सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 7, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंतुकाराम महाराजांचे संक्षिप्त चरित्र तुकाराम महाराज यांचा जन्म शके १५३० सन १६०८ या वर्षी इंद्रायणी नदी तीरावर असलेल्या देहू या गावी एका पवित्र अशा कुळात झाला. तुकारामबुवांचे आठवे पूर्वज विश्वंभरबाबा हे मोठे भगवद्भक्त असल्याने त्याच्या वेळेपासूनच या कुळात विठ्ठलभक्ती, नामस्मरण व पंढरीची वारी याचे माहात्म्य वाढलेले होते. तुकाराम बुवांच्या घरचा व्यवसाय दुकानदारीचा, वाण्याचा असून घरीं थोडीफार महाजनकी अथवा सावकारीही होती. 'याती शूद्र वैश्य केला वेवसाय,' 'बरे देवा कुणबी केलो,' 'शूद्रवंशीं जन्मलों' इत्यादी शब्दांवरून तुकारामबुवांची जात शूद्र मानण्याचे कारण नाही, ते सामान्यत: मराठी कुणबी या कुळातील असावेत. तुकाराम महाराजांच्या वडिलांचे नाव बोल्होबा व आईचे नाव कनकाई असे असून यांचीही विठ्ठलाची उपासना चांगली मनापासून असे. आषाढी कार्तिकीची वारी याची कधी चुकत नसे. अन्नदान, गरिबांविषयी दया, संतांचा सन्मान, विठ्ठलावर दृढ निष्ठा, भजनपूजन, सदाचार याचे महत्त्व, या घरी विशेष प्रकारचे असे. सावकारी, व्यापारधंदा व महाजनकी प्रथम प्रथम चांगलीच चालत असावी. तुकोबांना आयुष्याच्या पहिल्या बारा तेरा वर्षात विशेष चिंता नसावी. बरोबरीच्या मुलांच्यात खेळावे, इंद्रायणीवर स्नान करावे, विठ्ठलाची पूजा करावी आणि बापाबरोबर दुकानदारी समजावून घ्यावी, असा साधा जीवनक्रम बुवांचा प्रथम असावा. तुकोबांना बंधू दोन होते. एक थोरला सावजी व दुसरा धाकटा कान्होबा. त्याच्या आईवडिलांनी आपल्या मुलांची लग्ने करून दिली. तुकोबांचे लग्न त्यांच्या वयाच्या चौदाव्या वर्षी झाले. बायकोचे नाव रखमाबाई. परंतु ही नेहमी आजारी असल्याने अप्पाजी गुळवे या एका श्रीमंत सावकाराच्या मुलीशी तुकोबांचे दुसरे लग्न झाले, व जिजाबाई तथा आवली त्यांच्या आयुष्यात येऊन स्थिर झाली. संसाराचे सुख मातापित्याच्या सावलीत बुवांनी पहिली काही वर्षे उत्तम प्रकारे भोगले, पण पुढे काळच पालटल्यासारखे झाले. थोरला भाऊ सावजी हा मूळचाच अतिशय विरक्त असल्यामुळे संसार तुकोबांनी पाहावा हे ओघानेच आले, व तुकोबा वडिलांच्या बरोबर व्यवहार पाहू लागले. परंतु पुढे संसारात एकामागून एक अशी संकटपरंपरा उभी राहिली. प्रथम वडील, व नंतर दोनतीन वर्षात आई, यांच्या मृत्यूने तुकोबांच्या मनावर आघात झाला आणि ही मृत्यूची परंपरा वाढत गेली. थोरली भावजय मरण पावली, पहिली बायको अन्नअन्न करिताना मरून गेली, पहिला मुलगा संताजी मरण पावला. थोरला भाऊ वैराग्याच्या भरात घर सोडून निघून गेला. सर्व संसाराचा भार एकाएकी तुकोबांच्या खांद्यावर येऊन पडला. तशात बाहेरची परिस्थिती विचित्रपणे पालटली. दुष्काळाने उग्र स्वरूप धारण केले, दुकानदारी बुडाली, कर्ज वाढत राहिले. येणे वसूल होईनासे झाले, दुकानाचे दिवाळे निघाले. या सर्व संकटांनी तुकारामबुवांचे मन उद्विग्न झाले. मूळचेच भक्तिप्रवण मन आता या संसारातून उठून जाऊ पाहात होते. दुसरी बायको कर्कशा असल्याने तही वजन ववाना फारसे या वैराग्याच्या काळात राहिले नाही. त्यांना संसाराचा व घराचा वीट आला. 'संसाराच्या तापें तापलों मी देवा' या अभंगात आपल्या संसाराची वाताहत कशी झाली, याचे मोठे हृदयभेदक चित्र बुवांनी काढले आहे. त्यामुळे त्यांचे चित्त संसारात रमण्याऐवजी श्रीविठ्ठला- कडे केंद्रित झाले. 'विठो तुझें माझें राज्य । नाहीं दुसऱ्याचे काज' अशा एकत्वाच्या नात्याने तुकाराम बुवा फटकळपणे घरातून उठून जवळच असणाऱ्या भामनाथाच्या किंवा भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन भजन, ज्ञानेश्वरी, नाथभागवत, गीता याचे वाचन, विठ्ठलचिंतन याच्याच नादात दंग होऊन गेले.