सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 431, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ३९३ जतन झाले । मग तामाचे काय आलें ?', 'प्रेम व्याज देई हरी । माझा हिशेब लवकरी करी' यासारख्या अनेक वचनांतून तुकोबांनी व्यापारी वृत्तीला वरवर तरी विसंगत वाटणाऱ्या परमार्थवृत्तीशी भावपूर्ण अंत करणाने रंगविले आहे ८३१ लागलिया मुख स्तना । घाली पान्हा माउली ॥ १ ॥ उभयता आवडी लाडें । कोडें कोड पुरतसे ॥ २ ॥ मेळविता अंगें अंग । प्रेमें रंग वाढतो ॥ ३ ॥ तुका म्हणे जड भारी । अवघें शिरीं जननीचे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - कोड-हौस, जड-ओझे अर्थ - या विठाईमाउलीच्या स्तनास मुख लावताच तिच्या प्रेमाला पान्हा फुटतो १ या ठिकाणी माउली व तिचे मूल या उभयतांच्या लाडास व कौतुकास हौसेचे भरते येते २ अंग अंगाला मिळवून, मुलाला पोटाशी धरून प्रेमाचा रंग बहारीने वाढतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, या प्रकारे आईच्या शिरावर मुलाची फार मोठी जबाबदारी असते याच्या कल्याणाचे फार मोठे ओझे तिला वागवावे लागते ४ ८३२ अवगुण तो कोणी नाही प्रतिष्ठािले । मागें होत आले शिष्टाचार ॥ १ ॥ दुर्बळाच्या नावे पिटावा डांगोरा । हा तो नव्हे बरा सत्यवाद ॥ २ ॥ मद्य आणि मधु एकरासी मावे । तरि का ते खावे आधारे त्या ॥ ३ ॥ तुका म्हणे माझा उच्छिष्ट प्रसाद । निवडी भेदामेद दृष्टिन्यायैं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - एकरासी-एकाच वर्गातील अर्थ - यापूर्वी अवगुणाची अथवा दुर्गुणाची प्रतिष्ठा बळच कुणीही केलेली नाही पूर्वोपासून चांगल्या आचाराचेच पालन होत आले आहे १ अशी स्थिती असताना उगाच दुबळ्या माणसाच्या नावाने डांगोरा पिटावा, हे काही ठीक नाही ही गोष्ट सत्यालाही धरून नाही २ मद्य व मध या वस्तू एकाच वर्गातील असल्या तरी, मद्याचे सेवन मधाच्या आधाराने करणे इष्ट आहे काय ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, संतांच्या कृपेने मेघ- वृष्टीप्रमाणे मला उपदेशाचा उच्छिष्ट प्रसाद मिळालेला असल्याने, त्यायोगे गुण व अवगुण याची अथवा भेद व अभेद याची निवड मी करू शकतो ४ ८३३ मूर्ती भगवंत । हा तो जाणतों संकेत ॥ १ ॥ भारी मोकलितो बाण । ज्याचा त्यासी कळे गुण ॥ २ ॥ करावा उपदेश । निवडोनि तरि दोष ॥ ३ ॥ तुका म्हणे वाटे । चुकता आडराने कांटे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - मोकलितों-सोडतो अर्थ - सर्व भूतमात्रांमध्ये भगवंताचाच अंश भरून राहिला आहे, हे तर मी जाणतो १ म्हणूनच मी शब्दरूपाचे तीक्ष्ण बाण सोडीत असतो या बाणाचा गुण ज्याचा त्यास बरोबर समजतो २ दोष वगळून योग्य तो उपदेश करावा, हेच मी जाणतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, नीट सरळ मार्ग सोडून जर आडवाटेने गेलात तर पायांना काटे टोचतील मात्र ४ ८३४ आम्हा हे कौतुक जगा द्यावी नीत । करावे फजित चुकती ते ॥ १ ॥ कासयाचा धाक एकाच्या निरोपे । काय व्हावे कोपें जगाचिया ॥ २ ॥ तु गा ५०