छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)
Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj
के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा
पृष्ठ 40, कुल 127 में से
संदर्भ में पढ़ेंव्यापाऱ्यांनी खंडणी देण्याची टाळाटाळ केली. पन्हाळ्यावर तोफगोळा देऊन जौहरच्या मदतीस आलेला हेन्री रेव्हिंगटन हा त्या वेळी राजापूर येथे होता. शिवाजीने त्याला व आणखी ७ इंग्रजांना कैद केले. इंग्रजांची वखार उकरून पुरून ठेवलेले द्रव्य शिवाजीने प्राप्त करून घेतले. कैद केलेल्या इंग्रजांना सोनगडच्या किल्ल्यावर पाठविण्यात आले. हे इंग्रज बरेच दिवस शिवाजीच्या कैदेत होते. ईस्ट इंडिया कंपनीचा प्रेसिडेंट ॲण्ड्र्यूज याने या इंग्रज कैद्यांना कळविले की तुम्ही शिवाजीविरुद्ध जौहरला जी मदत केली त्याचे फळ तुम्ही भोगत आहात. या सर्व इंग्रजांची मोठी दयनीय अवस्था झाली. दोघे तर कैदेतच मेले. बाकीच्यांची १६६३च्या जानेवारीत सुटका झाली. शिवाजीच्या या कृतीमुळे राजापूरचे इंग्रजवखारवाले इतके धास्तवले की पुढे त्यांनी शिवाजीशी सलोख्याचे संबंध ठेवण्यासाठी सतत प्रयत्न केला. राजापूरच्या इंग्रजांना धडा शिकवून शिवाजी परत संगमेश्वराकडे आला. जसवंतसिंग दळवीला नामोहरम करून पालवणचे राज्य त्याने जिंकून घेतले. त्याचप्रमाणे सूर्यराव सुर्वे याचेही पारिपत्य केले. अशाप्रकारे आपल्या मार्गात विघ्न आणणाऱ्या मराठे सरदारांनाही शिवाजीने धडा शिकविला. शिवाजीचा हा पराक्रम पाहून आदिलशहा एवढा नामोहरम झाला की मे १६६१ मध्ये त्याने मराठ्यांबरोबर मित्रत्वाचा तह केला. आता शायिस्तेखानाला धडा शिकविणे बाकी होते. शायिस्तेखानाची फजिती उंबरखिंडीच्या लढाईत मोठा पराभव पाऊन कारतलबखान पुण्यास परतला. त्या लढाईत मुघलांची तारांबळ उडालेली ऐकून शायिस्तेखानाचा राग अनावर झाला. आणखी काही मुघल सरदार त्याने शिवाजीच्या पाठलागावर कोकणात पाठविले. त्यापैकी सरदार बुलाखी याने पेणजवळ असलेल्या देईरी गडास वेढा घातला. परंतु मराठा सरदार कावजी कोंढाळकर याने हा वेढा मोडून काढला. मे १६६२ मध्ये नामदारखान नावाच्या सरदारास शायिस्तेखानाने उत्तरकोकणच्या मोहिमेवर पाठविले. नामदारखान जेव्हा पेणजवळ येऊन पोहचला तेव्हा अचानकपणे शिवाजीने मिरे डोंगराच्या बाजूने त्याचेवर जबरदस्त हल्ला केला. तरीपण नामदारखानने आपला बचाव केला तेव्हा मोरोपंत पिंगळे व मोरो सोनदेव यांना नामदारखानाचा बिमोड करण्यासाठी शिवाजीने पाठविले. परंतु नेमक्या याच सुमारास सिंहगडावर काही फंदफितुरी झाल्यामुळे या दोघांनाही सिंहगडाकडे जाणे भाग पडले. ३४ छत्रपती शिवाजी महाराज