छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)
Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj
के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा
पृष्ठ 107, कुल 127 में से
संदर्भ में पढ़ेंठरविले. सुरतेहून ईस्ट इंडिया कंपनीचे जे व्यवहार चालत होते ते आता मुंबईहून होऊ लागले. मुंबई हे आपले प्रमुख केंद्र बनविल्यानंतर शिवाजी महाराजांचे आपल्याला संरक्षण मिळेल किंवा महाराजांच्या आश्रयाने आपल्याला निर्धास्तपणे व्यापार करता येईल अशी इंग्रजांची धारणा होती. १६७० मध्ये शिवाजी महाराजांनी आक्रमक धोरण स्वीकारून मुघलांविरुद्ध चौफेर लढा सुरू केला. या लढ्याचा एक भाग म्हणजे मुंबईजवळील कल्याण-भिवंडी हा मोक्याचा प्रदेश महाराजांनी आपल्या वर्चस्वाखाली आणला. या भागात बराच मोठा जंगलमय प्रदेश असून त्या जंगलातून इंग्रज लोक चोरून लाकूडफाटा नेत असत. महाराजांनी या चोरट्या व्यवहारावर बंदी घातली. १६७० मध्येच सुरतेवर आणखी एक स्वारी करून शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा लूट केली. या लुटीचा धसका इंग्रजांनी घेतलेला होता. राजापूरची वखार शिवाजीने लुटल्यापासून इंग्रजांना आपल्या वखारी सुरक्षित राहतील किंवा नाही याची सतत काळजी वाटत होती आणि म्हणूनच शिवाजी महाराजांबरोबर मित्रत्वाचा तह करून आपल्या वखारींना संरक्षण मिळविण्याचे प्रयत्न त्यांनी सुरू केले होते. त्यासाठी मार्च १६७२ मध्ये स्टिफन डस्टिक या मुत्सद्यास इंग्रजांनी शिवाजी महाराजांकडून बोलणी करण्यासाठी पाठविले. फार मोठा नजराणा घेऊन डस्टिक लंडन बोटीने भारतामध्ये आला आणि १६७२ च्या उन्हाळ्यात त्याने शिवाजी महाराजांची भेट घेतली. डस्टिकने राजापूरच्या वखारीची नुकसान भरपाई महाराजांकडे मागितली आणि राजापूरला नव्याने वखार उघडण्याची परवानगी दयावी अशी मागणी त्याने महाराजांकडे केली. परंतु महाराजांनी केवळ ५००० होन नुकसानभरपाई देण्याचे मान्य केले आणि पुन्हा वखार उघडण्याच्या मागणीचा सहानभूतीने विचार करू असे आश्वासन दिले. थोडक्यात डस्टिकची भेट विशेष फलद्रुप झाली नाही. इंग्रजांना शिवाजी महाराजांच्या धोरणाविषयी खात्री वाटेना. स्वतः शिवाजी महाराजांनी व्यापारी व्यवहाराविषयी वाटाघाटी करण्यासाठी आपले वकील इंग्रजांकडे पाठविले. पण त्यातून काही निष्पन्न झाले नाही. एप्रिल १६७३ मध्ये मराठ्यांनी कर्नाटकात घुसून हुबळी येथे असलेली इंग्रजांची वखार लुटली तेव्हा त्या वखारलुटीची नुकसान भरपाई मागण्यासाठी थॉमस निकल्स नावाच्या मुत्सद्यास इंग्रजांनी महाराजांकडे पाठविले. थॉमस निकल्स आणि शिवाजी महाराज शिवाजी महाराजांना खूष करण्यासाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी निकल्सला सिद्धी, पोर्तुगीज आणि इंग्रज १०१