्थ - हा विठ्ठल किती दयाळू आहे आपल्या भक्ताची व सेवकांचीही सेवा हा नेहमी करीत असतो त्याचे काही कमी पडलेले त्याला सहन होत नाही त्यांना मदत करण्यासाठी हा देव वाढलेले ताटही बाजूस सारून धावत असतो १ असा हा कृपेचा मोठा सागर आहे हा विटेवर उभा असून याचे हात याच्या कमरेवर आहेत हा अतिशय उदार असून आपल्या भक्तांसाठी प्रकट झालेला आहे २ भृगूने दिलेली लाथ हा प्रेमाने आपल्या हृदयावर श्रीवत्सलाछन म्हणून मिरवीत असतो त्याचा काही त्याला त्रास वाटत नाही त्या लत्ताप्रहाराचेही त्याने सुखच धारण केले आहे ३ एकदा सत्यभामेने श्रीकृष्णाचे दान नारदास दिले, तरी कुठलीही सबब न सांगता नारदाच्याच पादुका डोक्यावर धारण करून या देवाने त्याचा सत्कार केला ४ हा बळीचा दरवाजा रक्षण कर- णारा झाला अर्जुनाचा सारथी हाच होता हा देव खरोखर आपल्या सेवकाचा सेवकच होऊन राहतो ५ मोठ्या संकोचाने हा देव पुंडलिकापाशी बोलला नाही त्याने सुचविल्याप्रमाणे तो पाठीमागे निमूटपणे उभा राहिला तुकाराम महाराज म्हणतात, अशी ही प्रेमळ माउली का रे भजत नाहीत ? ६ विवरण - ईश्वर हा आपला मायबाप असून त्यालाच सर्व चिंता असते तो किती कनवाळू आहे व आपल्या भक्तांवर तो कसा प्रसन्न असतो, त्यांना संकटात कशी मदत करतो, त्याचे दास्य तो स्वतः कसे करतो, याची अनेक उदाहरणे साधुसंत आपल्या वाङ्मयात देत असतात या अभंगात दिलेला नारदाची भृगूची अर्जुनाची, बळीची उदा- हरणे सर्वप्रसिद्ध अशीच आहेत ब्रह्मा, विष्णू व महेश यात श्रेष्ठ कोण याचा निवाडा करण्याचे काम भृगू ऋषीवर आले असताना तो श्रीविष्णूकडे आला त्यावेळी विष्णू झोपलेले होते भृगून एकदम आत जाऊन श्रीविष्णूच्या छाती वर लाथ मारली तरी विष्णू काही रागावले नाहीत उलट त्यांनी भृगूस वंदन करुन त्याचा लत्ताप्रहार भूषण म्हणून मिरविला नंतर भृगूने प्रसन्न होऊन सर्व देवात विष्णूच श्रेष्ठ असे म्हटल भृगूची ही लाथच श्रीविष्णूस श्रीवत्सलांछन म्हणून गौरवाची वाटते, अशी कथा पद्मपुराण भागवतपुराण यात आहे ६५३ हरि तैसे हरीचे दास । नाहीं तया भय मोह चिंता आस । होऊनि राहाती उदास । बळकट फास भवतीची ॥ १ ॥ धरूनि पाय त्यजिले जन । न लगे मान मृत्तिकाधन । कंठीं नाम अमृताचें पान । न लगे आन ऐसे जाले ॥ २ ॥ वाव तरी उवडच पोटीं । धीर सिंधु ऐसे जगजेठी । कामक्रोधा न सुटे मिठी । गिहे तरी वेठीं राबविती ॥ ३ ॥ बळें तरि नागवती फाळा । लोन तरि सकळांच्या तळा । उदार देहासी सकळा । जाणोनि कळा सर्व नेणते ॥ ४ ॥ १ रथी

सार्थ तुकारामगाथा ३२७ संसार तो तयांचा दास । मोक्ष तें' पाहातसे वास । Riddhisiddhi deshavata tras. Na shivati yas vaishnavajan ॥ ५ ॥ जन्ममृत्युस्वप्नांसारिखें । आप त्यां न दिसे पारखें । तुका म्हणे अखंडित सुखें । वाणी येदे मुखें प्रेमामृताची ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- वाव-अवकाश, जागा, वेठीं-विगारीने, गिन्हे-ग्रह, देशवटा-देशाच्या हद्दीबाहेर अर्थ :- हा श्रीहरी जसा आहे, तसेच त्याचे दासही भय, मोह, चिंता व आशा यांच्या विरहित आहेत. ते सर्वस्वी उदास झाले आहेत. त्यांनी भवतीची कास बळकटपणे घातली आहे. १ या श्रीहरीचे पाय ज्यांनी लोकांचा त्याग करून धरिले आहेत, त्यांना कुठल्याही मानसन्मानाची जरूरी नसते. त्यांना धनही मातीच्या किंमतीचे वाटते. त्यांच्या मुखांत नेहमी नामामृताचेच पान असते. त्यांना दुसऱ्या कशाचीच जरूरी नसते. २ त्यांच्या पोटांत दयेस फार मोठी जागा असते. समुद्राप्रमाणे ते धीरगंभीर असतात. त्यांची ईश्वराच्या पायांवरील मिठी कामक्रोधादि- कांनाही सुटत नाही. हे ग्रहांसारखे तापदायक असले तरी ते त्यांना विगारीने वेठीला धरतात. ३ हे श्रीहरीचे भक्त इतके बलवान आहेत की, ते प्रत्यक्ष काळासही पराजित करतात आणि नम्र तर इतके आहेत की, सर्वांच्या खाली क्रमाने उभे राहतील. देहाविषयी हे सर्वस्वी उदार आहेत सर्व कला यांनी जाणलेल्या असूनही न जाणल्या- सारखे ते वागतात ४ इतरांना कष्टदायक वाटणारा संसार हा त्यांचा दास बनतो. मोक्ष तर यांचीच वाट पाहात असतो. रिद्धीसिद्धींना यांनी आपल्या देहरूपी देशाच्या सीमेपलीकडे हद्दपार केले असल्याने त्याचाही त्रास यांना कधी होत नाही. अशा रिद्धीसिद्धींना वैष्णव लोक चुकूनही स्पर्श करीत नाहीत. ५ हे हरीचे दास जन्ममृत्यूंनाही स्वप्नासारखेच मानतात. त्यांना आपले अथवा परक्याचे असा भेद मुळीच दिसत नाही. तुकाराम महाराज म्हणतात. ते निरंतरपणे सुखी असतात. त्यांच्या वाणीतून अखंडपणे प्रेमामृतच बाहेर स्रवत असते. ६ ६५४ बहुत जाचलों संसारीं । वसें गर्भी मातेच्या उदरीं । लक्ष चौऱ्याशी योनिद्वारीं । जालों भिकारी याचक ॥ १ ॥ जिणें पराधीन आणिकां हातीं । दृढ पाशीं बांधलों संचितीं । प्रारब्ध क्रियमाण सांगाती । भोवंडिती सत्ता आपुलिया ॥ २ ॥ न सरे पोट नाहीं विसांवा । नाहीं नेम एक ठाव गांवा । नाहीं सत्ता न फिरे ऐसी देवा । लाही' जीवा खापरीं तडफडी ॥ ३ ॥ काळ बहुत गेले ऐसिया रीती । आणीक पुढें नेणों किती । खंडणा नाहीं पुनरावृत्ती । मज कल्पांतीं तरी वेगळें ॥ ४ ॥ ऐसें दुःख कोण हरील माझें । कोणा भार घालूं आपुलें ओझें । भवसिंधुतारक नाम तुझें । धांवसि काजें आडलिया ॥ ५ ॥ आतां धांव घालीं नारायणा । मजकारणें रंका दीना । गुण न विचारों अवगुणा । तुका करुणा भाकीतसे ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा:- भोवंडिती-गरगर फिरवितात. अर्थ:-देवा, मी या संसारात फार गांजून गेलो आहे. चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरून मी मातेच्या उदरात वास केला असून मी सुखासाठी दोन याचक व भिकारी बनलेलो आहे. १ माझे हे जगणेही दुसऱ्याच्या स्वाधीन आहे. कर्मबंधनाच्या फासात मी बांधून पडलो आहे. माझयाबरोबर माझे प्रारब्ध व क्रियमाण असून त्याच्या सत्तेने ते मला गरगर निरनिराळया जन्मांतून फिरवीत आहेत. २ इतके भ्रमण करूनही माझे पोट भरत नाही; की १ तो, २ लाहे.

