भारतकोश
संग्रह पर लौटें

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

इकडे पुण्यामध्ये शायिस्तेखानाने दहशत निर्माण केली होती. शिवाजीचे लोक फोडण्यासाठी आणि किल्ले ताब्यात घेण्यासाठी लाचलुचपतीच्या मार्गाचा त्याने अवलंब सुरू केला होता. त्याचेच एक प्रतिक म्हणजे सिंहगडावर फंदफितुरी झाली होती. शायिस्तेखानाचा पुण्यातील मुक्काम शिवाजीला धोकादायक वाटू लागला. काहीतरी विलक्षण साहस करून शायिस्तेखानाला पळवून लावायचे असे शिवाजीने ठरविले. ५ एप्रिल १६६३ रोजी मध्यरात्री निवडक लोक बरोबर घेऊन शिवाजीने अचानकपणे लाल महालात प्रवेश केला. ते दिवस रमजान महिन्याचे असल्यामुळे दिवसभराचा उपवास सोडून शायिस्तेखान, त्याच्या कुटुंबातील सर्व मंडळी, नोकरचाकर निद्राधीन झालेले होते. शिवाजीने लालमहालात म्हणजे आपल्याच वाड्यात प्रवेश केला होता. त्याला वाड्याचे सर्व दरवाजे आणि दालने माहित होती. अंधारातून शिवाजीची माणसे चालत असल्यामुळे त्यांची चाहूल शायिस्तेखानाच्या लोकांना लागली. मग एकच गडबड उडाली. सर्वजण जागे झाले. पळापळ सुरू झाली. स्वतः शायिस्तेखान याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शिवाजीने मध्येच त्याला गाठून त्याच्यावर तलवारीचा वार केला. त्याची परिणती खानाची एका हाताची बोटे तुटण्यामध्ये झाली. जो तो जीव वाचवण्यासाठी मिळेल त्या मार्गाने पळू लागला. काही जण मराठ्यांच्या हल्ल्यात बळी पडले, काहीजण शिताफीने निसटले. बघता बघता वाडा रिकामा झाला. पुण्यात असलेल्या मुघल सैन्याला नेमके काय झाले हे समजलेच नाही. शिवाजीने हल्ला केला हे समजल्यावर ‘गनिम कोठे आहे?’ अशा आरोळ्या ठोकत सर्वजण पळू लागले. या प्रसंगाचा फायदा घेऊन शिवाजी आणि त्याचे लोकही ‘गनिम कोठे आहे?’ असे ओरडत गर्दीमध्ये मिसळून गेले. फजित झालेल्या शायिस्तेखानाने शेवटी आपल्या लोकांसह अहमदनगरची वाट पकडली. या संदर्भात शिवाजीचे उद्गार सभासदाने आपल्या बखरीत नमूद केले आहे, ‘फते होऊन आलो. शास्ताखानास शास्त केली. पातशाहाने नाव ठेविले परंतु नाव यथार्थ ठेविले नाही. ते नाव आपण शास्त करून नाव रुजू केले.’ पुण्याहून परतल्यावर शायिस्तेखान नगरलाही थांबला नाही. त्याने थेट दिल्लीचा रस्ता पकडला. औरंगजेबाला त्याच्या फजितीची हकिकत समजली होतीच. त्याने खानाला भेटण्यास नकार दिला आणि बंगालच्या सुभेदारीवर त्याची नेमणूक केली. शायिस्तेखानाच्या पराभवामुळे दक्षिणेत शिवाजी हा एक बलाढ्य शत्रू निर्माण झाला याची औरंगजेबाला खात्री पटली. औरंगजेबाने बलाढ्य शत्रूवर मात ३५

शाहजादा मुअज्जम याला शायिस्तेखानाच्या जागी दक्षिणेचा सुभेदार म्हणून नेमले. विलक्षण साहस आणि अद्भूत पराक्रम गाजवून आपल्या शत्रूंना चकित करावयाचे आणि स्वतः यशाच्या धुंदीत न राहता गोंधळून गेलेल्या शत्रूच्या प्रदेशात सतत हल्ले करावयाचे हे शिवाजीचे खास तंत्र होते. शायिस्तेखान दिल्लीच्या रस्त्याला लागल्याबरोबरच शिवाजीने कोकणभागावर स्वारी केली आणि कुडाळ, वेंगुर्ला इ. ठाणी जिंकून घेतली. सुरतेची पहिली लूट सुरत हे व्यापारी पेठ म्हणून सोळाव्या ते सतराव्या शतकात गाजलेले शहर होते. आर्थिक व्यवहारासाठी ते प्रसिद्ध होते. भारतातील पेढीसंबंधीचे व्यवहार या शहरातून चालत असत. शिवाय मुघल साम्राज्यातील वाहतुकीचे बंदर या दृष्टीने सुरत प्रसिद्ध होते. त्यामुळे डच, इंग्रज, फ्रेंच इत्यादी पाश्चात्यांच्या वखारी सुरत बंदरामध्ये होत्या. मुघलांच्या आश्रयामुळे हे पाश्चात्त्य वखारवाले उन्मत्तपणे वागत असत. या वखारवाल्यांना धडा शिकवला तर मुघलांच्या प्रतिष्ठेला तडा जाईल आणि आपले महत्त्व त्यांना कळून चुकेल अशी शिवाजीची अटकळ होती. शिवाय सुरतेसारख्या समृद्ध शहरावर हल्ला करून आपल्याला चांगल्यापैकी लूट मिळेल याचीही शिवाजीला खात्री होती. मुघल सुभेदार शायिस्तेखान फजित होऊन दिल्लीकडे परतल्यावर मुघल सरदार जसंवतसिंग याने आपली बहादुरी दर्शविण्यासाठी सिंहगडला वेढा घातला होता. जसंवतसिंगाच्या वेढ्याला कोणतीही किंमत न देता शिवाजीने अचानकपणे सुरतेवर हल्ला केला. हा अचानक झालेला हल्ला पाहून मुघल सेनेची दाणादाण उडाली. पाश्चात्य वखारवाले भयभयीत झाले आणि सधन पेढीवाले आपली मालमत्ता कडेकोट बंदिस्त ठेवण्याचा प्रयत्न करू लागले. ६ जानेवारी ते १० जानेवारी १६६४ असे तब्बल ४ दिवस सुरत शहर शिवाजीच्या ताब्यात होते. या स्वारीमध्ये शिवाजीने प्रचंड लूट केली. शिवाजीने केलेल्या लुटीची तपशीलवार माहिती समकालीन डच व इंग्रज यांच्या पत्रातून आढळते. या लुटीला इंग्रज प्रतिनिधी अँटनी स्मिथ याने थोडा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मराठ्यांनी त्याला पकडले आणि ३०० रुपये दंड घेऊन त्याची मुक्तता केली. शिवाजीच्या सुरतेवरील हल्ल्यामुळे नेमके कोणते नुकसान झाले याचा अंदाज समकालीन साधनांवरून येतो. पाश्चात्य वखारवाल्यांचे नेमके किती नुकसान झाले हे पहाण्यासारखे आहे. डच कंपनीचे ३६ छत्रपती शिवाजी महाराज

