भारतकोश
संग्रह पर लौटें

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

११ वा. ] शिक्षा. २६५ पाहिजे ॥ ३५ ॥ प्रकृतीमधील देव । तो प्रकृतीचा स्वभाव । भावातींत महानुभाव । विवेकें जाणावा ॥ ३६ ॥ जो निर्मळास ध्याईल । तो निर्म- ळचि होईल । जो जयास भजेल । तो तद्रूप जाणावा ॥ ३७ ॥ क्षीर नीर निवडिती । ते राजहंस बोलिजती । सारासार जाणती । महानुभाव ॥ ३८॥ अरे जो चंचळास भजेल । तो सहजचि चलेल । जो निश्चळास भजेल । तो निश्चळचि ॥ ३९ ॥ प्रकृतीसारिखें चालावें । परी अंतरीं शाश्वत ओळखावें । सत्ये होऊन वर्तावें । लोकांऐसें ॥ ४० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकादशदशके चत्वारदेवनिरूपणं नाम द्वितीयः समासः ॥२॥ ३. शिक्षा. श्रीगणेशाय नमः ॥ बहुतां जन्मांचा शेवट । नरदेह सांपडे अवचट । येथें वर्तावें चोखट । नीतिन्यायें ॥ १ ॥ प्रपंच करावा नेमका । पाहावा परमार्थ विवेक । जेणें करितां उभयलोक । संतुष्ट होती ॥ २ ॥ शत वरुषें वय नेमिलें । त्यांत बाळत्व नेणतां गेलें । तारुण्य अवघें वेंचलें । विषयांकडे ॥ ३ ॥ वृद्धपणीं नाना रोग । भोगणें लागे कर्मभोग । आतां भगवंताचा योग । कोणे वेळे ॥ ४ ॥ राजिकें दैविक उद्वेग चिंता । अन्न वस्त्र देह ममता । नाना प्रसंगें अवचिता । जन्म गेला ॥ ५ ॥ लोक मर- मरौं जाती । वडिलें गेलीं हे प्रचीती । जाणत जाणत निश्चितीं । काय मा- निलें ॥ ६ ॥ अग्नि गृहासि लागला । आणि सावकास निजला । तो कैसा म्हणावा भला । आत्महत्यारा ॥ ७ ॥ पुण्यमार्ग अवघा बुडाला । पापसं- ग्रह उदंड झाला । यमयातनेचा झोला । कठीण आहे ॥ ८ ॥ तरी आतां ऐसें न करावें । बहुत विवेकें वर्तावें । इहलोक परत्र साधावें । दोहींकडे ॥ ९ ॥ आळसाचें फळ रोकडें । जांभया देऊन निद्रा पडे । सुख म्हणोन आवडे । आळसी लोकां ॥ १० ॥ साक्षेप करितां कष्टती । परंतु पुढें सुर- वोडती । खाती जेविती सुखी होती । यत्नेंकरूनि ॥ ११ ॥ आळस उदास नागवणा । आळस प्रयत्नबुडवणा । आळसें करंटपणाच्या खुणा । प्रकट होती ॥ १२ ॥ म्हणोन आळस नसावा । तरीच पाविजे वैभवा । अरेंत्रीं १. ब्रम्हरूप. २. इहपरलोक. ३. राजकारण. ४. सुख पावतात. ५. इहलोकीं.

२६६ श्रीदासबोध. [दशक परत्रीं जीवा । समाधान ॥ १३ ॥ प्रयत्न करावा तो कोण । हेंचि ऐका निरूपण । सावध करूनि अंतःकरण । निमिष एक ॥ १४ ॥ प्रातःकाळीं उठावें । कांहीं पाठांतर करावें । यथानुशक्ति आठवावें । सर्वोत्तमासी ॥१५॥ मग दिशेकेंडे जावें । जें कोणासींच नव्हे ठावें । शौच आचमन करावें । निर्मळ जळें ॥ १६ ॥ मुखमार्जन प्रातःस्नान । संध्या तर्पण देवतार्चन । पुढें वैश्वदेव उपासन । यथासांग ॥ १७ ॥ कांहीं फळाहार घ्यावा । मग संसार धंदा करावा । सुशब्दें राजी राखावा । सकळ लोक ॥ १८ ॥ ज्याचा जो ब्यापार । तेथें असावें खबरदार । दुश्चित्तपणें तरी पोर । वेढा लावी ॥ १९ ॥ चुके ठके विसरे सांडी । आठवण झालिया चर- फडी । दुश्चित आळसाची रोकडी । प्रचीत पहा ॥२०॥ या कारणें सावधान । एकाग्र असावें मन । तरी मग जेवितां भोजन । गोड वाटे ॥ २१ ॥ पुढें भोजन झालियावरी । कांहीं देवाची चर्चा करी । एकांतीं जाऊन विवरी । नाना ग्रंथ ॥ २२ ॥ तरीच प्राणी शाहणा होतो । नाहीं तरी मूर्खचि राहतो । लोक खाती आपण पाहतो । दैन्यवाणा ॥ २३ ॥ ऐसें सदैवै- पणाचें लक्षण । रिकामा जाऊं नेदी क्षण । प्रपंच व्यवसायाचें ज्ञान । बरें पाहे ॥ २४ ॥ कांहीं मिळवी मग जेवी । गुंतल्या लोकांस उगवी । शरीर कारणीं लावी । कांहीं तरी ॥ २५ ॥ कांहीं धर्मचर्चा पुराण । हरिकथा नि- रूपण । वाया जाऊं नेदी क्षण । दोहोंकडे ॥ २६ ॥ ऐसा जो सर्वसावध । त्यास कैंचा असेल खेद । विवेकें तुटला संबंध । देहबुद्धीचा ॥ २७ ॥ आहे तितुकें देवाचें । ऐसें वर्तणें निश्चयाचें । मूळ तुटलें उद्वेगाचें । येणें रीतीं ॥ २८ ॥ प्रपंचीं पाहिजे सुवर्ण । परमार्थीं पंचीकरणें । महावाक्याचें विव- रण । करितां सुटे ॥ २९ ॥ कर्म उपासना आणि ज्ञान । येणें राहे समा- धान । परमार्थाचें साधन । तेंचि ऐकत जावें ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकादशदशके शिक्षानिरूपणं नाम तृतीयः समासः ॥ ३ ॥ ——— ४. विवेक. श्रीगणेशाय नमः ॥ ब्रह्म म्हणिजे निराकार । गगनासारिखा विचार । १. परलोकीं. २. शौचास. ३. भाग्याचें ४. सोडवी. ५. पंचभूतांचा विचार.

