दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 300, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें११ वा. ] शिक्षा. २६५ पाहिजे ॥ ३५ ॥ प्रकृतीमधील देव । तो प्रकृतीचा स्वभाव । भावातींत महानुभाव । विवेकें जाणावा ॥ ३६ ॥ जो निर्मळास ध्याईल । तो निर्म- ळचि होईल । जो जयास भजेल । तो तद्रूप जाणावा ॥ ३७ ॥ क्षीर नीर निवडिती । ते राजहंस बोलिजती । सारासार जाणती । महानुभाव ॥ ३८॥ अरे जो चंचळास भजेल । तो सहजचि चलेल । जो निश्चळास भजेल । तो निश्चळचि ॥ ३९ ॥ प्रकृतीसारिखें चालावें । परी अंतरीं शाश्वत ओळखावें । सत्ये होऊन वर्तावें । लोकांऐसें ॥ ४० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकादशदशके चत्वारदेवनिरूपणं नाम द्वितीयः समासः ॥२॥ ३. शिक्षा. श्रीगणेशाय नमः ॥ बहुतां जन्मांचा शेवट । नरदेह सांपडे अवचट । येथें वर्तावें चोखट । नीतिन्यायें ॥ १ ॥ प्रपंच करावा नेमका । पाहावा परमार्थ विवेक । जेणें करितां उभयलोक । संतुष्ट होती ॥ २ ॥ शत वरुषें वय नेमिलें । त्यांत बाळत्व नेणतां गेलें । तारुण्य अवघें वेंचलें । विषयांकडे ॥ ३ ॥ वृद्धपणीं नाना रोग । भोगणें लागे कर्मभोग । आतां भगवंताचा योग । कोणे वेळे ॥ ४ ॥ राजिकें दैविक उद्वेग चिंता । अन्न वस्त्र देह ममता । नाना प्रसंगें अवचिता । जन्म गेला ॥ ५ ॥ लोक मर- मरौं जाती । वडिलें गेलीं हे प्रचीती । जाणत जाणत निश्चितीं । काय मा- निलें ॥ ६ ॥ अग्नि गृहासि लागला । आणि सावकास निजला । तो कैसा म्हणावा भला । आत्महत्यारा ॥ ७ ॥ पुण्यमार्ग अवघा बुडाला । पापसं- ग्रह उदंड झाला । यमयातनेचा झोला । कठीण आहे ॥ ८ ॥ तरी आतां ऐसें न करावें । बहुत विवेकें वर्तावें । इहलोक परत्र साधावें । दोहींकडे ॥ ९ ॥ आळसाचें फळ रोकडें । जांभया देऊन निद्रा पडे । सुख म्हणोन आवडे । आळसी लोकां ॥ १० ॥ साक्षेप करितां कष्टती । परंतु पुढें सुर- वोडती । खाती जेविती सुखी होती । यत्नेंकरूनि ॥ ११ ॥ आळस उदास नागवणा । आळस प्रयत्नबुडवणा । आळसें करंटपणाच्या खुणा । प्रकट होती ॥ १२ ॥ म्हणोन आळस नसावा । तरीच पाविजे वैभवा । अरेंत्रीं १. ब्रम्हरूप. २. इहपरलोक. ३. राजकारण. ४. सुख पावतात. ५. इहलोकीं.