नुकसान सुमारे २०,००० रुपये झाले. तर इंग्रज कंपनीचे नुकसान केवळ १००० पौंड झाले. हे आकडे लक्षात घेतल्यास परकीय वखारवाल्यांनी शिवाजीने केलेल्या लुटीचा वृत्तांत देतांना किती कांगावा केला होता हे लक्षात येते. चार दिवस शहरामध्ये मुक्काम ठोकून १० जानेवारी १६६४ रोजी शिवाजी स्वराज्याकडे परतला. परत जातांना त्यांनी लूट समुद्रमार्गे नेली असा उल्लेख पोर्तुगीज दप्तरात सापडतो. शिवाजीच्या स्वारीच्या संदर्भात वखारवाल्यांनी बराच मनोरंजक मजकूर लिहून ठेवला आहे. शिवाजीच्या लष्करी तळाविषयी डचांनी लिहीले आहे की, “शिवाजी सुरतेबाहेर दोन कोसांवर उतरला होता. त्याचाच फक्त शामियाना होता. इतर सर्व अधिकारी उघड्यावर रहात होते.” शिवाजीची छावणी अत्यंत सुटसुटीत व तात्पुरती असून लष्करातील लोकांपेक्षाही मजूर, बैल आणि रिकामे घोडे यांचा भरणा अधिक आहे अशी नोंद डचांनी केलेली आढळते. शिवाजीने सुरतेची लूट केली त्यावेळी औरंगजेब दिल्लीला नव्हता हे या ठिकाणी लक्षात घेणे आवश्यक आहे. सुरतेच्या लुटीचे परिणाम औरंगजेब ज्यावेळी दिल्लीला परतला त्यावेळी त्याला सुरतेच्या लुटीची हकिकत समजली. सुरतेवर आपली सत्ता असतांना शिवाजीने आपले शहर लुटावे आणि आपल्या आश्रयाने रहाणाऱ्या पाश्चात्त्य वखारवाल्यांना उपद्रव द्यावा याचा विलक्षण संताप औरंगजेबाला झाला. सुरत शहराला तटबंदी बांधण्याचा त्याने हुकूम दिला. पाश्चात्य व्यापारांना एक वर्षाची जकात औरंगजेबाने माफ केली. शिवाय पुढील वर्षापासून अडीच टक्के जकाती ऐवजी दोन टक्के, जकात घेतली जाईल असा हुकूमही त्याने काढला. इंग्रज वखारवाल्यांनी तर शिवाजीची फार मोठी दहशत घेतली. आपली मुख्य व्यापारी पेठ सुरतेहून मुंबईला हलविण्याचा त्यांनी निर्णय घेतला. १६६४ मध्येच पोर्तुगीजांकडून मुंबई बेट इंग्रजांना मिळाले होते. मुंबईला कचेरी हलविल्यानंतर शिवाजीकडून आपल्याला संरक्षण मिळेल असा इंग्रजांचा कयास होता. शिवाजीने अलौकिक साहस करून शिघ्र गतीने सुरतेवर हल्ला केला, लूट केली आणि तितक्याच शीघ्र गतीने तो स्वराज्याला परतला. या घटनेचा पाश्चात्य वखारीतील सर्वसामान्य कामगारावरही मोठा परिणाम झाला. शिवाजीविषयी अनेक वावड्या उठू लागल्या. ‘शिवाजीचे शरीर हवामय असून त्याला पंखही आहेत’ असा अद्भूत उल्लेख एका पत्रात आलेला आढळतो. थोडक्यात मुघल प्रदेशात सर्वसामान्य बलाढ्य शत्रूवर मात ३७

अधिकारीही भयभीत झाले. मुघल प्रदेशात दहशत निर्माण करण्याचा शिवाजीचा हेतू तडीस गेला. ५ फेब्रुवारी १६६४ रोजी शिवाजी रायगडावर परतला. कर्नाटकात शहाजीचा हुद्देगिरी येथे घोड्यावरून पडल्यामुळे २३ जानेवारी १६६४ रोजी मृत्यू झाला होता. शिवाजी रायगडावर पोहचला त्यावेळी राजमाता जिजाबाई सती जाण्याच्या तयारीत होती. परंतु शिवाजीने सती जाण्यापासून राजमातेला परावृत्त केले. खवासखानाचा बंदोबस्त शिवाजीचे मुघलांबरोबर संघर्ष चालू असताना आदिलशाही सरदारांनी कोकण भागात पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. या सरदारांना मुघलांची फूस होती. कुडाळच्या लखम सावंताला शिवाजीवर सूड उगवून आपले राज्य ताब्यात घ्यावयाचे होते. लहान मोठ्या चकमकी घडू लागल्या. प्रथम बचावात्मक भूमिका घेऊन मराठ्यांनी लखम सावंतशी तह केला आणि कुडाळची सत्ता त्याला दिली. विजापूरकरांनी केवळ मुघलांना खूष करण्यासाठी कोकणातल्या चढाईचा देखावा केला होता परंतु शिवाजीबरोबर लढण्याची विजापूर दरबारची मनापासून इच्छाच नव्हती. पण अचानकपणे १६६४ मध्ये विजापूरकरांच्या धोरणात बदल झाला. शिवाजीचा बंदोबस्त करण्यासाठी खवासखान नावाच्या सरदाराची विजापूरकरांनी नेमणूक केली. त्याच्या समवेत बाजी घोरपडे, लखम सावंत, खेम सावंत हे मराठे सरदारही मोठ्या तयारीनिशी निघाले. खवासखानाबरोबर बाजी घोरपडे येत आहे हे समजताच शिवाजीचा संताप अनावर झाला. याच बाजी घोरपड्याने शहाजीला बेड्या घालून विजापूर दरबारात हजर केले होते. शिवाय लखम सावंतने पुन्हा दगा दिला याचीही शिवाजीला चीड आली होती. ऑक्टोबर १६६४ मध्ये स्वतः कोकणची स्वारी काढून शिवाजीने वेंगुर्ला आणि कुडाळ या भागावर वर्चस्व प्रस्थापित केले. त्यानंतर थेट मुधोळपर्यंत धडक मारली. बाजी घोरपड्याबरोबर निकराचे युद्ध केले. त्या युद्धात बाजी मारला गेला. त्याचा मुलगा मालोजी शिवाजीला शरण आला. मुधोळचा प्रदेश स्वराज्यात समाविष्ट झाला. या गोष्टीचा राग येऊन खवासखानाने प्रचंड तयारीनिशी शिवाजीवर स्वारी केली. परंतु मराठ्यांनी आदिलशाही फौजेची एवढी दाणादाण उडवली की खवासखानाला पळून जावे लागले. त्यानंतर फोंड्यापर्यंत स्वारी करून खेम सावंताला ही शिवाजीने चांगला धडा शिकविला. शिवाजी फोंड्यापर्यंत आलेला पाहून पोर्तुगीजांनी आपल्या बचावासाठी नजराणा पाठवून शिवाजीशी स्नेह जोडला. ३८ छत्रपती शिवाजी महाराज

शिवाजीची पहिली आरमारी स्वारी आदिलशहा आणि मुघल यांच्याबरोबर सतत लढाया चालू असताना शिवाजीने आपले आरमारी सामर्थ्य वाढविण्याकडे लक्ष दिले होते. एखादी आरमारी स्वारी काढून समुद्रातील आपल्या शत्रूंना भयचकीत करावे आणि आपल्या आरमारी सामर्थ्याची चुणूक दाखवावी अशी शिवाजीची इच्छा होती. आदिलशाही सरदारांचा बंदोबस्त केल्यानंतर ८ फेब्रुवारी १६६५ रोजी ८५ जहाजे आणि ३ मोठी गलबते घेऊन शिवाजीने आपली पहिली आरमारी स्वारी काढली. शिवाजीच्या स्वारीला पोर्तुगिनांकडून कोणताही अडथळा आला नाही. मालवणहून त्याने मोहिम सुरू केली ते थेट कर्नाटकातील बसनूर या बंदरापर्यंत शिवाजीने मजल मारली. बसनूरला पोहचल्यावर ते बंदर मराठ्यांनी यथेच्छ लुटले. बसनूर नंतर गोकर्ण अंकोला या मार्गाने शिवाजी स्वराज्याकडे परतला. शिवाजीच्या या आरमारी स्वारीने पश्चिम किनाऱ्यावरही शिवाजीचे वर्चस्व वाढू लागले. सिद्दी,इंग्रज, डच, फ्रेंच आणि पोर्तुगीज या सर्वांनाच शिवाजीचे भय वाटू लागले. थोडक्यात १६६५ हे कोकण विजयाचे आणि किनारपट्टीच्या विजयाचे वर्ष ठरले. तिकडे दिल्लीत औरंगजेब बादशहा अतिशय अस्वस्थ झाला होता. शायिस्तेखानाप्रमाणे जसवंतसिंग पराभूत होऊन परतला होता. तेव्हा शिवाजीचा कायमचा बंदोबस्त करण्याच्या इराद्याने मिर्झाराजे जयसिंग याला प्रचंड फौज देऊन दक्षिणेत पाठविण्याचा निर्णय औरंगजेबाने घेतला. 🔲🔲🔲 बलाढ्य शत्रूवर मात ३९