विकार नाहीं निर्विकार । तेंचि परब्रह्म ॥ १ ॥ ब्रह्म म्हणिजे निश्चळ । अंत- रात्मा तो चंचळ । द्रष्टा साक्षी केवळ । बोलिजे तया ॥ २ ॥ तो अंतरात्मा म्हणिजे देव । त्याचा चंचळ स्वभाव । पाळिताहे सकळ जीव । अंतरीं वसोनी ॥ ३ ॥ त्या वेगळे जड पदार्थ । तेणेंविण देह व्यर्थ । तेणेंचि कळे परमार्थ । सकळ कांहीं ॥ ४ ॥ कर्ममार्ग उपासनामार्ग । ज्ञानमार्ग सिद्धांत- मार्ग । प्रवृत्तिमार्ग निवृत्तिमार्ग । देवचि चालवी ॥ ५ ॥ चंचळेंविण निश्चळ कळेना । चंचळ तरी स्थिरावेना । ऐसे विचार नाना । बरे पाहा ॥ ६ ॥ चंचळनिश्चळांची संधी । तेथें भांबावते बुद्धी । कर्ममार्गाचा जो विधी । तो मग ऐलीकडे ॥ ७ ॥ देव या सकळांचें मूळ । देवास मूळ ना डाळ । परब्रह्म तें निश्चळ । निर्विकारी ॥ ८ ॥ निर्विकार आणि विकारी । एक म्ह- णेल तो भिकारी । विचाराची होते वैरी । देखत देखतां ॥ ९ ॥ सकळ परमार्थांचें मूळ । पंचीकरण महावाक्य केवळ । तें विवरावें प्रांजळ । पुनः- पुन्हा ॥ १० ॥ पहिला देह स्थूलकाया । आठवा देह मूळमाया । अष्ट देह निरसलिया । विकार कैंचा ॥ ११ ॥ या कारणें विकारी । साचाऐशी बां- जिगिरी । एक समजे एक खरी । मानिताहे ॥ १२ ॥ उत्पत्ति स्थिति सं- हार । यां वेगळा निर्विकार । काळायासी सारासार । विचार केला ॥ १३ ॥ सार असार दोन्ही एक । तेथें कैंचा उरला विवेक । परीक्षा नेणती रंक । पापी करंटे ॥ १४ ॥ जो एकचि विस्तारला । तो अंतरात्मा बोलिला । नाना विकारीं विकारला । निर्विकारी ॥ १५ ॥ ऐसें प्रगटचि आहे । आ- पुल्या प्रत्ययें पाहे । काय राहे काय न राहे । हेंहि कळेना ॥ १६ ॥ तें अ- खंड होत जातें । जें सर्वदा संहारतें । रोकडें प्रचीतीस येतें । जनांमध्यें ॥ १७ ॥ एक रडे एक चरफडी । एकाची एक घरी नरडी । एकमेकां झों- बती बैराडी । डुकळले जैसे ॥ १८ ॥ नाहीं न्याय नाहीं नीती । ऐसे हे लोक वर्तती । आणि अवघेंच सार म्हणती । विवेकहीन ॥ १९ ॥ धोंडे सांडून सोनें घ्यावें । माती सांडून अन्न खावें । आणि अवघेंच सार म्हणावें । बाष्कळपणें ॥ २० ॥ म्हणोन हा विचार करावा । सत्य मार्ग तोचि धरावा । लाभ जाणोन घ्यावा । विवेकाचा ॥ २१ ॥ सारें गारें एकचि सरी । तेथें १. प्रपंच. २. परमार्थ. ३. समाप्ति. ४. गारुड. ५. अधाशी. ६. थोर लहान.

२६८ श्रीदासबोध. [ दशक परीक्षेस कैंची उरी । या कारणें चतुरीं । परीक्षा करावी ॥ २२ ॥ जेथें परी- क्षेचा अभाव । तेथें दे घाव घे घाव । सगट सारिखा स्वभाव । लौंदेपणाचा ॥ २३ ॥ घेऊं ये तेंचि घ्यावें । घेऊं नये तें सांडावें । उंच नीच ओळखावें । या नांव ज्ञान ॥ २४ ॥ संसार संतेसि आलें । एक लाभें अभरें³ झाले । एक ते करंटे ठकले । मुद्दल गेलें ॥ २५ ॥ जाणत्यानें ऐसें न करावें । सार तेंचि शोधून घ्यावें । असार तें जाणोन त्यागावें । वमन जैसें ॥ २६ ॥ तें वमन करी प्राशन । तरी तें श्वानाचें लक्षण । तेथें शुचिष्मंत ब्राह्मण । काय करी ॥ २७ ॥ जिहीं जैसें संचित केलें । तयांस तैसेंच घडलें । जें अभ्यासीं पडोन जडलें । तें तों सुटेना ॥ २८ ॥ एक दिव्यान्नें भक्षिती । एक विष्ठा सावडिती । आपल्या वडिलांचा घेती । साभिमान ॥ २९ ॥ असो विवेकें- विण । बोलणें तितुका क्षीण । कोणी एकें श्रवण मनन । केलेंचि करावें ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकादशदशके विवेकनिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥ ५. राजकारण. श्रीगणेशाय नमः ॥ कर्म केलेंचि करावें । ध्यान धरलेचि धरावें । विव- रलेंचि विवरावें । पुनः निरूपण ॥ १ ॥ तैसें आम्हांस घडलें । बोलिलेचि बोलणें पडिलें । कां जें विघडलेंचि घडलें । पाहिजे समाधान ॥ २ ॥ ⁴अनन्य राहे समुदाय । इतर जनांस उपजे भाव । ऐसा आहे अभिप्राय । उपायाचा ॥ ३ ॥ एक हरिकथा निरूपण । दुसरें तें राजकारण । तिसरें तें सावधपण । सर्वविषयीं ॥ ४ ॥ चौथा अत्यंत साक्षेप । फेडावे नाना आक्षेप । अन्याय थोर अथवा अल्प । क्षमा करीत जावे ॥ ५ ॥ जाणावें पराचें अंतर । उदा- सीनता निरंतर । नीति न्यायांस अंतर । पडोंच न द्यावें ॥ ६ ॥ ⁶संकेतें लोक वेधावा । एकें अनेक बोधावा । प्रपंचहि सांवरावा । यथानुशक्त्या ॥ ७ ॥ प्रसंग समय ओळखावा । धीर बहुत असावा । संबंध पडों न द्यावा । अतिपरिचयाचा ॥ ८ ॥ उपाधीस विस्तारावें । उपाधींत न सांप- डावें । नीचत्व पहिलें घ्यावें । आणि मूर्खपण ॥ ९ ॥ दोष देखोन झांकावे । १.आळसाचा. २.बाजारास. ३.श्रीमान्. ४.एकनिष्ठ. ५.विश्वास. ६.चातुर्यानें.

११ वा.] महंतलक्षण. २६९ अवगुण अखंड न बोलावे । दुर्जन सांपडोन सोडावे । परोपकार करूनी ॥ १० ॥ तन्हे भरोंच नये । सुचावे नाना उपाय । नव्हे तेंचि करावें कार्य । दीर्घ प्रयत्नें ॥ ११ ॥ फड नासोंच न द्यावा । पडिला प्रसंग सांवरावा । अति वाद न करावा । कोणी एकासी ॥ १२ ॥ दुसऱ्याचें अभीष्ट जाणावें । बहुतांचें बहुत सोसावें । न सोसे तरी जावें । दिगंतरासी ॥ १३ ॥ दुःख दुसऱ्याचें जाणावें । ऐकोन तरी वांटून घ्यावें । बरें वाईट सोसावें । समु- दायाचें ॥ १४ ॥ अपार असावें पाठांतर । सन्निध असावा विचार । सर्वदा असावें तत्पर । परोपकारासी ॥ १५ ॥ शांति करून करवावी । तन्हे सांडून सांडावी । क्रिया करून करवावी । बहुतांकरवीं ॥ १६ ॥ करणें असला अपाय । तरी बोलोन दाखवूं नये । परस्परेंचि प्रलय । प्रचीतीस आणावा ॥ १७ ॥ जो बहुतांचें सोसीना । त्यास बहुत लोक मिळेना । बहुत सो- सितां उरेना । महत्व आपुलें ॥ १८ ॥ राजकारण बहुत करावें । परंतु कळोंच न द्यावें । परपीडेवरी नसावें । अंतःकरण ॥ १९ ॥ लोक पारखून सोडावे । राजकारणें अभिमान झाडावे । पुन्हा मेळवूनि घ्यावे । दुरिल्या दोरें ॥ २० ॥ हिरवटासि दुरी धरावें । कचराटासि न बोलावें । संबंध पडतां सांडूनि जावें । एकीकडे ॥ २१ ॥ ऐसें असे राजकारण । सांगतां तें असाधारण । सुचित्त असतां अंतःकरण । राजकारण जाणिजे ॥२२॥ वृक्षा- रूढास उचलावें । युद्धकर्त्यास ढकलून द्यावें । कारभाराचें सांगावें । अंग कैसें म्हणोनी ॥ २३ ॥ पाहतां तरी सांपडेना । कीर्ति करूं तरी राहेना । आलें वैभव अभिलाषीना । कांहीं केल्या ॥ २४ ॥ एकाची पाठी राखणें । एकास देखों न शकणें । ऐसीं नव्हेत कीं लक्षणें । चातुर्याचीं ॥ २५ ॥ न्यायें बोलतांहि मानेना । हित तेंचि न ये मना । येथें कांहींच चालेना । त्यागाविण ॥ २६ ॥ श्रोतीं कळोन आक्षेपिलें । म्हणोनि बोलिलेंचि बो- लिलें । न्यून पूर्ण क्षमा केलें । पाहिजे श्रोतीं ॥ २७ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकादशदशके राजकारणनिरूपणं नाम पंचमः समासः ॥५॥ ६. महंतलक्षण. श्रो गणेशाय नमः ॥ शुद्ध नेटकें ल्याहावें । लिहोन शुद्ध शोधावें । शोधून

