सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 103, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ७५ देव पाहाती सकळ । मुखें घोटूनियां लाळ । धन्य म्हणती गोपाळ । धिग जालों आम्ही ॥ १० ॥ म्हणती कैसें करावे । म्हणती कैसें करावें । यमुनाजळीं व्हावें । मत्स्य शेष घ्यावया । सुरवरांचे थाट । भरलें यमुनेचें तट । तंव अधिकची होंट । मटमटां वाजवी ॥ ११ ॥ आनंदें सहित । क्रीडा करी गोपीनाथ । म्हणती यमुनेंत हात । नका धुऊं कोणी । म्हणती जाणे जीवींचें । म्हणती जाणे जीवींचें । लाजे त्यास येणें कैंचे । शेष कृष्णाचे । लाभ थोरिवे ॥ १२ ॥ धन्य दिवस काळ । आजी पावला गोपाळ । म्हणती धालों रे सकळ । तुझिया नि हातें । मानवले गटी । एक एकांचे आवडी । दहीं सादलें परवडी । धणीवरी आजी ॥ १३ ॥ तुझा संग वरवा । नित्य आम्हां द्यावा । ऐसें करूनि जीवा । नित्य देवा चालावें । तंव म्हणे वनमाळी । घ्या रे काठिया कांबळी । आतां जाऊं खेळोमेळीं । गाई चारावया ॥ १४ ॥ तुका म्हणे प्रेमें धालीं । कोणा न साहवे चाली । गाई गोपाळांसि केली । आपण यांसरी ॥ १५ ॥ आजि जाला आनंद । आजि जाला आनंद । खाले परमानंद । सवे आम्हांसहित ॥ १६ ॥ शब्दार्थ व टोपा :- पावळों-तीरावर, याहाती-वाजविती, मोहरी-मुरली, ठकडा-चतुराईने फसविणारा, दुम करणे-धूम पळणे, वाती-वाजविती, पुडा-बोटे, मुडे-वाकडे, लुडे-लुळे, होंट-ओठ अर्थ - यमुनेच्या तीरावर असलेल्या सर्व सोबत्याना श्रीहरी म्हणाले, चला रे आपण आपल्या शिदोऱ्या आज सकाळीच सोडू आपण सर्वांचा एकत्र काला करू. सर्व शिदोऱ्या एक करुन मी त्याचा स्वाद पाहीन माझ्या जवळची जी शिदोरी आहे तीही मी तुमच्याजवळ देतो १ 'तेव्हा बरे आहे, बरे आहे' असे सर्व गोपाळांनी म्हटले व ते मोठ्या आनंदाने मुरली आणि पावे वाजवू लागले सर्वांनी नदीच्या काठावरील खडकावर आपापल्या शिदोऱ्यांची गाठोडी सोडली व सर्वांचा एकत्र काला केला; व सर्व मित्राना श्रीहरी त्याचा भाग वाटून देऊ लागला २ यावेळी जो तो दुसऱ्याच्या अगोदर आपणास वाटा मिळावा म्हणून तोंड अथवा हात पसरू लागला. ज्याला मोठा वाटा मिळाला त्याला फारच सुख होई, व तो फार छान झाले, छान झाले असे म्हणू लागला सर्वजण म्हणत राहिले की आमचे पोटच भरले नाही. आम्हास आणखी काला हवा ३ देवाने तोंडापाशी हात नेला की दुसरा आपल्यास काला मिळाया म्हणून तोंड उघडून त्याच्याकडे पाहू लागता, पण श्रीहरी स्वतःच खाऊ लागला व भागणारास गमतीने वेडावू लागला. सर्व काला स्वत एकट्यानेच मुखात घालून तो श्रीहरी पळू लागला. तेव्हा सर्व गोपाळ त्याच्या पाठोपाठ धावू लागले ४ आणि म्हणायला लागले की, हा कान्हा मोठा फसवा आहे. एका घासासाठी