६. जयसिंगाची स्वारी जयसिंगाची स्वारी शिवाजीचे वाढते सामर्थ्य पाहून दिल्ली दरबारात मोठी खळबळ माजली होती. विशेषतः आपला मामा शायिस्तेखान याला शिवाजीने अवमानीत केले, मुघल फौजेचा पराभव केला या गोष्टीचा औरंगजेबाला अतिशय संताप आलेला होता. त्यातच जसवंतसिंगही पराभूत होऊन परतला होता. शिवाजीचा बंदोबस्त कसा करावा या विचाराने औरंगजेब उद्विग्न झालेला असतानाच शिवाजीने सुरत शहर लुटल्याची बातमी त्याला कळली. त्यामुळे तर त्याच्या संतापात अधिकच भर पडली. शाहजादा मुअज्जमला दक्षिणेचा सुभेदार म्हणून पाठविले होते. परंतु औरंगाबादला जाऊन तो स्वस्थ बसून राहिला तेव्हा शिवाजीचा बंदोबस्त करण्यासाठी पराक्रमी आणि तोलामोलाचा सरदार पाठवावा लागेल याची औरंगजेबाला खात्री पटली आणि म्हणून आपल्या दरबारातील ज्येष्ठ सरदार मिर्झाराजे जयसिंग याची औरंगजेबाने शिवाजीविरुद्ध नेमणूक केली. जयसिंगाबरोबर दिलेरखान या पठाण सरदारालाही पाठविण्याचे औरंगजेबाने ठरविले. जयसिंगावर वचक असावा हा त्यामागील हेतू होता. याशिवाय दाऊदखान, कुतुबऊद्दीन, सुजनसिंग, रामसिंग इ. अनेक लहानमोठे सरदार जयसिंगाच्या मोहिमेत सामिल झाले. मुघल दरबारात निकोलाय मनुची हा इटालियन तोफखान्याचा अधिकारी होता. त्यालाही जयसिंगाबरोबर दक्षिणेच्या स्वारीवर जाण्याची औरंगजेबाने आज्ञा केली. स्वतः मिर्झाराजे जयसिंग पराक्रमी सरदार आणि कुशल सेनानी म्हणून प्रसिद्ध होता. आतापर्यंत त्याने काढलेल्या मोहिमांमध्ये त्याला कोठेही अपयश आले नव्हते. त्याने स्वारीची कडेकोट तयारी केली. प्रचंड मोठे सैन्य, तोलामोलाचे सरदार, तोफखाना अशा तयारीनिशी जयसिंग दक्षिणेच्या स्वारीवर निघाला. ९ जानेवारी १६६५ रोजी जयसिंगाने नर्मदा नदी ओलांडली आणि १० फेब्रुवारी रोजी तो औरंगाबादला पोहचला. शाहजादा मुअज्जम याच्याबरोबर ४०

बोलणी करून त्याने शिवाजीच्या प्रदेशावर मोहीम काढली. ३ मार्च १६६५ रोजी तो पुण्यात येऊन दाखल झाला. जयसिंगाचे राजकारण दिल्लीहून निघण्यापूर्वी जयसिंगाने औरंगजेबाकडून ३ अटी मान्य करून घेतल्या होत्या. एक म्हणजे मोहिमेला लागेल तेवढा पैसा दक्षिणेच्या सुभ्यातून खर्च करण्याचा अधिकार त्याने मागून घेतला होता. दक्षिणेतील मुघल किल्लेदारांना जयसिंगाचे हुकूम मानले पाहिजेत ही अटही त्याने मान्य करून घेतली होती. जयसिंगाची तिसरी मागणी म्हणजे मुघल फौजेतील अधिकाऱ्यांना रजा देण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकारही त्याने मान्य करून घेतला होता. या ३ मागण्यांचा अर्थ असा की दक्षिणेच्या मोहिमेचे संपूर्ण सूत्रसंचालन जयसिंगाच्याच ताब्यात राहणार होते. पुण्यात आल्यानंतर जयसिंगाने आपल्या मोहिमेची पद्धतशीर आखणी केली. पहिली गोष्ट म्हणजे शिवाजीच्या प्रदेशाच्या भौगोलिक सीमा, डोंगर- दऱ्या, किल्ले यांची त्याने बारकाईने माहिती जमा केली. त्यानंतर शिवाजीचे शत्रू आपल्या गोटात आणण्यासाठी त्याने प्रयत्न सुरू केले. जावळीचे मोरे आणि जव्हारचे राजे हे शिवाजीचे शत्रू होते. त्यांच्याशी जयसिंगाने सख्य जोडले. पोर्तुगीज, डच आणि इंग्रज यांनी शिवाजीला कसल्याही प्रकारचे सहकार्य करू नये म्हणून त्याने दबाव आणला. आदिलशहा शिवाजीला आतून मदत करील याची शक्यता वाटल्यामुळे काही अफगाणांना व्यापाऱ्यांच्या वेशामध्ये त्याने विजापूरला पाठविले आणि आदिलशहाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे काम त्यांच्याकडे सोपविले. अशाप्रकारे राजकीय डावपेच पूर्ण केल्यानंतर जयसिंगाने आपली ठाणी मजबूत करण्यावर भर दिला. वास्तविक पाहता शिवाजीचे स्वराज्य आकाराने अत्यंत लहान होते. पुणे, कोल्हापूर, सातारा आणि कुलाबा या जिल्ह्यांतील काही परगणेच शिवाजीच्या ताब्यात होते. जे परगणे ताब्यात होते त्या प्रदेशातील सर्व किल्लेही शिवाजीच्या ताब्यात नव्हते. तेव्हा अशा या लहान प्रदेशाची नाकेबंदी करणे जयसिंगाला मूळीच अशक्यप्राय नव्हते. 'चहुबाजूंनी कडेकोट नाकेबंदी' (Strict Blockade System) या डावपेचाचा उपयोग करून शिवाजीला कोंडीत पकडावयाचे अशी व्यूहरचना त्याने केली. काही निवडक तुकड्या शिवाजीच्या महत्त्वाच्या किल्ल्याकडे पाठवून त्या किल्ल्यांना वेढे घालण्याची व्यवस्था केली. महत्त्वाच्या किल्ल्यांची नाकेबंदी केल्यावर त्याने तेहळणीसाठी महत्त्वाच्या घाटावर आणि घाटाखाली खडी फौज जयसिंगाची स्वारी ४१

ठेवली. शिवाजीच्या लहानशा स्वराज्याची कडेकोट नाकेबंदी केल्यानंतर शिवाजीचा एकेक किल्ला जिंकून घ्यावयाचा अशी योजना त्याने आखली आणि त्याप्रमाणे सासवडजवळ असलेल्या पुरंदर या किल्ल्याला त्याने वेढा घातला. वेढ्याचे अधिपत्य दिलेरखान याच्याकडे दिले आणि इतर लष्करी हालचाली जयसिंगाने आपल्या नियंत्रणाखाली सुरू केल्या. जयसिंगाच्या आदेशाप्रमाणे मुघल फौजांनी तुंग, तिकोना, लोहगड या किल्ल्यांच्या आसपासचा प्रदेश, बेचिराख केला. शिवाजीची राजधानी राजगड या किल्ल्याच्या आसमंतातील प्रदेशही जाळून-पोळून उध्वस्त केला. जयसिंगाच्या या चौफेर आक्रमणामुळे शिवाजीपुढे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला. पुरंदरचा वेढा चालू असताना आणि मुघली फौजा लुटालूट करीत असताना जयसिंगाने सासवड येथे आपला तळ ठोकला होता. पुरंदरचा किल्ला जिंकण्यासाठी दिलेरखानचे निकराचे प्रयत्न चालू होते पण त्याला लवकर यश येईना. पुरंदरचा तह दिलेरखानाने पुरंदरचा वेढा रेंगाळत ठेऊन आपला मोहरा पुरंदरजवळ असलेल्या रूद्रमाळ किंवा वज्रगड या किल्ल्याकडे वळविला. हा किल्ला जिंकण्यास त्याला फारशी यातायात करावी लागली नाही. १३ एप्रिल १६६५ रोजी दिलेरखानाने वज्रगड जिंकून घेतला. हा किल्ला ताब्यात आल्यामुळे मुघलांचा एक मोठा फायदा झाला. कारण रुद्रमाळ या किल्ल्यावर त्यांना तोफा चढविणे सोईचे झाले. या तोफांचा सरळ मारा पुरंदर किल्ल्याकडे जात असल्यामुळे किल्ल्यावरील मराठ्यांची कोंडी झाली. पुरंदर किल्ल्याच्या तटावर तोफांचा मारा चालू असताना पुरंदरचा निष्ठावंत हवालदार मुरारबाजी प्रभू याने निवडक लोकांनिशी हल्ल्याचा मुकाबला केला. तोफांचा मारा चालू असतानाच मुघलांची एक तुकडी किल्ला चढून वर आली आणि तेथे हातघाईची लढाई झाली. या लढाईत मुरारबाजीने विलक्षण पराक्रम गाजविला. लढत असताना वर्मी घाव लागून मुरारबाजी पडला. त्याचा हा पराक्रम पाहून खुद्द दिलेरखानाने उद्गार काढले की, "असा शिपाई खुदाने पैदा केला." मुरारबाजी पडल्यावरही तेथील मराठे लढतच राहिले. अखेरीस जून १६६५ मध्ये पुरंदर मुघलांच्या ताब्यात आला. पुरंदर मुघलांच्या ताब्यात गेल्याची वार्ता समजल्यानंतर शिवाजीने आपल्या राजकारणाचे सूत्र बदलले. जयसिंगाचा लढा अशाप्रकारे चालू राहिल्यास आपले लहानसे स्वराज्य मुघलांच्या घशात जाईल आणि स्वराज्य वाचविणे आपल्याला ४२ छत्रपती शिवाजी महाराज