२७० श्रीदासबोध. [ दशक शुद्ध वाचावें । चुकों नये ॥ १ ॥ विस्कलित मातृका नेमस्त कराव्या । धो- ट्या जाणोनि सदृढ धराव्या । रंग राखोन भराव्या । नाना कथा ॥ २ ॥ जाणायाचें सांगतां न ये । सांगायाचें नेमस्त न ये । समजल्याविण कांहींच न ये । कोणी एक ॥ ३ ॥ हरिकथा निरूपण । नेमस्तपणें राजकारण । वर्ता- याचें लक्षण । तेंहि असावें ॥ ४ ॥ पुसों जाणे सांगों जाणे । अर्थांतर करूं जाणे । सकळिकांचें राखो जाणे । समाधान ॥ ५ ॥ दीर्घसूचने आ- धींच कळे । सावधपणें तर्क प्रबळे । जाणजाणोनि वळे । यथायोग्य ॥ ६ ॥ ऐसा जाणे जो समस्त । तोचि महंत बुद्धिवंत । या वेगळें अंतवंत । सकळ कांहीं ॥ ७ ॥ ताल वेळ तान मानें । प्रबंध कविता जाड वचनें । मजा- लैसी नाना चिन्हैं । सुचत जावीं ॥ ८ ॥ जो एकांतास तत्पर । आधीं करी पाठांतर । अथवा शोधी अर्थांतर । ग्रंथगर्भीचें ॥ ९ ॥ आधींच शिकोन जो शिकवी । तोचि पावे श्रेष्ठ पदवी । गुंतल्या लोकांस उगवी । विवेकबळें ॥ १० ॥ अक्षर सुंदर वाचणें सुंदर । बोलणें सुंदर चालणें सुंदर । भक्ति ज्ञान वैराग्य सुंदर । करूनि दावी ॥ ११ ॥ जयास प्रयत्नाचि आवडे । नाना प्रसंगीं पवाडे । धीटपणें प्रगटे दडे । ऐसा नव्हे ॥ १२ ॥ सांकडीं- मध्यें वर्तो जाणे । उपाधीमध्यें मिळों जाणे । अलिप्तपणें राखो जाणे । आ- पणासी ॥ १३ ॥ आहे तरी सर्वां ठायीं । पाहों जातां कोठेंच नाहीं । जैसा अंतरात्मा ठायींचा ठायीं । गुप्त जाहला ॥ १४ ॥ त्या वेगळें कांहींच नसे । पाहों जातां तो न दिसे । न दिसोन वर्तवीतसे । प्राणिमात्रांसी ॥ १५ ॥ तैसाचि हााहि नानापरी । बहुत जनांसि शाहणे करी । नाना विद्या त्या विवरी । स्थूळ सूक्ष्म ॥ १६ ॥ आपणाकरितां शाहाणे होती । ते सहजचि सोयें धरिती । जाणतेपणाची महंती । ऐसी असे ॥ १७ ॥ राखो जाणे नीति न्याय । न करी न करवी अन्याय । कठिन प्रसंगीं उपाय । करूं जाणे ॥ १८ ॥ ऐसा पुरुष धारणेचा । तोचि आधार बहुतांचा । दास म्हणे रघुना- थाचा । गुण घ्यावा ॥ १९ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकादशदशके महंतलक्षणनिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६ ॥ १. अक्षरें. २. दूरवर विचार. ३. सभा. ४. शिरतो. ५. अगत्य. ६. निश्चयी.

११ वा. ] चंचळ नदी. २७१ ७. चंचळ नदी. श्रीगणेशाय नमः ॥ चंचळ नदी गुप्त गंगा । स्मरणें पावन करी जगा । प्रचीत रोकडी पहा गा । अन्यथा नव्हे ॥ १ ॥ केवळ अचंचळीं निर्माण झाली । अधोमुखें बळें चालिली । अखंड वाहे परी देखिली । नाहींच कोणीं ॥ २ ॥ लवणे वाकाणें भोवरें । उखळया तरंग झरे । लादा लाटा कातरे । ठायीं ठायीं ॥ ३ ॥ शुष्क जलाचे चळाळ । धारा धबावे खळाळ । चिपळया चळक्या भळाळ । चपळ पाणी ॥ ४ ॥ फेनें¹ फुगे हेलावे । सैरा- वैरा उदक धांवे । थेंब भुईं मोजावे । अणुरेणु किती ॥ ५ ॥ वोसणे वाहती उदंड । झोलावे दर्कुटे² दगड । खडके बेटें आड । वळसा³ उठे ॥ ६ ॥ मृदु भूमि तुटोन गेल्या । कठिण तैशाच राहिल्या । ठायीं ठायीं उदंड पाहिल्या । सृष्टीमध्यें ॥ ७ ॥ एक ते वाहतचि गेले । एक ते वळशामध्यें पडिले । एक सांकडींत अडकले । अधोमुखें ॥ ८ ॥ एक आपट आपटोनच गेलीं । एक चिरड चिरडोनीच मेलीं । कितीएक तीं फुगलीं । पाणी भरलें ॥ ९ ॥ एक बळाचे निवडिले । ते पोहतचि उगमासि गेले । उगमदर्शनें पवित्र झाले । तीर्थरूप ॥ १० ॥ तेथें ब्रह्मादिकांचीं भुवनें । ब्रह्मांडदेवतांचीं स्थानें । उफ- राटी गंगा पाहतां मिळणें । सकळांस तेथें ॥ ११ ॥ त्या जळाऐसें नाहीं निर्मळ । त्या जळाऐसें नाहीं चंचळ । आपो⁴नारायण केवळ । बोलिजे त्यासी ॥ १२ ॥ महानदी परी अंतराळीं । प्रत्यक्ष वाहे सर्वकाळीं । स्वर्गमृत्युपा- ताळीं । पसरली पाहा ॥ १३ ॥ अधोध्र्व अष्टहि दिशा । तिचें उदक करी व- ळसा⁵ । जाणते जाणती जगदीशा- । सारिखीचि ते ॥ १४ ॥ अनंत पात्रीं उदक भारिलें । कोठें पाझरपाझरोनि गेलें । कितीएक तें वेंचलेँ । संसारासी ॥ १५ ॥ एकासंगें तें कडवट । एकासंगें तें गुळवट । एकासंगें तिखट । तुरट खार ॥ १६ ॥ ज्या ज्या पदार्थास मिळे । तेथें तद्रूपचि मिसळे । सखोल भूमीस तुंबळे⁶ । सखोलपणें ॥ १७ ॥ विषामध्यें विषचि होतें । अमृता- मध्यें मिळोन जातें । सुगंधीं सुगंध तें । दुर्गंधीं दुर्गंध ॥ १८ ॥ गुणीं अव- गुणीं मिळे । ज्याचें त्यापरी निवळे । त्या उदकाचा महिमा न कळे । उद- केंविण ॥ १९ ॥ उदक वाहे अपरंपार । न कळे नदी कीं सरोवर । जळ- १. फेस. २. पाचोळा. ३. भोंवरा. ४. जलरूप ईश्वर. ५. वेष्टण. ६. सांचतें.

