छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)
Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj
के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा
पृष्ठ 41, कुल 127 में से
संदर्भ में पढ़ेंइकडे पुण्यामध्ये शायिस्तेखानाने दहशत निर्माण केली होती. शिवाजीचे लोक फोडण्यासाठी आणि किल्ले ताब्यात घेण्यासाठी लाचलुचपतीच्या मार्गाचा त्याने अवलंब सुरू केला होता. त्याचेच एक प्रतिक म्हणजे सिंहगडावर फंदफितुरी झाली होती. शायिस्तेखानाचा पुण्यातील मुक्काम शिवाजीला धोकादायक वाटू लागला. काहीतरी विलक्षण साहस करून शायिस्तेखानाला पळवून लावायचे असे शिवाजीने ठरविले. ५ एप्रिल १६६३ रोजी मध्यरात्री निवडक लोक बरोबर घेऊन शिवाजीने अचानकपणे लाल महालात प्रवेश केला. ते दिवस रमजान महिन्याचे असल्यामुळे दिवसभराचा उपवास सोडून शायिस्तेखान, त्याच्या कुटुंबातील सर्व मंडळी, नोकरचाकर निद्राधीन झालेले होते. शिवाजीने लालमहालात म्हणजे आपल्याच वाड्यात प्रवेश केला होता. त्याला वाड्याचे सर्व दरवाजे आणि दालने माहित होती. अंधारातून शिवाजीची माणसे चालत असल्यामुळे त्यांची चाहूल शायिस्तेखानाच्या लोकांना लागली. मग एकच गडबड उडाली. सर्वजण जागे झाले. पळापळ सुरू झाली. स्वतः शायिस्तेखान याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शिवाजीने मध्येच त्याला गाठून त्याच्यावर तलवारीचा वार केला. त्याची परिणती खानाची एका हाताची बोटे तुटण्यामध्ये झाली. जो तो जीव वाचवण्यासाठी मिळेल त्या मार्गाने पळू लागला. काही जण मराठ्यांच्या हल्ल्यात बळी पडले, काहीजण शिताफीने निसटले. बघता बघता वाडा रिकामा झाला. पुण्यात असलेल्या मुघल सैन्याला नेमके काय झाले हे समजलेच नाही. शिवाजीने हल्ला केला हे समजल्यावर ‘गनिम कोठे आहे?’ अशा आरोळ्या ठोकत सर्वजण पळू लागले. या प्रसंगाचा फायदा घेऊन शिवाजी आणि त्याचे लोकही ‘गनिम कोठे आहे?’ असे ओरडत गर्दीमध्ये मिसळून गेले. फजित झालेल्या शायिस्तेखानाने शेवटी आपल्या लोकांसह अहमदनगरची वाट पकडली. या संदर्भात शिवाजीचे उद्गार सभासदाने आपल्या बखरीत नमूद केले आहे, ‘फते होऊन आलो. शास्ताखानास शास्त केली. पातशाहाने नाव ठेविले परंतु नाव यथार्थ ठेविले नाही. ते नाव आपण शास्त करून नाव रुजू केले.’ पुण्याहून परतल्यावर शायिस्तेखान नगरलाही थांबला नाही. त्याने थेट दिल्लीचा रस्ता पकडला. औरंगजेबाला त्याच्या फजितीची हकिकत समजली होतीच. त्याने खानाला भेटण्यास नकार दिला आणि बंगालच्या सुभेदारीवर त्याची नेमणूक केली. शायिस्तेखानाच्या पराभवामुळे दक्षिणेत शिवाजी हा एक बलाढ्य शत्रू निर्माण झाला याची औरंगजेबाला खात्री पटली. औरंगजेबाने बलाढ्य शत्रूवर मात ३५