फार अवघड होईल, याचा अंदाज शिवाजीला आला म्हणून नाइलाजाने शरणागती पत्करून जयसिंगाबरोबर तह करण्याचे त्याने ठरविले. ११ जून १६६५ रोजी शिवाजी आणि जयसिंग यांची भेट झाली. २ दिवस बोलणी करून १३ जून १६६५ रोजी शिवाजी आणि जयसिंग यांच्यात तह झाला. हा तह 'पुरंदरचा तह' म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. या तहाच्या प्रमुख अटी पुढीलप्रमाणे होत्या. १. लहानमोठे १२ किल्ले आणि एक लाख होन उत्पन्नाचा मुलूख एवढ्यावर शिवाजीने संतुष्ट राहावे. बादशहाची अवज्ञा अगर बादशाही मुलुखाची लूट करू नये. २. शिवाजीचे २३ किल्ले आणि बालाघाट आणि निजामशाही तळकोकण मिळून चार लाख होनांचा मुलूख शिवाजीकडून घेऊन मोगली साम्राज्याला जोडण्यात यावा. ३. दख्खनच्या सुभ्याच्या अमलात हुकूम होईल तेव्हा शिवाजीने कामगिरीवर हजर व्हावे. ४. पाच हजार स्वारांची मनसब घेऊन संभाजी आणि 'दुसरा शिवाजी' म्हणून प्रख्यात असलेला नेताजी या उभयतांनी दख्खनच्या सुभेदाराबरोबर राहावे. ५. तळकोकणातील ४ लाख होन उत्पन्नाचा आणि विजापुरी बालाघाटातील ५ लाखांचा मुलूख जर बादशहाने शिवाजीला दिला, आणि विजापूरकरांचा मुलूख जिंकल्यावर ह्या मुलुखाचा ताबा बादशाही फर्मानाने कायम शिवाजीकडे करून दिला, तर मग दरसाल तीन लाखांच्या हप्त्याने शिवाजीने बादशहाला ४० लाखांची खंडणी द्यावी. तहाचे एकूण स्वरूप लक्षात घेतले तर त्या तहामुळे शिवाजीच्या स्वराज्यावर मुघलांची बळकट पकड निर्माण झाली असे दिसून येते. जयसिंगाने तह करण्यापूर्वी या तहाच्या मसुद्यास औरंगजेबाकडून परवानगी मिळवली होती आणि ही परवानगी मिळवताना या तहाचे ३ फायदे जयसिंगाने औरंगजेबाच्या नजरेस आणून दिले होते. एक म्हणजे या तहातील अटींप्रमाणे ४० लाख होन मराठ्यांकडून मिळणारे होते. दुसरा फायदा म्हणजे आदिलशहा आणि शिवाजी यांच्यामधील वैमनस्य वाढणार होते. तिसरा फायदा म्हणजे आदिलशहाच्या ताब्यातील दुर्गम डोंगराळ प्रदेश जिंकून मुघलांना मिळवून देण्याचे काम शिवाजीकडे सोपविले होते. तहाचा साक्षेपाने विचार केल्यास या तहामुळे जयसिंगाची स्वारी ४३

शिवाजीची स्वतंत्रता जवळजवळ संपुष्टात येऊन त्याने अप्रत्यक्षपणे मुघलांची सेवा पत्करली होती. अर्थात प्रत्यक्षात शिवाजीने कोणतीही मनसबदारी पत्करली नसली तरी शिवाजीचा मुलगा संभाजी याला मनसबदारी पत्करावी लागली होती. त्यामुळे शिवाजीच्या कोणत्याही हालचालीवर दडपण राहणे स्वाभाविक होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवाजीकडून जे २३ किल्ले मुघलांनी घेतले होते ते मोक्याच्या ठिकाणी असून लष्करीदृष्ट्या महत्त्वाचे होते. हे किल्ले ताब्यात आल्यावर शिवाजीच्या हालचालींना संपूर्ण प्रतिबंध करता येईल आणि जे १२ किल्ले शिवाजीकडे आहेत त्या किल्ल्यांची सतत टेहाळणी करता येईल असा जयसिंगाचा हिशोब होता. परंतु औरंगजेबाला मात्र १२ किल्ले शिवाजीकडे राहू देणे धोक्याचे वाटले. म्हणून शिवाजीचे सर्वच किल्ले ताब्यात घ्यावे असा आग्रह त्याने धरला होता. परंतु या १२ किल्ल्यांमुळे शिवाजी काही शिरजोर होणार नाही, अशी ग्वाही जयसिंगाने औरंगजेबाला दिली होती. थोडक्यात पुरंदरचा तह म्हणजे शिवाजीच्या चिमुकल्या स्वराज्यावर पडलेले फार मोठे सावट होते. शिवाजीचे सर्व सरदार कुटुंबीय मंडळी आणि निष्ठावंत सेवक हवालदिल झाले होते. शिवाजीकडे केवळ १२ किल्ले ठेवल्यामुळे तो आदिलशहाविरुद्ध आपल्याला मदत करील आणि दक्षिणेत मुघलांचे पूर्ण वर्चस्व वाढेल हे तहाच्या राजकारणाचे मुख्य सूत्र होते. जयसिंगाचे हे सूत्र शेवटी औरंगजेबानेही मान्य केले आणि शिवाजीला ताबडतोब आदिलशहाविरुद्ध मोहीम काढण्यास भाग पाडा असा तगादा त्याने सुरू केला. शिवाजीपुढे आव्हान पुरंदरचा तह हे शिवाजीपुढे मोठे आव्हान होते. कारण या तहाप्रमाणे ४० लक्ष होन खंडणी १३ वर्षांमध्ये मुघलांना देण्याचे शिवाजीवर बंधन होते. याचा अर्थच असा की १३ वर्षे शिवाजीवर मुघलांचे बंधन राहणार होते. बराच मोठा मुलूख आणि किल्ले शिवाजीने या तहाने गमाविले होते. उरलेले स्वराज्यातील १२ किल्ले म्हणजे मुघलांच्या दृष्टीने एखाद्या देशमुखाचा किंवा जहागिरदाराचा प्रदेश होता. शिवाजीला संपूर्ण वर्चस्वाखाली आणण्यामध्ये जयसिंगाने कोणतीच कुचराई केली नव्हती. शिवाजीने सुद्धा आपल्या काळजावर मोठा धोंडा ठेऊन विषण्ण मनःस्थितीत हा तह मान्य केला होता. पुरंदरच्या तहाने शिवाजीचे लहान शत्रूही शेर बनले. ऑगस्ट १६६५ च्या एका इंग्रजी पत्रात उल्लेख आहे की, “आपला देश शिवाजी इतक्या गरिबीने शत्रूच्या हवाली करतो आहे त्याअर्थी काही विशेष घडले असलेच पाहिजे.” थोडक्यात ४४ छत्रपती शिवाजी महाराज