२७२ श्रीदासबोध. [ दशक

वास करून नर। राहिले कितीएक ॥ २० ॥ उगमापैलीकडे गेलें। तेथें परतोनि पाहिलें। तंव तें पाणीच आटलें। कांहींच नाहीं ॥ २१ ॥ वृत्तिशून्य योगीश्वर। याचा पाहावा विचार। दास म्हणे वारंवार। किती सांगों ॥ २२ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकादशदशके चंचलनदीनिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥ ८. अंतरात्मविवरण. श्रीगणेशाय नमः ॥ आधीं वंदूं सकळ कर्ता। समस्त देवांचा जो भर्ता। त्याचे भजनीं प्रवर्ता। कोणी तरी ॥ १ ॥ तेणेंविण कार्य न चले। पडिलें पर्ण तेंहि न हाले। अवघें त्रैलोक्यचि चाले। जयाचेनी ॥ २ ॥ तो अंतरात्मा सकळांचा। देव दानव मानवांचा। चार खाणी चार वाणींचा। प्रवर्तक ॥ ३ ॥ तो एकलाचि सकळां घटीं। करी भिन्नभिन्न राहटी। सकळ सृष्टीची गोष्टी। किती म्हणोन सांगावी ॥ ४ ॥ ऐसा जो गुप्तेश्वर। त्यास म्हणावें ईश्वर। सकळ ऐश्वर्य थोर थोर। जयाचेनि भोगिती ॥ ५ ॥ ऐसा जेणें वोळखिला। तो विश्वंभराच झाला। समाधि आणि सहज- स्थितीला। कोण पुसे ॥ ६ ॥ अवघें त्रैलोक्य विवरावें। तेव्हां वर्म पडे ठावें। अवचटें घबाडें सिणावें। नलगेचि कांहीं ॥ ७ ॥ पाहतां ऐसा कोण आहे। जो अंतरात्मा विवरोन पाहे। अल्प स्वल्प कळोन राहे। समाधानें ॥ ८ ॥ अरे हें पाहिलेंचि पाहावें। विवरलेंचि मागुती विवरावें। वाचिलेंचि वाचावें। पुनःपुन्हा ॥ ९ ॥ अंतरात्मा केवढा कैसा। पाहाणाराची कोण दशा। देखिल्या ऐकिल्या ऐसा। विवेक सांगे ॥ १० ॥ उदंड देखिलें ऐकिलें। अंतरात्म्यास न वचे पुरवलें। प्राणी देहधारी बाहुलें। काय जाणे ॥ ११ ॥ पूर्णास अपूर्ण पुरवेना। कां जें अखंड विवरेना। विवरतां विवरतां उरेना। देवावेगळा ॥ १२ ॥ विभक्तपणें नसावें। तरीच भक्त म्हणवावें। नाहीं तरी व्यर्थचि शिणावें। खटाटोपें ॥ १३ ॥ उगाच घर पाहोन गेला। घर- धनी नाहीं ओळखिला। राज्यामधूनचि आला। परी राजा नेणे ॥ १४ ॥ देहसंगें विषय भोगिले। देहसंगें प्राणी मिरवलें। देहहत्यांस चुकलें। नवल १. संकल्पविकल्परहित. २. आधार. ३. पदार्थांत. ४. अदृश्य ईश्वर. ५. पुष्कळ.

११ वा.] उपदेश. २७३ मोठें ॥ १५ ॥ ऐसे लोक अविवेकी । आणि म्हणती आम्ही विवेकी । बरें ज्याची जैसी टांकी । तैसें करावें ॥ १६॥ मूर्ख अंतर राखो नेणे । म्हणोन असावे शाहणे । ते शाहणेहि दैन्यवाणे । होऊन गेले ॥ १७॥ अंतरीं ठेवणें चुकलें । दारोदारीं धुंडूं लागले । तैसें अज्ञानासि झालें । देव न कळे ॥ १८॥ या देवाचें ध्यान करी । ऐसा कोण रे संसारीं । वृत्ति एकदेशी तरी । पवों- डेल कोठें ॥ १९ ॥ ब्रह्मांडीं दाटले प्राणी । बहुरूपें बहुवाणी । भूगर्भी आणि पाषाणीं । कितीएक ॥ २० ॥ इतुक्या ठायीं पुरवला । अनेकीं एकच वर्तला । गुप्त आणि प्रगटला । किती एक ॥ २१ ॥ चंचळ न होइजे नि- श्चळ । प्रचीत जाणावी केवळ । चंचळ नव्हे निश्चळ । परब्रह्म तें ॥ २२ ॥ तत्त्वें तत्त्व जेव्हां उडे । तेव्हां देहबुद्धि झडे । निर्मळ निश्चळ चहूकडे । निरंजन ॥ २३ ॥ आपण कोण कोठें कैंचा । ऐसा मार्ग विवेकाचा । प्राणी जो स्वयें काचा । त्यास हें कळेना ॥ २४ ॥ भल्यानें विवेक धरावा । दुस्तर संसार तरावा । अवघा वंश उद्धरावा । हरिभक्ति करूनी ॥ २५ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकादशदशके अंतरात्माविवरणनिरूपणं नाम अष्टमः समासः ॥ ८ ॥ ९. उपदेश. श्रीगणेशाय नमः ॥ आधीं कर्माचा प्रसंग । कर्म केलें पाहिजे सांग । कदाचित् पडलें व्यंग । तरी प्रत्यवाय घडे ॥ १ ॥ म्हणोन कर्म आरंभिलें । कांहीं एक सांग घडलें । जेथें जेथें अंतर पडलें । तेथें हरिसमरण करावें ॥ २ ॥ तरी तो हरि आहे कैसा । विचार पाहावा ऐसा । संध्येपूर्वी जगदीशा । चोवीस नामें स्मरावें ॥ ३॥ चोवीस नामीं सहस्र नामीं । अनंत्- नामीं तो अनामी । तो कैसा आहे अंतर्यामीं । विवेकें ओळखावा ॥ ४॥ ब्राह्मण स्नान करून आला । मग तो देवार्चनास बैसला । यथासांग तो पूजिला । प्रतिमादेव ॥ ५ ॥ नाना देवांच्या नाना प्रतिमा । लोक पूजिती धरूनि प्रेमा । ज्याच्या प्रतिमा तो परमात्मा । कैसा आहे ॥ ६ ॥ ऐसें ओळखिलें पाहिजे । ओळखून भजन कीजे । जैसा साहेब नमस्कारिजे । १. भावना. २. शिरेल ३. भूमीचे पोटांत. ४. पूर्ण. ५. दोष. ६. अधिकारी.

२७४ श्रीदासबोध. [ दशक ओळखिल्या उपरी ॥७॥ तैसा परमात्मा परमेश्वर । बरा ओळखावा पाहोनी विचार । तरीच पाविजे पार । भवसागराचा ॥ ८ ॥ पूजा घेताती प्रतिमा । अंगा येतो अंतरात्मा । अवतारी तरी निजधामा । येऊनि गेले ॥ ९ ॥ परी ते निजरूपें असती । तें निजरूप जगज्योती । सत्वगुण तयेस म्हणती । जाणती कळा ॥ १० ॥ तये कळेचे पोटीं । देव असती कोट्यानकोटी । या अनुभवाच्या गोष्टी । प्रत्ययें पाहाव्या ॥ ११ ॥ देहपुरामध्ये ईश । म्हणोन तया नांव पुरुष । जगामध्यें जगदीश । तैसा ओळखावा ॥ १२॥ जाणीवरूपें जगदाकारें । प्रस्तुत वर्तवी शरीरें । अंतःकर्णी विष्णु येणें- प्रकारें । ओळखावा ॥ १३ ॥ तो विष्णु आहे जगदंतरीं । तोचि आपुले अंतरीं । कर्ता भोक्ता चतुरीं । अंतरात्मा ओळखावा ॥१४॥ ऐके देखे हुंगे चाखे । जाणोन विचारें ओळखे । कितीक आपुलें पारखें । जाणताहे ॥१५॥ एकचि जगाचा जिव्हाळा । परी देहलोभाचा अडथळा । देहसंबंधें वेगळा । अभिमान धरी ॥१६॥ उपजे वाढे मरे मारी । जैशा उसळती लहरीवरी लहरी । चंचळसागरीं भरोवरी । त्रैलोक्य होत जातें ॥ १७ ॥ त्रैलोक्य वर्तवितो एक । म्हणोनि त्रैलोक्यनायक । ऐसा प्रत्ययाचा विवेक । पाहाना कैसा ॥ १८ ॥ ऐसा अंतरात्मा बोलिला । परी तोहि तत्त्वांमध्ये आला । पुढें विचार पाहिजे केला । महावाक्याचा ॥१९॥ आधीं देखिला देहधारी । मग पाहिला जगदंतरीं । तयाचेनि याउपरी । परब्रह्म

