छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)
Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj
के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा
पृष्ठ 103, कुल 127 में से
संदर्भ में पढ़ेंत्यांची मदत घेण्याचे राजकारणही शिवाजीला करावे लागत असे आणि म्हणून त्याने पोर्तुगीजांशी उघड शत्रुत्व कधीच स्वीकारले नाही. सुरतेची लूट, स्वराज्यात आणतांना पोर्तुगिजांनी शिवाजीला अप्रत्यक्ष मदत केली. १६६६ मध्ये जेव्हा शिवाजी आग्याहून औरंगजेबाच्या कैदेतून सुटून आला तेव्हा गोव्याच्या पोर्तुगीज व्हाइसरॉयने शिवाजीची तुलना अलेक्झांडर आणि सिझर यांच्याबरोबर केली होती आणि शिवाजीचे मनःपूर्वक अभिनंदन केले होते. वरकरणी मैत्रीचा देखावा चालू असतांना शिवाजीच्या विरोधकांना आश्रय देण्याचे धोरणही पोर्तुगिजांनी आंगिकारले होते. लखम सावंत, केशव नाईक, केशव प्रभू इत्यादींना आश्रय देऊन शिवाजीच्या प्रदेशावर हल्ले करण्यास पोर्तुगीज त्यांना उतेजन देत होते. या गोष्टीची शिवाजीला विलक्षण चीड आली होती. शिवाय बारदेश भागातील हिंदूंचे सक्तीने धर्मांतर घडवून आणण्याचा प्रयत्नही पोर्तुगीज करीत होते. त्याचाही शिवाजीला अतिशय राग आलेला होता. म्हणून नोव्हेंबर १६६७ मध्ये शिवाजीने बारदेशवर स्वारी केली. या स्वारीमध्ये मराठ्यांनी बारदेशमधील अनेक गावे लुटली. लखम सावंत, केशव नाईक वगैरे सुरक्षित ठिकाणी पळून गेले. पोर्तुगिजांनी पराभव कबूल करून शिवाजीशी तह केला. या तहाप्रमाणे लखम सावंत आणि केशव नाईक यांना पोर्तुगिजांनी आश्रय देऊ नये असे ठरविण्यात आले आणि त्याप्रमाणे या दोन्ही देसायांना गोव्याबाहेर हाकलून देण्यात आले. एक धाडसी योजना प्रत्यक्ष गोव्यामध्येच उठाव करून पोर्तुगिजांना धडा शिकविण्याचा शिवाजीने निश्चय केला. नोव्हेंबर १६६८ मध्ये सुमारे चार-पाचशे लोक शिवाजीने गोव्यात पाठवून दिले त्यानंतरही आणखी काही लोक पाठविले. ही संख्या बरीच वाढल्यानंतर या लोकांनी अचानकपणे गोव्यात उठाव करावा आणि पोर्तुगिजांची सत्ता उध्वस्त करावी अशी योजना शिवाजीने आखली होती. परंतु शिवाजीच्या या योजनेचा सुगावा गोव्याच्या व्हाइसरॉयला लागला. त्याने बारकाईने तपास शिवाजीचे लोक शोधून काढले. त्यानंतर शिवाजीच्या वकीलाला भर दरबारात बोलावून त्याची नालस्ती केली आणि त्याला हाकलून दिले. शिवाजीच्या सर्व लोकांनाही गोव्याबाहेर काढून दिले. अशाप्रकारे ही धाडसी योजना फसली. त्यानंतरही प्रत्यक्ष गोव्यावर स्वारी करण्याचा शिवाजीचा मानस होता. परंतु मुघलांबरोबर संघर्ष चालू असल्यामुळे त्याने सबुरीचे धोरण स्वीकारले आणि फेब्रुवारी १६७० मध्ये पोर्तुगिजांशी सलोख्याचा तह केला. सिद्धी, पोर्तुगीज आणि इंग्रज ९७