छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)
Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj
के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा
पृष्ठ 118, कुल 127 में से
संदर्भ में पढ़ेंवतनदारांचा मनस्वी तितकारा होता. वतनदारी पद्धती बंद करावी असा कठोर विचारही शिवाजी महाराजांनी केला होता हे सभासद बखरीतील उल्लेखावरून वाटते. परंतु हा कठोर विचार प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी अनेक प्रकारच्या अडचणी होत्या. पहिली अडचण म्हणजे वतनदारी पद्धती वंशपरांगत पद्धतीने चालत आली होती. दुसरी अडचण म्हणजे पाटील कुलकर्ण्यापासून देशमुख- देशपांड्यापर्यंत सर्व अधिकारी वतनदार होते. या सर्वांची वतने नष्ट केली तर अराजक निर्माण होईल व हे असंतुष्ट वतनदार शत्रुपक्षाला जाऊन मिळतील अशी कायमची धास्ती वाटत होती. शिवाजीने स्वराज्य स्थापन केल्यापासून अनेक मराठे वतनदार त्याच्याविरुद्ध गेले. काहीजणांना राजे हे किताब असल्यामुळे ते स्वतःला शिवाजीपेक्षा श्रेष्ठ समजत असत. अशा वतनदारांविरुद्ध शिवाजी महाराजांना लढावे लागले. अफझलखानाने जेव्हा महाराजांविरुद्ध स्वारी काढली तेव्हा त्याने मावळ आणि वाई भागातील देशमुखांना शिवाजीविरुद्ध चिथावले. तीच गोष्ट पुढे मिर्झाराजे जयसिंगाने केली. तेव्हा वतन रद्द करण्याचा कठोर निर्णय घेतला तर हे सर्व लोभी वतनदार बंड पुकारतील, आदिलशहा किंवा मुघलांना मिळतील आणि त्यामुळे स्वराज्यकार्यात दुर्धर समस्या निर्माण होतील याची जाणीव शिवाजी महाराजांना होती. म्हणून त्यांनी मध्यम मार्ग स्वीकारला. सरसकट सर्व वतने रद्द करण्याऐवजी जे वतनदार पुंड झाले आहे व जे रयतेवर जुलूम करीत आहेत, त्यांना वठणीवर आणण्यासाठी अशा वतनदारांची वतने रद्द करण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले. समकालीन काही विश्वसनीय पत्रांतून बंडखोर व जुलुमी वतनदारांना शिवाजी महाराजांनी कसे नामोहरम केले याचे उल्लेख सापडतात. वतनदारांनी रयतेला गुलाम समजू नये असे महाराजांचे स्पष्ट मत होते. सभासद लिहितो की, 'मुलखात जमीनदार, देशमुख व देसाई यांचे जप्तीखाली कैदेत रयत नाही. याणी 'साहेबी' करून नागवीन म्हटलियाने त्यांच्या हाती नाही.' आहे ती वतने चालवावीत, परंतु नवी देऊ नये असे महाराजांचे एकूण धोरण होते. अमात्य आपल्या आज्ञापत्रात लिहितात, 'आहे वतन ते चालवून यांची सत्ता असू न द्यावी... नवी इनामे, देऊ नयेत. वतनदारांना स्नेह आणि दंड या दोहोंमध्ये निक्षून ठेवावे.' अमात्यांच्या विवेचनावरून शिवाजी महाराजांच्या धोरणाची पूर्ण कल्पना येते. किल्ल्यांची व्यवस्था अमात्यांनी आज्ञापत्रात 'संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग' या एका वाक्यात किल्ल्यांचे महत्व स्पष्ट केले आहे. गड, कोटांच्या सहाय्याने शिवाजी महाराजांनी ११२ छत्रपती शिवाजी महाराज