छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)
Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj
के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा
पृष्ठ 74, कुल 127 में से
संदर्भ में पढ़ेंअशाप्रकारे कोकणात आपला प्रभाव निर्माण करून मोरोपंतांनी मोहीम यशस्वी केली. दोन शाही राजवटी आग्याहून परत आल्यानंतर शिवाजीने गोवळकोंड्याचा कुतुबशहा आणि विजापूरचा आदिलशहा यांच्याशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले. इ.स. १६७२ पर्यंत या संबंधामध्ये कोणताही बिघाड झाला नाही. पण या वर्षी म्हणजे १६७२ मध्ये दोन्ही शाही राजवटींचे सुलतान मरण पावले आणि राजकारणाचे रंग पालटू लागले. २१ एप्रिल १६७२ रोजी गोवळकोंड्याचा सुलतान अब्दुल्ला कुतुबशहा मृत्यू पावला. त्यानंतर सात महिन्यांनी म्हणजे २४ नोव्हेंबर १६७२ रोजी विजापूरचा सुलतान अली आदिलशहा मृत्यू पावला. या दोन्ही सुलतानांनी शिवाजीशी सलोख्याचे संबंध जोडलेले होते. नवीन येणाऱ्या सुलतानाबरोबरही सलोखा कायम ठेवावा असे शिवाजीचे धोरण होते. त्याचप्रमाणे सुलतानपदासाठी होणाऱ्या संघर्षापासून आपण अलिप्त रहावे आणि कोणाचीही बाजू घेऊ नये असे तटस्थ धोरण शिवाजीने स्वीकारले होते. गोवळकोंड्याच्या सुलतानपदावर अब्दुल्ला कुतुबशहाचा जावई तानाशहा हा अब्दुल हसन हे नाव धारण करून विराजमान झाला. त्याचे अभिनंदन करण्यासाठी शिवाजीने निराजी पंतास गोवळकोंड्यास पाठविले. अब्दुल हसनने निराजीपंताचे स्वागत करून मराठ्यांशी सलोख्याचे संबंध यापुढेही अबाधित राहतील असे अभिवचन दिले आणि दरवर्षी एक लाख होन खंडणी देण्याचेही त्याने मान्य केले. विजापूरच्या आदिलशहाबाबत मात्र सलोख्याच्या संबंधाला उजाळा मिळू शकला नाही. कारण विजापूरच्या सुलतान पदावर सिकंदरशहा विराजमान झाला पण तो अल्पवयी असल्यामुळे राजकारणाची सुत्रे विजापूर दरबारातील खवासखान नावाच्या सरदाराकडे गेली. खवासखान हा शिवाजीचा पक्का विरोधक होता. अली आदिलशहाने शिवाजीबरोबर जे सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले होते ते त्याला अजिबात मान्य नव्हते. म्हणून दरबारची सूत्रे आपल्या हाती आल्यानंतर त्याने शिवाजीविरुद्ध आक्रमक धोरण स्वीकारले. मुघलांची मदत घेऊन शिवाजीचा कायमचा बंदोबस्त करता येईल असे त्याला वाटत होते. शिवाजीविरुद्ध उठाव करून प्रथम औरंगजेबाची कृपा संपादन करावी म्हणजे मुघल फौजा आपल्या मदतीला येतीलच असा सल्ला दियानत पंडीत या हस्तकाने त्याला दिला होता. खवासखानाने मराठ्यांच्या प्रदेशावर स्वारी करण्याचे ठरविले. अर्थात त्यामुळे सलोखा संपला आणि संघर्ष सुरू झाला. ६८ छत्रपती शिवाजी महाराज