११ वा.] निस्पृहवर्तन. २७५ १० निस्पृहवर्तन. श्रीगणेशाय नमः ॥ मूर्ख एकदेशी होतो । चतुर सर्वत्र पाहतो । जैसा बहुधा होऊनि भोगितो । नाना सुखें ॥ १ ॥ तोचि अंतरात्मा महंत । तो कां होईल संकोचित । प्रशस्त जाणता समस्त । विख्यात योगी ॥ २ ॥ कर्ता भोक्ता तत्वतां । भूमंडळीं सर्व सत्ता । त्या वेगळा त्यास ज्ञाता । पा- हेसा कवण ॥ ३ ॥ ऐसें महंतें असावें । सर्व सार शोधूनि घ्यावें । पाहों जातां न सांपडावें । एकाएकीं ॥ ४ ॥ कीर्तिरूपें उदंड ख्यात । जाणती ल- हान थोर समस्त । वेष पाहतां शाश्वत । एकहि नाहीं ॥ ५ ॥ प्रगट कीर्ति ते ढळेना । बहुत जनांस कळेना । पाहों जातां आढळेना । काय कैसें ॥ ६ ॥ वेषभूषण तें दूषण । कीर्तिभूषण तें भूषण । चालनेविण एक क्षण । जा- ऊंच नेदी ॥ ७ ॥ त्यागी ओळखीचे जन । सर्वकाळ नित्य नूतन । लोक शोधून पाहती मन । परी इच्छा दिसेना ॥ ८ ॥ पुरतें कोणाकडे पाहेना । पुरतें कोणासी बोलेना । पुरतें एके स्थळीं राहेना । उठोन जातो ॥ ९ ॥ जातो स्थळ तें सांगेना । सांगितलें तरी तेथें जायेना । आपली स्थिति अनुमाना । येवूं च नेदी ॥ १० ॥ लोकीं केलें तें चुकवी । लोकीं भाविलें तें उलथवी । लोकीं तर्किले तें दावी । निष्फळ करुनी ॥ ११ ॥ लोकांस पाह्याचा आदर । तेथें याचा आनादर । लोक सर्वकाळ तत्पर । तेथें याची अनिच्छा ॥ १२ ॥ एवं कल्पितां कल्पेना । तर्कितांहि तर्केना । कदापि भावितां भावेना । यो- गीश्वर ॥ १३ ॥ ऐसें अंतर सांपडेना । शरीर ठायीं पडेना । क्षण एक विसं- बेना । कथाकीर्तन ॥ १४ ॥ लोक संकल्प विकल्प करिती । ते अवघेच नि- ष्फळ होती । जनांची जनां लाजवी वृत्ती । तेव्हां योगेश्वर ॥ १५ ॥ बहुतीं शोधून पाहिलें । बहुतांच्या मनास आलें । तरी मग जाणावें साधिलें । मह- त्कृत्य ॥ १६ ॥ अखंड एकांत सेवावा । अभ्यासचि करित जावा । काळ सार्थकाचे करावा । जनांसहित ॥ १७ ॥ उत्तम गुण तितुके घ्यावे । घेऊन जनांस शिकवावे । उदंड समुदाय करावें । पुरी गुप्तरूपें ॥ १८ ॥ अखंड कामाची लगबग । उपासनेस लावावें जग । लोक समजोन मग । आज्ञा इच्छिती ॥ १९ ॥ आधीं कष्ट मग फळ । कष्टचि नाहीं तें निष्फळ । संक्षेपें- १. वस्त्रांलंकारांची शोभा. २. कल्पिलें. ३. जाणवेना. ४. उद्योगावांचून.

विण केवळ । वृथा पुष्ट ॥ २० ॥ लोक बहुत शोधावे । त्यांचे अधिकार जाणावे । जाणजाणोनि धरावे । जवळीं दुरीं ॥ २१ ॥ अधिकारपरत्वें कार्य होतें । अधिकार नसतां व्यर्थ जातें । जाणोन शोधावीं चित्तें । नानाप्रकारें ॥ २२ ॥ अधिकार पाहून कार्य सांगणें । साक्षेप पाहून विश्वास धरणें । आपला मेंगज राखणें । कांहीं तरी ॥ २३ ॥ हें प्रचीतीचें बोलिलें । आधीं केलें मग सांगितलें । मानेल तरी पाहिजे घेतलें । कोणीएकें ॥ २४ ॥ महं- तें महंत करावे । युक्तिबुद्धीनें भरावे । जाणते करोन विखरावे । नाना देशीं ॥ २५ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकादशदशके निस्पृहवर्तन- निरूपणं नाम दशमः समासः ॥ १० ॥ ओवी २८७.

दशक बारावा.

१. विमललक्षण.

श्रीगणेशाय नमः ॥ आधीं प्रपंच करावा नेटका । मग घ्यावें परमार्थ- विवेका । येथें आळस करूं नका । विवेकी हो ॥ १ ॥ प्रपंच सांडून परमार्थ कराल । तेणें तुम्ही कष्टी व्हाल । प्रपंच परमार्थ चालवाल । तरी तुम्ही विवेकी ॥ २ ॥ प्रपंच सोडून परमार्थ केला । तरी अन्न मिळेना खा- याला । मग तया करंट्याला । परमार्थ कैंचा ॥ ३ ॥ परमार्थ सांडूनि प्रपंच करिसी । तरी तूं यमयातना भोगिसी । अंतीं परम कष्टी होसी । यमयातना भोगितां ॥ ४ ॥ साहेब कामास नाहीं गेला । गृहींच सुरवाडोन बैसला । तरी साहेबी कुठिली तयाला । पाहती लोक ॥ ५ ॥ तेव्हां महत्वचि गेलें । दुर्जनांचें हांसें झालें । दुःख उदंड भोगिलें । आपुल्या जीवें ॥ ६ ॥ तैसेंचि होणार अंतीं । म्हणोनि भजावें भगवंतीं । परमार्थाची प्रचीती । रोकडी घ्यावी ॥ ७ ॥ संसारीं असतां मुक्त । तोचि जाणावा सुयुक्त । अखंड पाहे युक्तायुक्त । विचारणा हे ॥ ८ ॥ प्रपंचीं जो सावधान । तो परमार्थ करील जाण । प्रपं- चीं जो अप्रमाण । तो परमार्थां खोटा ॥ ९ ॥ म्हणोन सावधानपणें । प्रपंच-


१. बोज. २. पाठवावे. ३. हुद्देदार. ४. सुस्त होऊन. ५ अव्यवस्थित.