पुरंदरच्या तहामुळे शिवाजीचे चिमुकले स्वराज्य रौद्र. स्वरूपाच्या संकटात सापडले होते. सप्टेंबर १६६५ मध्ये औरंगजेबाकडून पुरंदरच्या तहाला मान्यता आली. त्याचप्रमाणे औरंगजेबाने शिवाजीसाठी कृपेचे फर्मान आणि पोषाख जयसिंगाकडे पाठविला. २७ सप्टेंबर रोजी शिवाजीने स्वतः जयसिंगाकडे जाऊन कृपेचे फर्मान स्विकारले. शिवाजीसाठी त्याच्या आयुष्याचा हा एक अत्यंत दुर्दैवी क्षण ठरला. पुरंदरचा तह झाल्यानंतर आणि शिवाजीने औरंगजेबाचे फर्मान स्विकारल्यानंतर जयसिंगाने आदिलशाहीविरुद्ध मोहिम हाती घेतली. तहातील अटीप्रमाणे या मोहिमेत जयसिंगाला मदत करण्यासाठी शिवाजी बांधला गेला होता. जयसिंगाने आपल्या नेहमीच्या रणनीतीनुसार आदिलशाहीचे सरदार फोडण्यास सुरुवात केली. कित्येक सरदार आदिलशाही सोडून जयसिंगाला येऊन मिळाले. रुस्तुमजमा या निष्ठावंत सरदाराने मात्र आदिलशाही वाचविण्याचा निकराने प्रयत्न केला. नोव्हेंबर १६६५ मध्ये जयसिंगासमवेत शिवाजीही विजापूरच्या मोहिमेवर निघाला. जयसिंग आणि शिवाजी संयुक्तपणे विजापूरवर चालून येत आहे हे पाहून अली आदिलशहा खडबडून जागा झाला. आपले राज्य वाचविण्यासाठी त्याने शर्थीचे प्रयत्न करायचे ठरविले. राजधानीच्या रक्षणाची त्याने एवढी कडेकोट तयारी केली की जयसिंग व शिवाजीपुढे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला. आत्मरक्षणासाठी आदिलशहाने विजापूरच्या आसमंतात चारी बाजूंनी खडी फौज ठेवली. जयसिंगाच्या मोहिमेला अडथळा यावा म्हणून विजापूरच्या परिसरातील ४-५ मैलांचा टापू स्वतःच उध्वस्त करून टाकला आणि सर्वत्र पाण्यामध्ये वीष पेरून ठेवले अशाप्रकारे विषारी तटबंदी विजापूरच्या आसमंतात उभी केल्यामुळे मुघलांची फौज त्या टापूपर्यंत येणे महाकठीण होते. तशात विजापूर पासून १२ मैल अंतरावर मुघल आणि आदिलशहा यांच्यात मोठे युद्ध झाले. या युद्धात मुघलांचा दणदणीत पराभव झाला. त्या लढाईत मुघलांचे चौदा हजार सैन्य गारद झाले असा उल्लेख एका समकालीन पत्रात आलेला आहे. त्याचप्रमाणे प्रस्तुत पत्रात शिवाजीनेच मुघलांचा घात केला म्हणून त्यांना अपयश आले असाही उल्लेख आलेला आहे. शिवाजीने दगाफटका करून मुघलांना फसविले असे मात्र घडलेले नाही उलट आपले सर्व सैन्य घेऊन जयसिंगाबरोबर त्याने मोहिम हाती घेतली होती. ताथवड व फलटण ही दोन ठाणीही मुघलांना जिंकून दिली होती. एक गोष्ट मात्र खरी ती म्हणजे या मोहिमेमध्ये शिवाजीचे मन नव्हते आणि त्याला स्वारस्यही वाटत नव्हते. विजापूर मोहिम फसल्यानंतर शिवाजीने पन्हाळा किल्ला जिंकून घेण्याची जयसिंगाची स्वारी ४५

योजना जयसिंगापुढे मांडली. जयसिंगाने, मान्यता दिल्यावर शिवाजीने पन्हाळ्यावर हल्ला केला पण त्याला यश आले नाही. बहुधा याचवेळी नेताजी पालकर आणि शिवाजी यांच्यामध्ये अंतर निर्माण झाले. नेताजी पालकर आदिलशहाकडे निघून गेला परंतु मिर्झाराजे जयसिंगाने मोठे आमिष दाखवून नेताजीला आपल्याकडे ओढून घेतले आणि त्याला कैद करून औरंगजेबाकडे निघून गेला परंतु मिर्झाराजे जयसिंगाने मोठे आमिष दाखवून नेताजीला आपल्याकडे ओढून घेतले आणि त्याला कैद करून औरंगजेबाकडे पाठवून दिले. औरंगजेबाने त्याचे सक्तीने धर्मांतर केले. महंमद कुलीखाँ असे नाव ठेऊन त्याला काबूलकडे मोहिमेवर पाठविले. विजापूरच्या मोहिमेत जयसिंगासारखा महाप्रतापी सरदार आणि शिवाजीसारखा चतुर युद्ध सेनानी एकत्र असतानाही यश मिळाले नाही हे पाहून औरंगजेबाला या मोहिमेविषयीच संशय वाटू लागला. जयसिंगावर त्याचा विश्वास होता, पण शिवाजीविषयी मात्र त्याला खात्री वाटत नव्हती. शिवाजी हा धूर्त राजकारणी असल्यामुळे अंत:स्थपणे त्याच्या काही हालचाली चालत असतील असा संशय जयसिंगालाही येत होता. शिवाय दक्षिणेत आदिलशहा आणि कुतुबशहा मुघलांविरुद्ध एक झाले आहे, असा दाट संशय जयसिंगाला आला होता आणि औरंगजेबालाही त्याने तसे कळविले होते. दिल्लीहून औरंगजेबाचा जयसिंगावर वारंवार दबाव येत होता. त्यामुळे त्याने शेवटी शिवाजीलाच औरंगजेबाच्या भेटीसाठी पाठवून देण्याचे ठरविले. औरंगजेबाची संमती येताच मिर्झाराजे जयसिंगाने शिवाजीची रवानगी उत्तरेकडे केली. शिवाजी उत्तरेकडे पुरंदरचा तह झाल्यापासूनच शिवाजीने औरंगजेबाच्या भेटीस जावे असा जयसिंगाचा आग्रह चालू होता. विजापूरच्या मोहिमेत यश न आल्यामुळे जयसिंगाने आपला विचार पक्का केला आणि औरंगजेबाच्या भेटीस जाण्यासाठी शिवाजीचे मन वळविले. शिवाजीलाही उत्तर भारतात जाऊन तेथील मुघली राजवट पाहण्याची मनापासून इच्छा होती. औरंगजेबालाही दक्षिणेच्या राजकारणात तुफान माजविणाऱ्या शिवाजीला पाहण्याची इच्छा होती. प्रत्यक्ष भेटीत शिवाजीच्या मनातील अंत:स्थ हेतू जाणून घेता येतील असे बादशहाला वाटत होते. ५ मार्च १६६६ रोजी शिवाजी संभाजीसह उत्तरेकडे म्हणजे आग्र्याकडे निघाला. प्रयाण करण्यापूर्वी शिवाजीने स्वराज्याची संपूर्ण जबाबदारी राजमाता जीजाबाई हिच्याकडे सुपूर्त केली. मोरोपंत पिंगळे आणि निळोपंत मुजुमदार ४६ छत्रपती शिवाजी महाराज

