छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)
Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj
के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा
पृष्ठ 63, कुल 127 में से
संदर्भ में पढ़ेंकुतुबशहा यांच्याशी मैत्रीचे तह झाल्यावर मुघलांशिवाय कोणी मोठा शत्रू शिवाजीला उरला नाही. पोर्तुगीज आणि इतर पाश्चात्त्य वखारवाले अधून मधून शिवाजीच्या वाटेला जात होते. त्याशिवाय जंजिऱ्याचे सिद्दी हे समुद्रावर सत्ता गाजवत असल्याने त्यांचे आव्हानही शिवाजीसमोर होते. सिद्दी काय, पोर्तुगीज काय किंवा पाश्चात्त्य वखारवाले काय, यांना कह्यात आणायचे असेल तर आपले स्वतःचे सामर्थ्यशाली आरमार उभारणे आवश्यक आहे, हे शिवाजीने ओळखले होते. आरमाराची उभारणी जावळीचे खोरे जिंकल्यानंतर रायगडसारखा दुर्गम किल्ला शिवाजीच्या ताब्यात आला आणि त्याच्या राज्याची सरहद्द समुद्रापर्यंत जाऊन भिडली. इ.स. १६५७ मध्ये कल्याण, भिवंडी जिंकल्यानंतर किनारपट्टीतील आपल्या प्रदेशाचे रक्षण करण्यासाठी आपण स्वतंत्र आरमार उभारले पाहिजे याची जाणिव शिवाजीला झाली होती आणि म्हणून इ.स. १६५७ मध्येच आरमार बांधणीस त्याने सुरुवात केली. पोर्तुगीज पत्रव्यवहारावरून असे दिसते की आरमार उभारण्यामध्ये प्रारंभीच्या काळात पोर्तुगीज तंत्रज्ञांनी शिवाजीला मदत केली होती. १६५७ ते १६५९ या दरम्यान शिवाजीने २० जहाजे तयार केली. १६५९ मध्ये अफझलखानाचा वध झाल्यानंतर किनारपट्टीचा आणखी प्रदेश शिवाजीला मिळाला. इ.स. १६६४ मध्ये चौलच्या कॅप्टनने पोर्तुगीज गव्हर्नरला लिहिलेल्या पत्रावरून शिवाजीचे आरमारी सामर्थ्य बरेच वाढले होते असे दिसते. शिवाजीची राजनीती अशी होती की, किनारपट्टीचा जेवढा-जेवढा प्रदेश आपल्या वर्चस्वाखाली येईल, तेवढ्या प्रमाणात आरमारी सामर्थ्यामध्ये वाढ झाली पाहिजे असा त्याचा हिशेब होता. आपल्या आरमारी सामर्थ्याची चाचणी घेण्यासाठी शिवाजीने इ.स. १६६५ मध्ये बसनूरची स्वारी काढली आणि त्यात तो यशस्वी झाला. थोडक्यात जयसिंगाची स्वारी होण्यापूर्वी आणि शिवाजीची आग्राभेट होण्यापूर्वी मराठ्यांचे आरमार चांगलेच आकाराला आले होते. आग्र्याहून परत आल्यानंतर आरमारी सामर्थ्य अधिक बळकट करण्याचा निर्णय शिवाजीने घेतला. १६६७ मध्ये शिवाजीने आपले आरमारी सामर्थ्य एवढे वाढविले की गोव्याच्या पोर्तुगीज गव्हर्नरांना एका पत्रात 'शिवाजीचे आरमार आता भीतीदायक वाटते. सुरुवातीला आम्ही दुर्लक्ष केल्यामुळे शिवाजीने आरमार तर वाढविलेच पण किनाऱ्यावर किल्लेही बांधले.' असे म्हटलेले आढळते. वरकरणी मात्र पोर्तुगिजांनी शिवाजीबरोबर सलोख्याचे संबंध ठेवले चढाईचे राजकारण ५७