छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)
Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj
के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा
पृष्ठ 106, कुल 127 में से
संदर्भ में पढ़ेंनसते उपद्व्याप करणाऱ्या इंग्रजांना संधी येताच चांगला धडा शिकविण्याची खूणगाठ महाराजांनी मनाशी बांधली. पन्हाळ्याहून सुटका झाल्यानंतर १६६१ मध्ये शिवाजी महाराजांनी राजापूरच्या वखारीवर हल्ला केला. रेव्हिंग्टनला कैद केले. गिफर्ड आणि मिचेल हे दोन इंग्रजही रेव्हिंग्टनबरोबर पन्हाळ्यास आले होते. त्या दोघांनाही कैद केले. राजापूरची वखार संपूर्णपणे लुटली. हे इंग्रज कैदी जवळ जवळ दीड- दोन वर्षे शिवाजी महाराजांच्या कैदेत होते. त्यांना वेगवेगळ्या किल्ल्यांवर हलविण्यात येत असे. इंग्रजांनी पुन्हा आपल्या वाटेला जाऊ नये म्हणून शिवाजी महाराजांनी मुद्दाम त्यांना कडक वागणूक दिली. सुरतेवर हल्ला शिवाजी महाराजांनी १६६४ व १६७० या दोन वर्षात अचानकपणे सुरतेवर हल्ला करून यथेच्छ लूट केली. इतर पाश्चात्याप्रमाणे सुरतेला इंग्रजांच्याही वखारी होत्या. पहिल्या लुटीच्या वेळी इंग्रजांनी आपल्या संरक्षणासाठी लढा देण्याचा प्रयत्न केला. परंतु जे निमूटपणे खंडणी देतील त्यांना कोणताही त्रास दिला जाणार नाही असे शिवाजीने अगोदरच जाहीर केले होते त्यामुळे प्रत्यक्ष लढा देण्याची पाळी इंग्रजांना आली नाही. तरीपण वखारवाल्यांच्या पत्रातून इंग्रज अधिकाऱ्यांच्या साहसाची वर्णने आलेली आढळतात. १६७०मध्ये शिवाजी महाराजांनी जेव्हा दुसऱ्यांदा सुरत लुटली तेव्हा मास्टर नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याने पराक्रमाची शर्थ करुन आपल्या वखारीचे रक्षण केले असे वर्णन समकालीन पत्रांमधून आढळते. परंतु या दुसऱ्या लुटीच्या वेळीसुद्धा जे निमूटपणे खंडणी देतील त्यांना त्रास दिला जाणार नाही असे शिवाजी महाराजांनी जाहीर केले होते. एका उल्लेखावरून तर असे दिसते की इंग्रजांनी अगोदरच शिवाजीशी मित्रत्वाचा तह केला होता. मुंबईकर इंग्रज मुंबई हे लहानसे बेट प्रारंभी पोर्तुगिजांच्या ताब्यात होते. जेव्हा पोर्तुगीज राजकन्येचा इंग्लंडच्या राजपुत्राशी विवाह झाला तेव्हा पोर्तुगिजांनी आंदण म्हणून मुंबई हे बेट इंग्रजांना दिले. या बेटावर साधारणपणे २००० लोकवस्ती होती. त्यामध्ये बहुसंख्य कोळी लोक होते. इंग्लंडच्या राजाने १६६४ मध्ये मुंबई बेट ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने दिले. जेव्हा शिवाजी महाराजांनी १६६४ मध्ये सुरतेची लूट केली तेव्हा धूर्त इंग्रजांनी मुंबईला आपले बस्तान बसविण्याचे १०० छत्रपती शिवाजी महाराज