विसावा मला मिळत नाही कुठल्याही एका गावात राहण्याचा माझा नेम नाही कुठे न फिरता एका जागी खिळून असावे हे माझ्या सत्तेत नाही देवा, खापरीत जशी लाही भाजत असताना तडफडते, तशी अवस्था माझ्या जीवाची झाली आहे ३ अशाच प्रकारचा काळ पुष्कळ गेला आणखी असा किती जाणार आहे, कुणास माहीत ? मरपाताची वेळ आली तरी, पुन पुन जन्मास मण्यास खट पडत नाही ४ असे माझे हे दुख देवा, कोण दूर करील ? कुणावर मी या ओझ्याचा भार घालू ? भवसिंधू तरून नेणारी नौका म्हणजे तुझे नाम आह कुणाचे काही काम अडवून राहिले शी तू धावून येतोस ५ नारायणा मग आता माझ्यासाठी एवढा धावून य ना मी दीन आहे गरीब आहे तुकाराम महाराज म्हणतात, माझ्यासारख्या अवगुणी माणसांस गुणही विचारू नका अशी करुणा मी देवा तुमच्याजवळ भाकीत आहे ६ ६५५ जव हे सकळ सिद्ध आहे । हात चालावया पाये । तव तू आपले स्वहित पाहें । तीर्थयात्रे जायें चुको नको ॥ १ ॥ जव काळ असे दुरी ठेला । तब तू हरिगुण गायें आइक वहिला । मनीं भाव धरुनि भला । न वचे त्याला चुको नको ॥ २ ॥ जोडोनि धन न घलीं१ माती । ब्रह्मवृंद पूजन यती । सत्य आचरण दया भूतीं । करीं सांगाती चुको नको ॥ ३ ॥ दशा यौवन वाणली अंगीं । पांगिला नव्हे विषयसंगी । काम क्रोध लोभ मोह त्यागीं । राहे सत्संगीं चुको नको ॥ ४ ॥ मग तेथें न चले कांहीं । सत्ता संपदा राहेल ठायींच्या ठायीं । पुढें सचित जाईल ग्वाही । तुका म्हणे ते ही यमआज्ञा ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीका - पांगिला-पंगू अप - जोपर्यंत हातपाय नीट धडधाकटपणे चालत आहेत, तोपर्यंत तू आपले स्वहित नीट पाहून राहा तीर्थयात्रांना जाण्यास चुकू नकोस १ जोपर्यंत यमाची पावले दूरच आहेत तोपर्यंत तू आपले स्वहित नीट साधून ठेव, नेहमी श्रीहरीचे गुण तू एश्वत जा मनात शुद्ध भाव धारण करून श्रीहरीच्या सेवेत कधी चुकू नकोम २ सारखा पैसाच पैसा जमवून मातीस घालयू नकोस ब्राह्मण यती सन्यासी यांची पूजा करण्यात त्या द्रव्याचा खर्च करावा नेहमी सत्याचे आचरण करावे सर्व भूतावर दयेची दृष्टी असावी या सर्वांचा ठेवा जवळ असावा यात तू कधी चुकू नकोस ३ जोपर्यंत अंगात तारुण्य आहे व विषयभोगांनी पंगुत्व आलेले नाही तोपर्यंतच काम, क्रोध, लोभ, मोह याथा त्याग करावा सतांच्या संगतीत राहण्यास कधी चुकू नका ४ आयुष्याची अरार एकदा आली की, मग काही उपाय चालणार नाही सत्ता, संपत्ती या गोष्टी जागच्या जागी राहतील व ज कर्म तुम्ही साठविले असेल ते साक्ष देत पुढ जाईल तुकाराम महाराज म्हणतात मग त्यावरून तुम्हास यमाची आज्ञा होईल ५ ६५६ ऐक पाडुरंगा एक मात । कांहीं बोलणे आहे एकांत । आम्हा जरी तारील सचित । तरी उचित काय तुझें ॥ १ ॥ उसने फेडिता धर्म तो कोण । काय तया मानवेल जन । काय गा मिरवूनि भूषण । वाया थोरपण जनामध्ये ॥ २ ॥ अन्न जरी न मिळे तयासी देणें । आगंतुक पात्र उचित दान । उपकार तरी धनमश्रीपणें । जरी देणेंघेणें नाहीं आशा ॥ ३ ॥ १ घाली