सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 102, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें७४ सार्थ तुकारामगाथा म्हणती बरवें गोपाळ । म्हणती बरवें गोपाळ । वाहाती सकळ । मोहरी पांवे आनंदें । खडकीं सोडियेल्या मोटा । अवघा केला एकवटा । काला करुनिया वांटा । गडिया देतो हरि ॥ २ ॥ एकापुढें एक । घाली हात पसरी मुख । गोळा पांवे तया सुख । अधिकचि वाटे । म्हणती गोड जाले । म्हणती गोड जालें । आणिक देईं । नाहीं पोट धालें ॥ ३ ॥ हात नेतो मुखापासी । एर आशा तोड वासी । खाय आपण तयासी । दावी वांकुलिया । देउनिया मिठी । पळे लागतील पाठीं । धरूनि काढितील ओठीं । मुखामाजी घाली ॥ ४ ॥ म्हणती ठकडा रे कान्हा । लावी घांसा भरी राणा । दुम करितो शहाणा । पाठोपाठीं तयाच्या । अवघियांचें खाय । कवळ कृष्णा माझी माय । सुरवर म्हणती हाय हाय । सुखा अंतरलों ॥ ५ ॥ एक एका मारी । हुंगा पाठी तोंडावरी । गोळा न साहवे हरि । म्हणे पुरे आतां । येतो काकुलती । गोळा न साहवे श्रीपती । म्हणे खेळों आतां नीती । सांगों आदरिलें ॥ ६ ॥ आनंदाचे फेरी । माजी घालुनियां हरी । एक घालिती हुंबरी । वाती शिंगें पांवे । वांकडे बोबडे । लूडे मूडे एक लूडे । कृष्णा आवडती पुढें । बहु भाविक ते ॥ ७ ॥ करी कवतुक । त्यांचें देखोनियां मुख । हरी वाटतसे सुख । खदखदां हांसें । एक एकाचें उच्छिष्ट । खातां न मानिती वीट । केलीं लाजतां हीं धीट । आपुलिया संगें ॥ ८ ॥ नाहीं ज्याची गेली भुक । त्याचें पसरवितो मुख । अवघियां देतो सुख । सारिखेंच हरी । म्हणती भला भला हरी । तुझी संगती रे बरी । आतां चाळविसी तरी । न वजों आणिकां सवें ॥ ९ ॥ गाई विसरल्या चार । पक्षी श्वापदांचे भार । जालें यमुनेचें स्थिर । जळ वाहो ठेलें ।