. १२ वा. ] प्रत्यय. २७७ परमार्थ चालवणें । ऐसें न करितां भोगणें । नाना दुःखें ॥ १० ॥ पेंर्णाळी पाहोन ऊंचले । जीवसृष्टि विवेकें चाले । आणि पुरुष होऊन श्रमले । या- सि काय म्हणावें ॥ ११ ॥ म्हणोन असावी दीर्घसूचना । अखंड करावी चाळणी । पुढील होणार अनुमाना । आणून सोडावें ॥ १२ ॥ सुखी असतो खबरदार । दुःखी होतो बेखबर । ऐसा हा लौकिक विचार । दिसतचि आहे ॥ १३ ॥ म्हणोन सर्व सावधान । धन्य तयाचें महिमान । जनीं राखे समा- धान । तोचि एक ॥ १४ ॥ चालनेचा आळस केला । तरी अवचितां पडेल घाला । ते वेळे सांवरायाला । अवकाश कैंचा ॥ १५ ॥ म्हणोन दीर्घसूच- नेचे लोक । त्यांचा पाहावा विवेक । लोकांकरितां लोक । शहाणे होती ॥ १६ ॥ परी ते शहाणे वोळखावे । गुणवंताचे गुण घ्यावे । अवगुण दे- खोन सांडावे । जनांमध्यें ॥ १७ ॥ मनुष्य पारखूं रहेना । आणि कोणाचें मन तोडीना । मनुष्यमात्र अनुमाना । आणून पाहे ॥ १८ ॥ दिसे सक- ळांसि सारिखा । पाहतां विवेकीं नेटका । कामी निकामी लोकां । बरें पाहे ॥ १९ ॥ जाणोन पाहिजे सर्व । हेंचि तयाचें अपूर्व । ज्याचें त्यापरी गौ- रव । राखो जाणे ॥ २० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वादशदशके विमललक्षणनिरूपणं नाम प्रथमः समासः ॥ १ ॥ २. प्रत्यय. श्रीगणेशाय नमः ॥ ऐका संसारासि आले हो । स्त्री पुरुष निस्पृह हो । सुचित्तपणें पाहो । अर्थांतर ॥ १ ॥ काय म्हणते वासना । काय कल्पिते कल्पना । अंतरींचे तरंग नाना । प्रकारें उठती ॥ २ ॥ बरें खावें बरें जे- वावें । बरें ल्यावें बरें नेसावें । मनासारिखेंच असावें । सकळ कांहीं ॥ ३ ॥ ऐसें आहे मनोगत । परी तें कांहींच न होत । बरें करितां अकस्मात । वा- ईट होतें ॥ ४ ॥ एक सुखी एक दुःखी । प्रत्यक्ष वर्ततें लोकीं । कष्टी होऊ- निया शेखीं । प्रारब्धावारि घालिती ॥ ५ ॥ अचूक यत्न करवेना । म्हणोन केलें तें सजेना । आपुला अवगुण जाणवेना । कांहीं केल्या ॥ ६ ॥ जो आपुला आपण नेणे । तो दुसऱ्याचें काय जाणे । न्याय सोडितां दैन्यवाणे । १. झाडावरील कीड. २. पाऊल उचलते. ३. मनुष्येतर जीव. ४. विचार.

[२७८] श्रीदासबोध. [ दशक

होती लोक ॥ ७ ॥ लोकांचें मनोगत कळेना । लोकांसारिखें वर्त्तवेना । मूर्खपणें लोकीं नाना । कलह उठती ॥ ८ ॥ मग ते कलह वाढती । पर- स्परें कष्टी होती । प्रयत्न राहतां अंतीं । श्रमचि होय ॥ ९ ॥ ऐसी नव्हे वर्तणुक । परीक्षावे नाना लोक । समजले पाहिजे नेमक । ज्याचें त्यापरी ॥ १० ॥ शब्दपरीक्षा अंतरपरीक्षा । कांहीं एक कळे दक्षा । मनोगत नेत- दक्षा । काय कळे ॥ ११ ॥ दुसऱ्यास शब्द ठेवणें । आपला कैपक्ष घेणें । पाहों जातां लौकिक लक्षणें । बहुतैक ऐसीं ॥ १२ ॥ लोकीं बरें म्हणाया- कारणें । भल्यास लागतें सोसणें । न सोसितां भंडवाणें । सहजचि होय ॥ १३ ॥ आपणास जें मानेना । तेथें कदापि राहवेना । डैरी तोडून जा- वेना । कोणी एकें ॥ १४ ॥ बोलतो खरें चालतो खरें । त्यास मिळती ल- हान थोरें । न्याय अन्याय परस्परें । सहजचि कळे ॥ १५ ॥ लोकांस कळेना तंववरी । विवेकें क्षमा जो न करी । तेणें करितां बराबरी । होत जाते ॥ १६ ॥ जंववरी चंदन झिजेना । तंववरी तो सुगंध कळेना । चंदन आणि वृक्ष नाना । संगत होती ॥ १७ ॥ जंव उत्तम गुण न कळे । तों या जनास काय कळे । उत्तम गुण देखतां निवळे । जगदंतर ॥ १८ ॥ जगदंतर निव- ळत गेलें । जगदंतरीं सख्य झालें । तरी मग जाणावे वोळले । विश्वजन ॥ १९ ॥ जरी जनार्दन वोळला । तरी काय उणें तयाला । राजी राखावें सकळांला । कठिन आहे ॥ २० ॥ पेरितें तें उगवतें । उसणें द्यावें घ्यावें लागतें । वर्म काढितां भंगतें । परांतर ॥ २१ ॥ लौकिकीं बरेपण केलें । तेणें सौख्य वाढलें । उत्तरासारिखें आलें । प्रत्युत्तर ॥ २२ ॥ हें अवघें आप- णापासीं । येथें बोल नाहीं जनांसी । शिकवावें आपुल्या मनासी । क्षणक्षणां ॥ २३ ॥ खळ दुर्जन भेटला । क्षमेचा धीर बुडाला । तरी मौनेंचि स्थळ- त्याग केला । पाहिजे साधकें ॥ २४ ॥ लोक नाना परीक्षा जाणती । परी अंतरपरीक्षा नेणती । तेणें प्राणी करंटे होती । संदेह नाहीं ॥ २५ ॥ आप- णास आहे मरण । म्हणोन राखावें बरेपण । कठिन आहे लक्षण । विवेकाचें ॥ २६ ॥ थोर लहान समान । आपुले पारिखे सकळ जन । चढतें वाढतें समाधान । करितां बरें ॥ २७ ॥ बरें करितां बरें होतें । हें तों प्रत्ययास


१. मूर्खास. २. बाजू. ३. भीड. ४. समान.

१२ वा. ] देवभक्त. २७९ येतें । आतां पुढें सांगावें तें । कोणास काय ॥ २८ ॥ हरिकथा निरूपण । बरेपणें राजकारण । प्रसंग पाहिल्याविण । सकळ खोटें ॥ २९ ॥ विद्या उदंडचि शिकला । प्रसंगमान चुकतचि गेला । मग तये विद्येला । कोण पुसे ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वादशदशके प्रत्ययनिरूपणं नाम द्वितीयः समासः ॥ २ ॥ ३. देवभक्त. श्रीगणेशाय नमः ॥ पृथ्वीमध्यें बहुत लोक । तिहीं पाहावा विवेक । इहलोक आणि परलोक । बरा पाहावा ॥ १ ॥ इहलोक साधावयाकारणें । जाणत्याची संगति धरणें । परलोक साधावयाकारणें । सद्गुरु पाहिजे ॥ २ ॥ सद्गुरूसि काय पुसावें । हेंहि कळेना स्वभावें । अनन्यभावें एकभावें । दोन्ही गोष्टी पुसाव्या ॥ ३ ॥ दोन्ही गोष्टी त्या कोण । देव कोण आपण कोण । त्या दों गोष्टींचें विवरण । केलेंचि करावें ॥ ४ ॥ आधीं मुख्य देव तो कोण । मग आपण भक्त तो कोण । पंचीकरण¹ महावाक्य विवरण । केलेंचि करावें ॥ ५ ॥ सकळ केलियाचें फळ । शाश्वत ओळखावें निश्चळ । आपण कोण हा केवळ । शोध घ्यावा ॥ ६ ॥ सारासार विचार घेतां । पदार्थास नाहीं शाश्वतता । आदिकारण भगवंता । वोळखिलें पाहिजे ॥ ७ ॥ निश्चळ चं- चळ आणि जड । अवघा मायेचा पेंवाड² । यामध्यें वस्तु जाड³ । जाणारे नाहीं ॥ ८ ॥ तें परब्रह्म धुंडावें । विवेकें त्रैलोक्य हिंडावें । मायिक विचारें खंडावें । परीक्षवंतीं ॥ ९ ॥ खोटें सांडून खरें घ्यावें । परीक्षवंतीं परीक्षावें । मायेचें अवघेंचि जाणावें । रूप मायिक ॥ १० ॥ पंचभौतिक हे माया । मायिक जाय विलया । पिंड ब्रह्मांड अष्टकार्ये⁴ । नाशवंत ॥ ११ ॥ दिसेल तितुकें नासेल । उपजेल तितुकें मरेल । रचेल तितुकें खचेल । रूप मायेचें ॥ १२ ॥ वाढेल तितुकें मोडेल । येईल तितुकें जाईल । भूतांस भूत खा- ईल । कल्पांतकाळीं ॥ १३ ॥ देहधारक तितुके नासती । हे तों रोकडी प्रचीती । मनुष्यांविण उत्पत्ती । रेत कैंचें ॥ १४ ॥ अन्न नसतां रेत कैंचें । औषधी नसतां अन्न कैंचें । औषधीस जिणें कैंचें । पृथ्वी नसतां ॥ १५ ॥ १. पंचभूतांचा विचार. २. विस्तार. ३. श्रेष्ठ. ४. आठ शरीरें.

