सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 538, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंआयोध्येत आनंदोआनंद होऊन गेला. सर्वत्र जयजयकार झाला. प्रभू रामचंद्रानी बंधू भरताला प्रेमाने आलिंगन दिले २ आयोध्येच्या नारी, रामलक्ष्मण व सीतामाई याना प्रीतीने ओवाळून ओक्षण करू लागल्या. ३ सर्वत्र रामराज्य झाल्यामुळे आनंदी आनंद पसरला. गाई, वास्ने, स्त्री, पुरुष, मुले, सर्वांनाच आनंद झाला, असे तुकाराम महाराज म्हणतात. ४ ११०६ जाले रामराज्य काय उणे आम्हांसी । धरणीं घरी पीक¹ गाई वोळल्या म्हैसी ॥ १ ॥ राम वेळोवेळां आम्ही गाऊं ओविये । दळितां कांडितां जेवितां गे वाइये ॥ २ ॥ स्वप्नीं हो दुःख कोणी न देखे डोळां । नामाच्या गजरे भय सुटले काळा ॥ ३ ॥ तुका म्हणे रामें सुख दिलें आपुले । तयां गर्भवासी येणे जाणे खुंटलें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - वोळल्या-दूध देत्या झाल्या अर्थ - आता रामाचे राज्य झाले असल्यावर मग आम्हास काय कमी आहे? पृथ्वीवर उत्तमपैकी पीक वेळच्या वेळी येत राहिले. गाई म्हशी पुष्कळ दूध देत्या झाल्या १ आता या रामाचे ध्यान आम्ही आमच्या ओवीत रोज रोज गाऊ दळताना, कांडताना, जेवण करिताना, याच रामनामाचा जप आम्ही करीत राहू. २ स्वप्नातसुद्धा कुणासही दुःख दिसेनासे झाले. रामनामाच्या गजरामुळे प्रत्यक्ष यमासही भीतीने थरकाप सुटला. ३ तुकाराम महाराज म्हणतात, या रामचंद्रानी आपले स्वसुख सर्वांना दिले असल्याने, त्याच्या गर्भवासाचे दुःख संपले आहे, असे समजावे. जन्ममृत्यूच्या फेरा त्याना पडत नाहीत. ४ ११०७ अहल्या जेणे तारिली रामें । गणिका परलोका नेली नामें ॥ १ ॥ रामहरे रघुराजहरे । रामहरे महाराजहरे ॥ २ ॥ कंठ शीतळ जपतां शूळपाणी । राम जपतां अविनाशभवानी ॥ ३ ॥ तारकमंत्रश्रवण काशी । नाम जपतां वाल्मीक ऋषि ॥ ४ ॥ नामजप बीजमंत्र नळा । सिंधु तरती ज्याच्या प्रतापें शिळा ॥ ५ ॥ नामजप जीवन मुनिजना । तुक्यास्वामी रघुनंदना ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - शूळपाणी-ज्याच्या हातात शूल आहे असा शंकर, भवानी-पार्वती अर्थ - या रामनामाचे महत्त्व किती मोठे आहे पाहा या रामनामामुळे अहल्येचा उद्धार झाला. गणिका याच नामामुळे उद्धरून गेली १ अशा या रामाच्या नावाचा, रामहरे रघुराजहरे असा जप एकसारखा करा ना. २ याच रामनामाचा जप केला, तेव्हा समुद्रमथनाच्या वेळी निघालेल्या हलाहल विषामुळे ज्याच्या कंठाची आग होत होती, त्या महादेवाचा कंठ शीतल झाला याच रामनामाच्या जपामुळे पार्वतीदेवीसही अविनाशी पदाची प्राप्ती झाली. ३ काशीस राहून याच तारकमंत्राचा उच्चार केला असता, सर्वांचा उद्धार होतो. याच नामाचा जप वाल्मीकी ऋषींनी करून स्वतःस पावन करून घेतले. ४ नळ नावाच्या वानरास हाच एक नाममंत्र बीजमंत्र म्हणून मिळाला होता. याच रामनामाच्या सामर्थ्यामुळे समुद्रावर निर्जीव दगडसुद्धा तरले. ५ मुनिजनानाही याच रामनामामुळे जीवन कृतार्थ वाटते. या तुकयाचाही स्वामी हाच थोरघुनंदन आहे ६ ११०८ मी तो अल्प मतिहीन । काय वर्णूं तुझे गुण । उदकीं तारिले पाषाण । हे महिमान नामाचे ॥ १ ॥ नाम चांगले चांगलें । माझे कंठीं राहो भले । कपिकुळ उद्धरिले । मुक्त केले राक्षसां ॥ २ ॥ १ पिका