सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 101, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ७३ अर्थ.-आम्ही त्या परमेश्वराच्या जवळ वावरणारे असल्यामुळे तो कसा आहे तसा आमच्या ध्यानात आला आहे कान्होबाच्या मनातील भाव आम्हास समजला असून तो काही वेगळी भावना धरून असतो असे नाही १ ज्याची जशी वासना असेल तशी तो त्याला पीडा देत असतो हे मात्र खरे असून हा श्रीहरी कर्माकडे नुसता पाहात असतो सर्व लीलाचे कौतुक तो बघत असतो २ तो स्वत ही काही खेळ खेळतो, पण कुणाच्या डावात मात्र सापडत नाही त्याचा भार त्याच्या डोक्यावर ठेवून देतो, कुणी या डावात अडकून पडतात तर कुणी या प्रपंचाच्या डावातून मोकळे होतात ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा गोपाळ हातात घास घेऊन ज्याचा कसा अधिकार असेल तसा त्याला काल्याचा भाग देत असतो ४ १४७ काम सारुनि सकळ । आले अवघे गोपाळ । जाली आता वेळ । म्हणती आणा सिदोऱ्या ॥ १ ॥ देती आपुलाला झाडा । गाई वंसविल्या वाडा । दोदिल बोबडा । वाकड्याचा हरि मेळीं ॥ २ ॥ आपुलालिये आवडी । मुदा घातल्या परवडी । निवडूनिया गोडी । हरि मेळवी त्यात तें ॥ ३ ॥ भार वागविला खांदीं । नव्हती मिळाली जो मांदी । सकाळचे सदी । वोझीं अवघीं उतरलीं ॥ ४ ॥ मागे जो सातडी । त्यासि रागा येती गडी । तुझी का रे कुडी । येथें मिष्या भावना ॥ ५ ॥ एक एकाच्या संवादे । कैसे धाले 'ब्रह्मानंदे । तुका म्हणे पर्दे । या रे वदू हरीचीं ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - वाडा-गोठ्यात, दोधील-मोठ्या पोटाचा, परवडी-विविध प्रकारच्या, मांदी-समुदाय, सदी-अडचणीत, कुडी-खोटी, धाल-आनंद अर्थ - नित्यची सर्व कामे करून झाल्यावर सर्व गोपाळ एकत्र झाले व म्हणू लागले, आता वेळ झाली आपल्या शिदोऱ्या सोडा पाहू १ मग सर्वजण आपापल्या कर्माचा हिशेब देऊन इंद्रियरूपी गाई आपल्या हृदयाच्या गोठ्यात बाधू लागले श्रीहरीच्या भोवती मोठ्या पोटाचा दोदील बोबडा, वाकडा असे सवंगडी होते २ या गोपाळांनी आपापल्या आवडीनुसार नाना प्रकारच्या भावभक्तीच्या विविध प्रकारच्या मुदा बाधल्या त्यातील गोडी निवडून श्रीहरीनेही आपली शुद्ध बाबड त्यात मिसळली ३ जो पर्यंत हे गोपाळ समुदायात एकत्र झालेले नव्हते तोपर्यंत त्यातील प्रत्येकास आपापला भार खाद्यावर वागवावा लागत होता पण आता सगळ एकत्र आल्यावर अडचणींची ओझी खाद्यावरून खाली आली ४ जो उतावळा होऊन श्रीहरीचे प्रेम प्रथम मागतो त्यास दुसरे रागावितात व म्हणतात, अशी तुझी खोटी भावना का रे? ५ तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे एकमेकाच्या सवादात सर्व गोपाळ ब्रह्मानंद मिळवून सतुष्ट झाले, ही सतुष्टता देणाऱ्या श्रीहरीची पाऊले आपण वदन करू या ६ १४८ यमुनें पावलीं । गडिया बोले वनमाळी ॥ आणा सिदोऱ्या सकळी । काला करु आजी । अवघें एके ठायीं । करूनि स्वाद घ्याचा पाहीं । मजपाशीं आहे ते ही । तुम्हामाजी देतों ॥ १ ॥ १ परमानंद तु गाथा १०