यांच्यावर स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी सोपविली. शिवाजीने आपल्यासमवेत निवडक मराठा सरदार घेतले होते. त्यामध्ये निराजी रावजी, त्रिंबकजी सोनदेव, माणको हरी, दत्ताजी त्रिंबक, राघोजी मित्रा, दावलजी गाडगे आणि हिरोजी फर्जंद हे प्रमुख सरदार होते. एकूण लश्कर ३००० आणि मावळे १००० दिमतीसाठी बरोबर घेतले होते. औरंगाबाद शहरात ज्या दिवशी शिवाजीने प्रवेश केला त्या दिवशी त्याचे भव्य स्वागत झाले. त्याला पहाण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली. त्याचे वर्णन भीमसेन सक्सेना याने आपल्या ‘तारिखे दिल्कशा’ या ग्रंथात करून ठेवलेले आहे. औरंगाबादचा मुघल अधिकारी सफशिकन खान हा मोठ्या आढ्यतेने शिवाजीशी वागला तेव्हा शिवाजीने त्याला चांगली समज दिली. औरंगाबादेत काही दिवस शिवाजीने मुक्काम केला आणि त्यानंतर आग्र्याकडे प्रयाण केले. आग्र्याकडे जात असतांना मध्ये एका मुक्कामात शिवाजीला औरंगजेबाचे एक पत्र मिळाले. या पत्रात औरंगजेबाने म्हटले होते की, “तुम्ही विश्वासाने आमच्याकडे यावे, भेट झाल्यावर आपला मोठा सत्कार करण्यात येईल आणि माघारे जाण्याविषयी निरोप दिला जाईल.” या पत्रावरून असे स्पष्ट दिसते की भेट झाल्यावर शिवाजीला परत पाठविण्याचे आश्वासन औरंगजेबाने दिले होते परंतु औरंगजेबाच्या मनात नेमके काय आहे याबाबत स्वतः शिवाजी साशंक होता. एकतर मुघलांच्या राजधानीत जाऊन भर दरबारात मुघल बादशाहाची भेट घ्यावयाची म्हणजे शिवाजीच्या दृष्टीने एक कसोटीचा प्रसंग. कुठल्याही प्रकारचा अन्याय आणि कसल्याही प्रकारचा अवमान सहन करण्याची शिवाजीची अजिबात तयारी नव्हती. त्याचा तो स्वभावच नव्हता. म्हणून मुघल दरबारात भेटीच्या वेळी नेमके काय घडेल याविषयी तो साशंक होता. शिवाजीच्या या आग्राभेटीकडे दक्षिणेतील लहानमोठ्या राज्यकर्त्यांचे, एवढेच नव्हे तर पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज या पाश्चात्यांचेही लक्ष लागलेले होते कारण या भेटीनंतर दक्षिणेतील राजकारणाचे रंग बदलण्याची दाट शक्यता होती. जयसिंगाची स्वारी ४७

७. शिवाजी आणि औरंगजेब वाढदिवसाचा दरबार १२ मे १६६६ रोजी बादशहा औरंगजेबाचा पन्नासावा वाढदिवस होता. त्या निमित्ताने आग्रा येथे खास दरबार भरविण्याचे ठरले होते. योगायोग असा की ११ मे १६६६ रोजी शिवाजी मलुकचंदसराई येथे येऊन पोहचला होता. तेथून आग्रा शहर अतिशय जवळ होते. शिवाजी आणि औरंगजेब यांची भेट वाढदिवसाच्या दिवशी प्रत्यक्ष खास दरबारात घडवून आणावी असा जयसिंगाचा मुलगा रामसिंग याचा विचार होता. १२ मे रोजी स्वतः रामसिंग शिवाजीकडे गेला आणि त्याचे स्वागत करून बादशहाच्या भेटीसाठी ‘दिवाण-इ-आम’ या दरबारात नेण्याचे त्याने ठरविले. परंतु शिवाजी तिथे पोहोचण्याअगोदरच ‘दिवाण-इ-आम’मधील औरंगजेबाचा वाढदिवस समारंभ संपला होता आणि खास अमीर उमराव लोकांसाठी असलेल्या ‘दिवाण-इ-खास’ या दरबारामध्ये औरंगजेब गेला. त्या काळी दिवाण-इ-खास ‘घुसलखाना’ या नावाने प्रसिद्ध होता. घुसलखाना याचा अर्थ स्नानगृह. या शब्दामुळे काही इतिहासकारांचा गैरसमज होऊन औरंगजेब व शिवाजी यांची भेट स्नानगृहात झाली असा हास्यास्पद निष्कर्ष त्यांनी काढलेला आढळतो. दिवाण-इ-खासला घुसलखाना नाव पडण्याचे कारण की सम्राट अकबर स्नान आटोपले की लगेच या दरबारामध्ये हजर होत असे म्हणून दिवाण-इ-खासला रूढ अर्थाने घुसलखाना हे नाव प्राप्त झाले होते. औरंगजेब ‘दिवाण-इ-खास’मध्ये आल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या अमीर उमरावांनी बादशहाच्या जयजयकाराच्या घोषणा केल्या. शिवाजी-औरंगजेब भेट ‘दिवाण-इ-खास’मध्ये आल्यानंतर अमीर उमरावांनी कुर्निसात करून बादशहाला भेटवस्तू अर्पण करण्यास सुरुवात केली. याचवेळी रामसिंग शिवाजी ४८

आणि संभाजी यांना घेऊन 'दिवाण-इ-खास'मध्ये दाखल झाला. शिवाजी आणि संभाजी दोघांनीही औरंगजेबास नजर-निसार सादर केली. याच क्षणी औरंगजेबाने शिवाजीला फजित करण्याचे ठरविले होते. वास्तविक पहाता बादशहाने शिवाजीला मोठ्या सन्मानाने भेटीसाठी बोलाविले होते आणि खास पत्र पाठवून 'तुमचा बहुत सन्मान होईल' असे आश्वासनही दिले होते. जयसिंगाचा मुलगा रामसिंग यालाही वाटत होते की बादशहाकडून शिवाजी आणि संभाजीला सन्मानाची वागणूक मिळेल. परंतु शिवाजीला फजित करण्याची आणि त्याचा स्वाभिमान डिवचण्याची ही संधी आपोआप चालून आली असे समजून औरंगजेबाने शिवाजीस पंचहजारी सरदारांच्या रांगेत उभे करण्याचे रामसिंगास फर्माविले. या रांगेत सिंहगड जिंकण्यात अपयशी ठरलेला जसवंतसिंग शिवाजीच्या पुढे होता. त्याच्याकडे लक्ष जाताच शिवाजी संतापाने थरथरू लागला. औरंगजेब अशाप्रकारे आपला अपमान करून पंचहजारी सरदारांच्या रांगेत जसवंतसिंगासारख्या क्षुद्र सरदाराच्या मागे उभा करील असे शिवाजीला स्वप्नातदेखील वाटले नव्हते. त्यामुळे त्याचा संताप अनावर झाला. रामसिंग त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु औरंगजेबाने मात्र शिवाजीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले. उलट अमीर उमरावांना खिलत देण्याचा उपक्रम सुरू केला. हा सारा प्रकार शिवाजीला उद्वेगजनक वाटल्यास नवल नाही. रामसिंगाला त्याने बजावले की मला शोभेसा सन्मान मिळाला पाहिजे. एवढे बोलून शिवाजी सिंहासनाकडे पाठ करून घुसलखान्याच्या बाहेर पडला. हे लक्षात येताच औरंगजेबाने रामसिंगाला शिवाजी आणि संभाजी यांना घेऊन जाण्यास सांगितले. शिवाजी नजरकैदेत दरबारात अपमान झालेला पाहून शिवाजी रागाने निघून गेला हे औरंगजेबाच्या लक्षात आले. रामसिंगाला बोलवून शिवाजीची समजूत काढण्यास त्याला फर्माविले. पण अशा मलमपट्टीमुळे शिवाजीच्या स्वाभिमानी मनाला झालेली जखम भरून येणे शक्य नव्हते. त्याचा क्रोध थोडाही कमी झाला नव्हता. तेव्हा औरंगजेबाने तीन सरदारांबरोबर शिवाजीसाठी खिलत पाठविली पण शिवाजीने खिलत स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. आपण केलेला अपमान शिवाजीला जिव्हारी लागला आहे हे औरंगजेबाने ओळखले. आता शिवाजीच्या संदर्भात कोणता उपाय योजावा असा संभ्रम त्याच्या मनात निर्माण झाला. शेवटी त्याने ठरविले की शिवाजीला नजरकैदेत शिवाजी आणि औरंगजेब ४९