आपें नसतां पृथ्वि नाहीं । तेज नसतां आप नाहीं । वायु नसतां तेज नाहीं । ऐसें जाणावें ॥ १६ ॥ अंतरात्मा नसतां वायु कैंचा । विकार न- सतां अंतरात्मा कैंचा । निर्विकारीं विकार कैंचा । बरें पाहा ॥ १७ ॥ पृथ्वी नाहीं आप नाहीं । तेज नाहीं वायु नाहीं । अंतरात्मा विकार नाहीं । नि- र्विकारीं ॥ १८ ॥ निर्विकार जें निर्गुण । तेचि शाश्वताची खूण । अष्टधा प्रकृति संपूर्ण । नाशवंत ॥ १९ ॥ नाशवंत समजोन पाहिलें । तों तें असतांच नसतें झालें । सारासारें कळों आलें । समाधान ॥ २० ॥ विवेकें पाहिला विचार । मनास आलें सारासार । येणें करितां विचार । सढळ जाहला ॥ २१ ॥ शाश्वत देव तो निर्गुण । ऐशी अंतरीं बाणली खूण । देव कळला मी कोण । कळलें पाहिजे ॥ २२ मी कोण पाहिजे कळलें । देह- तत्व तितुकें शोधिलें । मनोवृत्तीच्या ठायीं आलें । मीतूं पण ॥ २३ ॥ सकळ- देहाचा शोध घेतां । मीपण दिसेना पाहतां । मीतूं पण हें तत्वतां । तत्त्वीं मावळलें ॥ २४ ॥ दृश्य पदार्थाचे वोसरे । तत्त्वें तत्व तेव्हां सरे । मीतूं पण कैंचें उरे । तत्वता वस्तु ॥ २५ ॥ पंचीकरण तत्वविवरण । महावाक्यें वस्तु आपण । निःसंगपणें निवेदन । केलें पाहिजे ॥ २६ ॥ देवभक्तांचें मूळ । शोधून पाहतां सकळ । उपाधीवेगळा केवळ । निरुपाधि आत्मा ॥ २७ ॥ मीपण तत्त्वीं बुडालें । विवेकें वेगळेपण गेलें । निवृत्तिपैदास प्राप्त झालें । उन्मनीपद ॥ २८ ॥ विज्ञानीं राहिलें ज्ञान । ध्येयीं राहिलें ध्यान । सकळ कांहीं कार्यकारण । पाहोनि सांडिलें ॥ २९ ॥ जन्ममरणाचें चुकलें । पाप अवघेंचि बुडालें । यमयातनेचें झालें । निसंतान ॥ ३० ॥ निर्बंध अवघाच तुटला । विचारें मोक्ष प्राप्त झाला । जन्म सार्थकचि वाटला । सकळही ॥ ३१ ॥ नाना किंतु निवारिले । धोके अवघेच तुटले । ज्ञानविवेकें पावन झाले । बहुत लोक ॥ ३२ ॥ पतितपावनाचे दास । तेहि पावन करिती जगास । ऐशी हे प्रतीत मनास । बहुतांच्या आली ॥ ३३ ॥ इति श्री- दासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वादशदशके देवभक्तनिरूपणं नाम तृतीयः स- मासः ॥ ३ ॥


१. पाणी. २. मोक्षास. ३. निर्विकल्प समाधि. ४. पतितोद्धारी श्रीहरीचे.

१२ वा.] विवेकवैराग्य. २८१ ४. विवेकवैराग्य. श्रीगणेशाय नमः ॥ महद्भाग्य हातासि आलें । परी भोगूं नाहीं जाणि- तलें । तैसें वैराग्य उत्पन्न झालें । परी विवेक नाहीं ॥ १ ॥ आदळतें आफ- ळतें । कष्टी होतें दुःखी होतें । ऐकतें देखतें येतें । वैराग्य तेणें ॥ २ ॥ नाना प्रपंचाच्या वोढी । नाना संकटें सांकडीं । संसार सांडून देशधडी । होय तेणें ॥ ३ ॥ तो चिंतेपासून सुटला । पराधीनतेपासून पळाला । दुः- खत्यागें मोकळा झाला । रोगी जैसा ॥ ४ ॥ परी तो होऊं नये मोकाट । नष्ट भ्रष्ट आणि चाट । सीमाचि नाहीं सैराट । गुरुं जैसें ॥ ५ ॥ विवेकें- विण वैराग्य केलें । तरी अविवेकें अनर्थी घातलें । अवघें व्यर्थचि गेलें । दोहींकडे ॥ ६ ॥ ना प्रपंच ना परमार्थ । अवघें जिणेंचि झालें व्यर्थ । अ- विवेकें अनर्थ । ऐसा केला ॥ ७ ॥ कां व्यर्थचि ज्ञान बडबडिला । परी वराग्ययोग नाहीं घडला । जैसा कारागृहीं अडकला । पुरुषार्थ सांगे ॥ ८ ॥ वैराग्येंविण ज्ञान । तो व्यर्थचि साभिमान । लोभदंभें घोळसून । का- सावीस केला ॥ ९ ॥ श्वान बांधिलें तरी भुंके । तैसा स्वार्थमुळे थिंके¹ । परौधिक देखों² न शके । साभिमानें ॥ १० ॥ हें एकेंविण एक । तेणें उ- गाच वाढे शोक । आतां वैराग्य आणि विवेक-। योग ऐका ॥ ११ ॥ विवेकें अंतरीं सुटला । वैराग्यें प्रपंच तुटला । अंतर्बाह्य मोकळा झाला । निःसंग योगी ॥ १२ ॥ जैसें मुखें ज्ञान बोले । तैशीच सर्व क्रिया चाले । दीक्षा देखोन चकित झाले । शुचिष्मंत ॥ १३ ॥ आस्था नाहीं त्रैलोक्याची । स्थिति बाणली वैराग्याची । यत्न विवेक धारणेची³ । सीमा नाहीं ॥ १४ ॥ संगीत रसाळ हरिकीर्तन । तालबद्ध तानमान । प्रेमळ आवडीचें भजन । अं- तरापासूनी ॥ १५ ॥ तात्काळचि सन्मार्ग लागे । ऐसा अंतरीं विवेक जागे । वक्तृत्व करितां न भंगे । साहित्य प्रत्ययाचें ॥ १६ ॥ सन्मार्गें जगास मि- ळाला । म्हणजे जगदीश वोळला । प्रसंग पाहिजे कळला । कोणीएक ॥ १७ ॥ प्रखर वैराग्य उदासीन । प्रत्ययाचें ब्रह्मज्ञान । ज्ञान संध्या भगव- द्भजन । पुण्यमार्ग ॥ १८ ॥ विवेकवैराग्य तें ऐसें । नुसतें वैराग्य हेंकाड- पिसें । शब्दज्ञान वेळीलेंसें⁴ । आपणचि वाटे ॥ १९ ॥ म्हणोन विवेक १. उसळतो. २. दुसऱ्याचें बरें. ३. चित्ताच्या एकाग्रतेची. ४. मिळमिळीत.

