छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)
Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj
के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा
पृष्ठ 73, कुल 127 में से
संदर्भ में पढ़ेंआपल्या सहकाऱ्यांपैकी मोरोपंत पिंगळे आणि अण्णाजी दत्तो यांना शेती सुधारणा आणि पुनर्वसन याकडे लक्ष देण्यास सांगितले. शिवाजीने रयतेला अभय दिले. परागंदा झालेल्या रयतेला आपापल्या गावी परत बोलावून ज्याच्या त्याच्या जमिनी ज्याला त्याला परत केल्या. लावणी-संचणीसाठी लोकांना उत्तेजन दिले. पडीत जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी शेतकऱ्यांना सवलती जाहीर केल्या. स्वराज्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतसारा निश्चित करण्याचे काम अण्णाजी दत्तो यांचेकडे सोपविले. जे शेतकरी गरीब असतील त्यांना बी- बियाणे, नांगर पुरविणे, नांगरणीच्या कामासाठी बैल मिळवून देणे, इ. शेतकऱ्यांच्या हिताची कामे करून शिवाजीने रयतेचा विश्वास संपादन केला. आपल्या लष्कराला शिवाजीने असे आदेश दिले की शेतकऱ्यांना उपद्रव देऊ नये, त्यांच्या उभ्या पिकांची हानी करू नये, कोणी उपसर्ग केला तर राजे सहन करणार नाही, महसूल अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की, 'रयतेचा वाटा रयतेला मिळालाच पाहिजे', अधिकाऱ्यांनी गरीब शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाचाही मोह धरता कामा नये. अशा प्रकारे स्वराज्यातील रयतेला संपूर्ण दिलासा देऊन शिवाजीने लोकांचा विश्वास तर संपादन केलाच, पण त्याचबरोबर हे राज्य रयतेचे राज्य आहे अशी भावना लोकांच्या मनात त्याने निर्माण केली. परिणाम असा झाला की, गावागावातून मावळे आणि इतर लोक स्वराज्यासाठी वाटेल तो त्याग करण्यास तयार झाले. कोकण भागात प्रभाव बागलाण भागात मुघलांची पिछेहाट शिवाजीने केली होती. परंतु याच काळात कोकणामध्ये शिवाजीच्या लहानसहान शत्रूंनी शिवाजीच्या प्रदेशात घुसखोरी सुरू केली. विशेषतः जव्हार आणि रामनगर येथील राजे शिवाजीच्या प्रदेशात अधिक्षेप करू लागले. जंजिऱ्याचे सिद्दी हे तर शिवाजीच्या दृष्टीने अस्तनीतील शत्रू होते. त्यांनी किनाऱ्यावरच्या प्रदेशात मोठा उपद्रव सुरू केला होता. सिद्दींची चढाई पाहून पोर्तुगिजांनाही नवे अवसान आले आणि त्यांनीही कोकणात उपद्व्याप सुरू केले. या शत्रूंचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी शिवाजीने मोरोपंतावर सोपविली होती. मोरोपंत खास सैन्यदल घेऊन कोकणात उतरले. प्रथम त्यांनी चौल आणि वसई ही पोर्तुगिजांची ठाणी आपल्या प्रभावाखाली आणली. त्यानंतर इ.स.१६७२ च्या पावसाळ्याच्या प्रारंभी जव्हार जिंकून घेतले आणि पाठोपाठ रामनगरही ताब्यात घेतले. जव्हारचा राजा मुघलांच्या आश्रयाला गेला तर रामनगरचा राजा पोर्तुगिजांच्या आश्रयाला गेला. मुघलांची पिछेहाट ६७