३. अफजलखान वध व प्रतापगढ़ महायुद्ध

ठेवावे आणि त्याच्या निवासस्थानाभोवती कडक पहारा ठेवावा. शिवाजी पुन्हा औरंगजेबाच्या दरबारात पाऊल टाकणे शक्य नव्हते. तथापि रामसिंगाने संभाजीला घेऊन दरबारात जाण्याचे ठरविले. १४ मे रोजी रामसिंगाबरोबर संभाजी बादशहाच्या दरबारात गेला तेव्हा रत्नजडीत कट्यार, मोत्याचा कंठा आणि पोषाख देऊन औरंगजेबाने त्याचा सन्मान केला. वरकरणी हे नाटक करीत असताना शिवाजीला ठार मारण्याचा कटही औरंगजेबाने रचला होता. शिवाजीच्या पहाऱ्यावर असलेल्या फुलादखानाला 'गुप्तपणे शिवाजीस मारून टाका' असा इशारा बादशहाने दिला होता. शाही दरबारातील आप्तस्वकीयांकडून आणि ज्येष्ठ सरदारांकडून शिवाजीला ठार मारावे असा आग्रह औरंगजेबाकडे चालू होता. शायिस्तेखानाची पत्नी म्हणजे औरंगजेबाची मामी जहान आरा बेगम, जाफरखान, मूर्तजाखान इ. सरदारही शिवाजीचा निकाल लावावा असे औरंगजेबाला आग्रहाने सांगत होते. या साऱ्या गोष्टीचा कानोसा लागल्यावर रामसिंग अत्यंत संतप्त झाला. शिवाजीच्या केसाला जरी धक्का लागला तरी आपण तो सहन करणार नाही असे रामसिंगाने जाहीर केले आणि शिवाजीच्या रक्षणासाठी आपली प्रतिष्ठा त्याने पणास लावली. औरंगजेबाला शिवाजीचे पुढे काय करावे हे समजेनासे झाले. एक तर शाही दरबारातील ज्येष्ठ सरदार आणि जहान आरा बेगम शिवाजीला कडक शिक्षा द्यावी यासाठी औरंगजेबाकडे आग्रह करीत होते. दक्षिणेत खुद्द मिर्झाराजे जयसिंग शिवाजी आग्र्याला नजरकैदेत असल्याचे समजल्यापासून अत्यंत अस्वस्थ झाला होता. त्यातच औरंगजेबाच्या मनात असा विचार आला होता की, शिवाजीला कैदेत ठेवून आपण स्वतः दक्षिणेची स्वारी करावी आणि शिवाजीचा सर्व प्रदेश जिंकून घ्यावा. पण हा बेत ज्यावेळी जयसिंगाला समजला तेव्हा त्याने प्रखर विरोध केला. त्याने औरंगजेबास कळविले की, 'शिवाजीला कैदेत ठेवून आपण दक्षिणेत स्वारी काढली तर येथील मराठे बिथरतील आणि मग आपला हेतू तर साध्य होणार नाहीच पण नामुष्की पदरात येईल.' जयसिंगाकडून हा इशारा मिळाल्यानंतर औरंगजेबाने स्वारीचा बेत सोडून दिला. जसे दिवस जातील तसे त्याची अस्वस्थता वाढू लागली. शिवाजीला खुश करून त्याचे मन रमवावे म्हणून औरंगजेबाने मोठी मनसब देण्याचे आमिष दाखविले. परंतु स्वाभिमानी शिवाजीने मनसबीचे आमिष झुगारून दिले. त्यामुळे औरंगजेब अधिकच संतप्त झाला. शिवाजीला काबूलच्या मोहिमेवर पाठवून तिकडेच त्याचा निकाल लावावा असा एक अफलातून विचार औरंगजेबाच्या डोक्यात आला. परंतु जयसिंग त्यामुळे अतिशय बिथरून जाईल आणि ५० छत्रपती शिवाजी महाराज

दक्षिणेतील मराठे सूड उगविल्याशिवाय राहणार नाहीत असे वाटल्यामुळे त्याने तो अफलातून विचार सोडून दिला. नेमके काय करावे हे त्याला नक्की समजेना. त्याने एकच गोष्ट केली. ती म्हणजे शिवाजीभोवतीचा पहारा जास्त कडक केला. शिवाजीही कैदेमध्ये अत्यंत बेचैन अवस्थेत होता. आपल्यामुळे रामसिंगाची परिस्थिती अवघड झाली आहे याची खंत त्याला वाटत होती. कारण औरंगजेबाने शिवाजीचा जामीन म्हणून रामसिंगाला मुक्रर केले होते. रामसिंगाची अवस्था अधिक अवघड होऊ नये म्हणून त्याची जामीनकी काढून घ्यावी असा प्रस्ताव शिवाजीने औरंगजेबापुढे मांडला पण त्याची प्रतिक्रिया भलतीच झाली. औरंगजेबाने जामीनकी तर काढून घेतली नाहीच उलट रामसिंगाचाच आणखी एक पहारा शिवाजीभोवती बसविला. आपल्याबरोबर दक्षिणेतून जी मंडळी आली आहे ती विनाकारण आपल्याबरोबर उत्तरेत अडकून पडली आहे याची खंतही शिवाजीला वाटत होती. म्हणून आपल्याबरोबर आलेल्या मंडळींना दक्षिणेकडे जाण्यासाठी परवानगी द्यावी असा आणखी एक प्रस्ताव शिवाजीने मांडला. तो मात्र औरंगजेबाने तातडीने मान्य केला आणि शिवाजीबरोबर आलेल्या लोकांना दक्षिणेत जाण्यासंबंधी परवाने देण्याबद्दल त्याने हुकूम काढला. शिवाजीचे अलौकिक साहस शिवाजीबरोबर आलेली बरीच मंडळी बादशहाकडून परवाने मिळताच दक्षिणेकडे परतू लागली. त्यामुळे शिवाजीला हायसे वाटले. संभाजी आणि काही निवडक लोक आपल्याजवळ राहतील असा त्याचा मनोदय होता. निवासस्थानाभोवतीचा पहारा तर कडक होताच, बाहेर कोठेही जाण्यास मज्जाव होता आणि पहारा कडक असल्यामुळे कोणाशीही संपर्क साधणे शिवाजीला शक्य नव्हते. अशा या बिकट परिस्थितीमध्ये एक विलक्षण साहस करण्याचा शिवाजीने बेत रचला. येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे अलौकिक साहस करताना शिवाजी आपल्या नियोजित कृतीबाबत बारीकसारीक तपशील निश्चित करीत असावा. या कृतीचे परिणाम काय होतील याचाही तो बारकाईने विचार करीत असावा. एखादे लोकविलक्षण साहस करायचे असेल तर त्याचे नियोजन तो स्वतः पूर्ण विचाराअंती सूत्रबद्ध करीत असे. अफझलप्रसंग, शाहिस्तेखानप्रसंग, पन्हाळ्यातून सुटका, कारतलबखानाचे युद्ध या सर्व घटना बारकाईने पाहिल्यास शिवाजीचे लोकविलक्षण साहस सूत्रबद्ध नियोजनावरच आधारलेले होते हे समजून येते. शिवाजी आणि औरंगजेब ५१

आग्याला निवासस्थानाभोवतीचा पहारा अधिक कडक होत असलेला पाहून त्यामध्ये ढिलाई कशी आणता येईल याचा विचार शिवाजीने सुरू केला. आपण आजारी असल्याचा बहाणा त्याने केला. हकिमाकडे जाऊन औषध आणण्याची जबाबदारी त्याने हिरोजी फर्जंदवर सोपविली. मदारी मेहतर या एकनिष्ठ सेवकास पाय रगडण्यासाठी ठेवले. शिवाजीची बतावणी पाहून पहारेकऱ्यांना शिवाजी खरोखरीच आजारी आहे असे वाटू लागले. आपली बतावणी यशस्वी होत आहे हे पाहून शिवाजीने आणखी एक युक्ती योजली. आपल्याला साधूसंतांचे व फकीरांचे आशिर्वाद मिळावेत म्हणून मिठाईचे पेटारे पाठविण्याचे ठरविले. सुरुवातीला काही दिवस पहारेकरी हे पेटारे तपासून पाहत असत. पण पुढे पुढे कडक तपासणी करण्याचे त्यांनी सोडून दिले. अशा प्रकारे पहाऱ्यांमध्ये क्रमाक्रमाने ढिलाई प्राप्त झाली. या संधीचा फायदा घेऊन एकेदिवशी शिवाजीने संभाजीसह पलायन केले. पेटार्याची कथा शिवाजीने औरंगजेबाच्या कैदेतून कशी सुटका करून घेतली हे स्पष्ट करणारा नेमका पुरावा अद्यापही उपलब्ध झालेला नाही. जेधे शकावलीमध्ये अशी नोंद आहे की ‘श्रावण वद्य द्वादशी शके १५८८ या दिवशी आग्यातून महाराज पेटारीयात बैसोन पळाले.’ म्हणजे १९ ऑगस्ट १६६६ रोजी मिठाईच्या पेटार्‍यात बसून शिवाजी आणि संभाजी पळाले असा अर्थ होतो. बहुतेक इतिहासकार शिवाजी महाराजांनी मिठाईच्या पेटार्‍यात बसूनच सुटका करून घेतली असे मानतात. समकालीन साधनांमध्ये ही याच आशयाचे पुरावे मिळतात. समकालीन पाश्चात्य प्रवासी थेवेनॉट याने आपल्या वृत्तांतामध्ये शिवाजी टोपलीत बसून पळून गेला असा उल्लेख केला आहे. भिमसेन सक्सेना या दरबारी लेखकाने ‘मिठाईच्या पेटार्‍यातूनच शिवाजी व संभाजी निसटले’ असे लिहून ठेवले आहे. वखारवाल्यांच्या कागदपत्रांतूनही शिवाजी पेटार्‍यातून निसटला अशा आशयाचे उल्लेख आलेले आहेत. मराठी बखरीमध्ये पेटार्‍यांचीच कथा रंगतदार करून सांगितलेली आढळते. फारसी तवारिखकार खाफीखान याने शिवाजी व त्याचा मुलगा दोघेही टोपल्यात बसून निसटून गेले असे लिहून ठेवलेले आढळते. या सर्व समकालीन साधनांचा मतितार्थ हाच की कैदेतून पळून जाण्यासाठी शिवाजीने मिठाईच्या पेटार्‍याचा उपयोग केला. पण या अनुमानाला दोन मोठे अपवाद आहेत. ‘मासिरे आलमगिरी’ या ग्रंथाचा कर्ता साकी मुस्तैदखान हा लिहितो की, ‘आजारी पडण्याचा बहाणा करून ५२ छत्रपती शिवाजी महाराज

