छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)
Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj
के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा
पृष्ठ 101, कुल 127 में से
संदर्भ में पढ़ेंसिद्दी व मराठे यांच्यामध्ये आरमारी लढाया सुरू झाल्या. विशेष म्हणजे इंग्रजांनी शिवाजीविरुद्ध सिद्दींना मदत सुरू केली. मार्च १६७४ मध्ये सिद्दी संबूळने सातवली नदीत असलेल्या मराठ्यांच्या आरमारावर जोरदार हल्ला केला. त्यावेळी दौलतखान हा मराठ्यांचा आरमारप्रमुख होता. त्याने मोठा पराक्रम गाजवून सिद्दींचा हल्ला परतावून लावला. स्वतः दौलतखान व सिद्दी संबूळ दोघेही जखमी झाले. मराठ्यांनी आपल्या आरमाराचा बचाव केला. सिद्दी विरोधी लढा देण्यात आपले लोक कमी पडणार नाही हे ओळखून १६७५ मध्ये शिवाजीने जंजिऱ्यावर हल्ला करण्याची पुन्हा तयारी केली. ५७ जहाजांचे जंगी आरमार घेऊन शिवाजीने जंजिरा किल्ल्याला वेढा घातला. परंतु किल्ल्यावरून तोफांचा जबरदस्त मारा करून आणि समुद्रातून लढाऊ जहाजांच्या सहाय्याने हल्ला करून सिद्दी संबूळने शिवाजीचा वेढा मोडून काढला. जंजिरा जिंकणे हे शिवाजीचे एक स्वप्न होते. पण ते साकार होण्याची चिन्हे दिसेनात. पुढील वर्षी म्हणजे १६७६ मध्ये शिवाजीने मोरोपंत पिंगळे यांना १०,००० फौज घेऊन जंजिरा जिंकण्यासाठी पाठविले. किल्ल्याला वेढा देऊन मोरोपंतांनी तोफांचा भडीमार सुरू केला. या प्रसंगी लाय पाटील नावाचा एका सामान्य मराठ्याने रात्रीतून किल्ल्याचा तट चढून जाण्यासाठी शिड्या लावण्याची करामत केली. परंतु ऐनवेळी ही योजना फसली. मराठे तटापर्यंत चढू शकले नाहीत. मुघलांकडून ऐनवेळी सिद्दीना कुमक मिळाली आणि मोरोपंतांना माघार घ्यावी लागली. त्यानंतरही दौलतखानाला पाठवून जंजिरा जिंकण्याचा शिवाजीने प्रयत्न केला. परंतु हा प्रयत्नही अयशस्वी ठरला. शेवटी शिवाजीचे हे स्वप्न अपूरेच राहिले. खांदेरी-उंदेरी १६७६ मध्ये जंजिऱ्यात आणखी एक क्रांती झाली सिद्दी संबूळ आणि सिद्दी कासिम यांच्यामध्ये संघर्ष होऊन सिद्दी कासिमने आरमाराची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. तेव्हा सिद्दी संबूळने शिवाजीकडे मदतीची याचना केली. जंजिऱ्यावर अधिपत्य निर्माण करण्याची ही एक सुवर्णसंधी चालून आली होती. परंतु सिद्दी कासिम याला मुघल आणि इंग्रज यांच्याकडून सतत कुमक मिळत असल्यामुळे त्याने सिद्दी संबूळला दाद दिली नाही. अशाप्रकारे सिद्दी आणि मराठे यांच्यात संघर्ष चालू असताना खांदेरी-उंदेरी प्रकरण उद्भवले. १६७९ मध्ये खांदेरी बेटावर तटबंदी बांधण्याचे काम शिवाजीने सुरू केले. तेव्हा सिद्दी कासीमने जानेवारी १६८० मध्ये खांदेरीजवळ असलेले उंदेरी बेट ताब्यात सिद्दी, पोर्तुगीज आणि इंग्रज ९५