छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)
Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj
के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा
पृष्ठ 76, कुल 127 में से
संदर्भ में पढ़ेंबोलविले आणि स्पष्ट शब्दात सांगितले की ‘बहलोलखानाला बुडवून फत्ते करणे, नाहीतर तोंड न दाखविणे’ शिवाजीने निर्वाणीचा संदेश दिल्यानंतर प्रतापराव बहलोलखानाचा निकाल लावण्याचा मनसुबा रचून कोल्हापूरकडे निघाला. ज्याला आपण क्षमा केली होती तोच आपल्यावर उलटलेला आहे हे पाहून प्रतापराव उद्विग्न झालेला होता. संतापाने तो बेभान झालेला होता. कोल्हापूरच्या दक्षिणेस चाळीस मैलावर असलेल्या नेसरीच्या खिंडीत प्रतापरावाने बहलोल खानाला गाठले. या दिवशी तारीख होती २४ फेब्रुवारी १६७४. नेसरीच्या खिंडीपर्यंत पोहचल्यावर आपल्या सैन्याची पाहणी करीत असलेल्या बहलोल खानाला त्याने पाहिले. खान दिसल्यावर प्रतापराव बेभान झाला. आणि कोणताही विचार न करता बरोबर असलेल्या केवळ ६ सैनिकांना घेऊन तो बहलोल खानाच्या सैन्यात मोठ्या त्वेषाने घुसला. हे ७ मराठे वीर कापाकापी करत बरेच अंतर चालून गेले. पण बहलोल खानाचे सैन्य प्रचंड होते. हे ६ वीर आणि प्रतापराव लढता लढता धारातिर्थी पतन पावले. नारायण शेणवी याने मुंबईकर इंग्रजांना ४ एप्रिल १६७४ रोजी पाठविलेल्या पत्रामध्ये प्रतापरावाच्या साहसाची माहिती कळवलेली आढळते. प्रतापरावला मारल्यामुळे बहलोल खानाला मोठा हर्ष झाला परंतु त्याचा हा आनंद फार वेळ टिकू शकला नाही. कारण आनंदरावाने मोठ्या त्वेषाने खानाच्या फौजेवर हल्ला केला त्याने बहलोल खानास माघार घेण्यास भाग पाडले. दरम्यान दिलेरखान बहलोलखानाच्या मदतीस धावून आला. आदिलशाही आणि मुघली फौज एकत्र आल्या. तेव्हा गनिमी कावा लढवून आनंदरावाने आपला मार्ग बदलला व तो थेट बंकापूरपर्यंत गेला. बंकापूरजवळ असलेले संपगाव आनंदरावाने लुटले. हे संपगाव बहलोल खानाच्या जहागिरीत मोडत असल्याने आनंदरावाने लुटले. बंकापूरजवळ झालेल्या लढाईत आदिलशाही सैन्याचा संपूर्ण पराभव झाला. विजय संपादन करून आणि मोठी लूट घेऊन आनंदराव जेव्हा शिवाजीकडे आला तेव्हा त्याची पाठ थोपटून शिवाजीने त्याला हंबीरराव हा किताब दिला आणि त्याला सेनापती पदावर नेमले. प्रतापराव पडल्याचे दुःख शिवाजीला फार झाले. प्रतापराव गेल्यामुळे आपली एक बाजू गेली असे उद्गार शिवाजीने काढल्याचे सभासद बखरीत नमूद केलेले आहे. बहादुरखानाची स्वारी दिलेरखान बहलोलखानाच्या मदतीला धावून आला याचा उल्लेख वर केलेला आहे. परंतु बहलोल व दिलेर एकत्र येऊनही मराठ्यांविरुद्ध त्यांना ७० छत्रपती शिवाजी महाराज