शिवाजी २७ सफर (१९ ऑगस्ट) रोजी मुलासह पळून गेला.' मुस्तैदखान हा औरंगजेबाचा दरबारी लेखक असल्यामुळे त्याचे विधान विचारात घेणे आवश्यक आहे. आणखी एक समकालीन पाश्चात्य प्रवासी बर्निअर याने लिहून ठेवले आहे की 'शिवाजीच्या पलायनामागे खुद्द औरंगजेबाचाच हात होता.' शिवाजीच्या सुटका नाट्याची मिमांसा करताना या विधानाचाही विचार करणे आवश्यक आहे. शिवाजीची आग्रा भेट आणि सुटका समजावून घेण्यासाठी आणखी महत्त्वाच्या साधनाचा विचार करावा लागतो. ते साधन म्हणजे राजस्थानी भाषेतील समकालीन पत्रे. या पत्रांमधून शिवाजी उत्तरेत आल्यापासून आग्राला जाईपर्यंत त्याच्या विषयीचे अनेक उल्लेख आलेले आहेत. त्याचप्रमाणे शिवाजीची सुटका झाल्यानंतरचेही उल्लेख या कागदपत्रांमध्ये आहे. २३ ऑगस्ट १६६६च्या एका पत्रामध्ये असा उल्लेख आहे की 'रात्र एक दिड घटका राहिली असता पहारेकऱ्याने शिवाजीस पाहिले होते. परंतु नंतर अचानकपणे तो कसा निसटला हे त्याला समजले नाही.' ३ सप्टेंबरच्या पत्रात असा उल्लेख आहे की '४ घटिका दिवस वर आला तेव्हा शिवाजी निसटल्याचे समजले' या दोन्ही पत्रांचा अर्थ असा की शिवाजी पहाटेच्या अंधारात पहारा शिथिल असताना निसटून गेला असावा. म्हणजेच पहारेकरी बेसावध असतानाच शिवाजी संभाजीसह निसटला असला पाहिजे. कदाचित पहारेकऱ्यांनाच त्याने वश करून घेतले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पहारेकऱ्यांना वश करून आणि अगोदरच जमवून ठेवलेले परवाने उपयोगात आणून शिवाजीने सुटका करून घेतली असावी असे म्हणता येईल. शिवाजी पेटाऱ्यातून निसटला हा निष्कर्ष खुद्द बादशहानेच काढला असावा हे ३ सप्टेंबरच्या राजस्थानी पत्रावरून दिसून येते. औरंगजेबाचा संताप शिवाजी एवढ्या मोठ्या कडक पहाऱ्यातून एकाएकी नाहिसा झाल्याचे वर्तमान पहाराप्रमुख फुलादखान याचेकडून औरंगजेबाला समजले. तेव्हा औरंगजेब अत्यंत संतप्त झाला. फुलादखानाने औरंगजेबास सांगितले की 'आम्ही वरचेवर कोठडीत जाऊन पहात होतो पण एकाएकी गहजब झाला. शिवाजी गायब जाहला. पळाला, की जमिनीत घुसला, की आसमानामध्ये गेला हे काहीच कळले नाही. देखत देखत नाहिसा झाला. काय हुन्नर जाहला न कळे.' हे सर्व ऐकून औरंगजेबाच्या तळपायाची आग मस्तकाला भिडली त्याने ताबडतोब शिवाजी आणि औरंगजेब ५३

शिवाजीचा पाठलाग करून त्याला पकडण्यासाठी अडीच लाख स्वार पाठविले. सभासदाने दिलेली माहिती कदाचित अतिशयोक्तीची असली तरी शिवाजीचा पाठलाग करण्यासाठी औरंगजेबाने मोठी फौज पाठविली ही गोष्ट मात्र खरी. शिवाजी कैदेतून पळाला म्हणून औरंगजेबाने रामसिंगास जबाबदार धरले. त्याला बोलावून त्याचा पाणउतारा केला आणि त्याची मनसब एकदम कमी केली. शिवाजीबरोबर आलेल्या मराठ्यांपैकी जे लोक अद्याप परत गेले नव्हते आणि आग्रा किंवा जवळपास मुक्कामाला होते त्यांची त्वरेने धरपकड करण्यात आली. त्यामध्ये रघुनाथपंत कोरडे, दत्ताजी त्रिंबक, हिरोजी फर्जंद, मदारी मेहतर आणि कवींद्र परमानंद ह्यांचा समावेश होता. जवळजवळ ८ महिने ही मंडळी औरंगजेबाच्या कैदेमध्ये होती. पुढे एप्रिल १६६७ मध्ये या साऱ्यांची सुटका करण्यात आली. शिवाजी राजगडाकडे परत शिवाजीला शोधण्यासाठी औरंगजेबाने फौजेची अनेक पथके वेगवेगळ्या मार्गांनी पाठविली. बहुधा शिवाजी वेषांतर करून हुलकावण्या देत असावा. कारण कोणत्याही तुकडीला त्याला शोधून काढता आले नाही. संभाजीबरोबर असल्यामुळे शिवाजीला त्याची काळजी वाटत होती. एक तर तो वयाने लहान होता. तो बरोबर असल्यामुळे शिवाजीचा माग शोधून काढणे शत्रूला सुलभ होते. तेव्हा शिवाजीने असा विचार केला की संभाजीला मथुरेत ठेवावे आणि आपण पुढे मार्गक्रमण करावे. मथुरेत असलेले शिवाजीचे निष्ठावंत सेवक कृष्णाजीपंत व काशीपंत यांच्या स्वाधीन संभाजीला करून शिवाजीने निर्धास्तपणे दक्षिणेचा मार्ग स्वीकारला. शिवाजी कोणत्या मार्गाने राजगडला परत आला याविषयी इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. आग्राहून परत येताना दूरचा मार्ग शिवाजीने स्वीकारला असावा असे मत सर जदुनाथ सरकार यांनी दिलेले आहे. या मताप्रमाणे आग्रा-मथुरा- वाराणसी-प्रयाग-गोंडवण-हैद्राबाद या मार्गाने शिवाजी राजगडाकडे परतला असावा. परंतु समकालीन राजस्थानी कागदपत्रांवरून असे दिसते की शिवाजी ज्या मार्गाने आग्र्याला गेला त्याच मार्गाने राजगडाकडे परतला कारण आग्राहून निसटल्यावर तो नरवरच्या घाटापर्यंत आल्याचा उल्लेख एका राजस्थानी पत्रामध्ये आलेला आहे. आग्र्याला जाताना तो राजगड-औरंगाबाद-हंडिया- भोपाळ-सिरोज-नरवर-ग्वाल्हेर-धोलपूर-आग्र्याया मार्गाने औरंगजेबाच्या भेटीसाठी गेला होता. बहुधा त्याच मार्गाने तो राजगडाकडे परत आला असावा १२ ५४ छत्रपती शिवाजी महाराज