छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)
Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj
के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा
पृष्ठ 61, कुल 127 में से
संदर्भ में पढ़ेंसप्टेंबर १६६६ रोजी निवडक लोकांसह शिवाजी राजगडला सुखरूप पोहचला. १९ ऑगस्ट रोजी त्याने स्वतःची सुटका करून घेतली आणि त्यानंतर तब्बल २४ दिवसांनी तो राजगडला पोहचला. जर तो गोंडवण-हैद्राबाद मार्गाने आला असता तर त्याला अधिक दिवस लागले असते. शिवाजी राजगडला सुखरूप पोहचल्यानंतर राजमंडळामध्ये आणि कुटुंबियांमध्ये मोठा आनंद पसरला अष्टप्रधान मंडळ, इतर सर्व अधिकारी, राजगडवरील सर्व सेवक आणि मावळे यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. राजमाता जिजाबाई हिला औरंगजेबाच्या पोलादी पिंजऱ्यात अडकलेला आपला पुत्र तेथून निसटून सुखरूपपणे आपल्यापाशी परत आला याचा आनंद केवढा झाला असेल ते शब्दात सांगता येणार नाही. शिवाजी राजगडला सुखरूप पोहोचल्यानंतर जवळजवळ दोन महिन्यानंतर म्हणजे नोव्हेंबर १६६६ मध्ये कृष्णाजी पंताने संभाजीला राजगडावर आणले. तो येईपर्यंत शिवाजी राजगडला आल्याची बातमी गुप्त ठेवण्यात आली असावी. कारण जेधे शकावलीत असा उल्लेख आहे की 'मार्गशिर्ष शुद्ध पंचमी शके १५८८ (२० नोव्हेंबर १६६६) रोजी शिवाजी संभाजीसह वर्तमान राजगडास आले.' राजगडास आल्यानंतर शिवाजीने सवड न घेता आगामी मोहिमेची तयारी सुरू केली. □□□ शिवाजी आणि औरंगजेब ५५