२८२ श्रीदासबोध. [ दशक आणि वैराग्य । तेंचि जाणिजे महद्भाग्य । रामदास म्हणे योग्य । साधु जाणती ॥ २० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वादशदशके विवेक- वैराग्यनिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥ ५. आत्मनिवेदन. श्रीगणेशाय नमः ॥ १रेघेचें गुंडाळें केलें । मातृकोक्षरीं शब्द झाले । शब्द मिळवून चाले । श्लोक गद्य प्रबंध ॥ १ ॥ वेद शास्त्रं पुराणे । नाना काव्यें निरूपणें । ग्रंथभेद २अनुवादणें । किती म्हणोनी ॥ २ ॥ नाना ऋषि नाना मतें । पाहों जातां असंख्यातें । भाषा लिपी जेथें तेथें । काय उणें ॥ ३ ॥ वर्ग ३ऋचा श्रुति स्मृती । अध्याय सर्ग स्तबक जाती । प्रसंगमानें समास पोथी । बहुधा नामें ॥ ४ ॥ नाना पदें नाना श्लोक । नाना बीर नाना क- डक । नाना साख्या दोहरे अनेक । नामाभिधानें ॥ ५ ॥ डफगाणें माची- गाणें । दिंडीगाणें कथागाणें । नाना मानें नाना जैसणें । नाना खेळ ॥ ६ ॥ ध्वनि घोष नाद रेखा । चहूं वाचामध्यें देखा । वाचारूपेंहि ऐका । नाना- भेद ॥ ७ ॥ ५उन्मेष ६परा ध्वनि पश्यंती । नाद मध्यमा शब्द चौथी । 'वैख- रीपासून उमटती । नाना शब्दरत्नें ॥ ८ ॥ अकार उकार मकार । अर्धमा- त्रांचे अंतर । ७औटेंमात्रा तदनंतर । बावन ८मातृका ॥ ९ ॥ नाना भेद राग- ज्ञान । नृत्यभेद तान मान । अर्थभेद तत्वज्ञान । विवंचना ॥ १० ॥ तत्वां- मध्यें मुख्य तत्व । तें जाणावें शुद्ध सत्व । अर्धमात्रा महत्तत्व । मूळमाया ॥ ११ ॥ नाना तत्वें लहान थोरें । मिळोन अष्टहि शरीरें । अष्टधा प्रकृ- तीचें वारें । निघोन जातें ॥ १२॥ वारें नसतां गगन । तैसें परब्रह्म सघन । अष्टदेहांचें निरसन । करून पाहावें ॥ १३ ॥ ब्रह्मांडपिंडउभार । पिंड- ब्रह्मांडसंहार । दोहीं वेगळें सारासार । विमळ ब्रह्म ॥ १४ ॥ पदार्थ जड आत्मा चंचल । विमळ ब्रह्म तें निश्चळ । विवरोनि विवरे तात्काळ । तद्रूप १. रेषांचें गुंडाळें करून अक्षरें बनविलीं, अक्षरांपासून शब्द झाले. २. सांगणें. ३. वेदांतील वाक्यें म्हणजे ऋचा, व कांहींएक ऋचा मिळून वर्ग. ४. मनोरंजक गोष्टी. ५. अंतःस्फुरण. ६. उन्मेष ही परा, ध्वनि ही पश्यंती, नाद ही मध्यमा व शब्द ही वैखरी या चार वाणी. ७. साडेतीन अक्षरें, ॐकार. ८. अ ते ज्ञपर्यंत.

१२ वा.] सृष्टिक्रम. २८३ होय ॥ १५ ॥ पदार्थ मनें काया वाचा । मी हा अवघा देवाचा । जड आत्म- निवेदनाचा । विचार ऐसा ॥ १६ ॥ चंचळकर्ती तो जगदीश । प्राणिमात्र त्याचा अंश । त्याचा तोचि आपणास । ठाव नाहीं ॥ १७ ॥ चंचळ आत्म- निवेदन । याचें सांगीतलें लक्षण । कर्ता देव तो आपण । कोठेंचि नाहीं ॥ १८ ॥ चंचळ चले स्वभाकार । निश्चळ देव तो निराकार । आत्मनिवेद- नाचा प्रकार । जाणिजे ऐसा ॥ १९ ॥ ठावचि नाहीं चंचळाचा । तेथें आधीं आपण कैंचा । निश्चळ आत्मनिवेदनाचा । विवेक ऐसा ॥ २० ॥ तिहीं प्रकारें आपण । नाहीं नाहीं दुजेपण । आपण नसतां मीपण । नाहींच कोठें ॥ २१ ॥ पाहतां पाहतां अनुमानलें । कळतां कळतां कळां आलें । पाहतां अवघें निवांत झालें । बोलणें आतां ॥ २२ ॥ इति श्रीदासबोधे गुरु- शिष्यसंवादे द्वादशदशके आत्मनिवेदननिरूपणं नाम पंचमः समासः ॥५॥ ६. सृष्टिक्रम. श्रीगणेशाय नमः ॥ ब्रह्म निर्मळ निश्चळ । शाश्वत अमल विमळ । अव- काश घन पोकळ । गगनाऐसें ॥ १ ॥ तयास करणें ना धरणें । तयास जन्म ना मरणें । तेथें येणें ना जाणें । शून्यातीत ॥ २ ॥ तें रचेना ना ख- चेना । तें होयना ना जायना । मायातीत निरंजना । पारचि नाहीं ॥ ३ ॥ पुढें संकल्प उठिला । षड्गुणेश्वर बोलिजे त्याला । अर्धनारीनटेश्वराला । बोलिजेतें ॥ ४ ॥ सर्वेश्वर सर्वज्ञ । साक्षी द्रष्टा ज्ञानघन । परेश परमात्मा जगज्जीवन । मूळपुरुष ॥ ५ ॥ ते मूळमाया बहुगुणी । अधोमुखें गुण- क्षोभिणी । गुणत्रय तिजपासूनी । निर्माण झालें ॥ ६ ॥ पुढें विष्णु झाला निर्माण । जाणती कळा सत्वगुण । जो करिताहे पाळण । त्रैलोक्याचें ॥७॥ पुढें जाणीव नेणीव मिश्रित । ब्रह्मा जाणावा नेमस्त । त्याच्या गुणें उत्पत्ति होत । भुवनत्रयीं ॥ ८ ॥ पुढें रुद्र तमोगुण । सकळसंहाराचें कारण । सक- ळ कांहीं कर्तेपण । तेथेंचि आलें ॥ ९ ॥ तेथूनि पुढें पंचभूतें । पावलीं स्पष्टदशेतें । अष्टधा प्रकृतीचें स्वरूप तें । मुळींच आहे ॥ १० ॥ निश्चळीं १. सत्ता, धर्म, यश, संपत्ति, ज्ञान, आणि वैराग्य या सहा गुणांनीं युक्त. २. खालीं; संसारोत्पत्तीकडे. ३. दृश्य रूपास.

२८४ श्रीदासबोध. [ दशक झालें चळण । तेंचि वायूचें लक्षण । पंचभूतें आणि त्रिगुण । सूक्ष्म अष्टधा ॥ ११ ॥ आकाश म्हणिजे अंतरात्मा । प्रत्ययें पाहावा महिमा । त्या आका- शापासून जन्मा । वायु आला ॥ १२ ॥ तया वायूच्या दोन्ही झुळुका । उष्ण शीतळ ऐका । शीतळापासुनि तारा मृगांका¹ । जन्म जाहला ॥ १३ ॥ उष्णापासून रवि वन्ही । विद्युल्लता आदिकरूनी । शीतळ उष्ण मिळोनी । तेज जाणावें ॥ १४ ॥ तया तेजापासून झालें आप । आप आळोनि पृ- थ्वीचें रूप । पुढें औषधी अमूप । निर्माण जाहल्या ॥ १५ ॥ औषधींपा- सून नाना रस । नाना बीजें अन्नरस । चौऱ्यांशी लक्ष योनींचा वास । भूमं- डळीं ॥ १६ ॥ ऐशी झाली सृष्टिरचना । विचार आणिला पाहिजे मना । प्रत्ययेंविण अनुमाना² । पात्र होइजे ॥ १७ ॥ ऐसा झाला आकार । येणेंचि न्यायें संहार । सारासार विचार । यासि बोलिजे ॥ १८ ॥ जें जें जेथूनि निर्माण झाल