सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 216, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें१८२ सार्थ तुकारामगाथा मोठ्या आदराने श्रीकृष्णच्या गुणगानात तल्लीन झाल्या या सज्जनाच्या सहवासाच्या सुखास अंत नाही ४ या भक्तीचे प्रेम चराचर सृष्टीत निर्माण झालेले असते ते कधी तुटत नाही त्याच्या ठिकाणी वापरभावही निर्माण होत नाही, हा आप्त म्हणून जवळचा, हा दूरचा असा विचार तेथे नसतो त्याच्याजवळ किंवा त्याच्याहून दूर हे ज्याच्या त्याच्या संचित कर्माप्रमाणे ठरते ज्याच्या त्याच्या मनात कर्माचा जसा रंग असेल तसा श्रीहरी त्याला जवळचा व दूरचा वाटतो ५ या गोपींच्या व संताच्या उच्छिष्टाचे भोजन मात्र या तुकारामास मिळाले आहे आतबाहेरून प्रेमाचा पूर ओसंडून आला आहे या गोपिकांची श्रीकृष्णस्तुती ज्याच्या कानी पडली त्या जीवाचे जतन आपोआपच होते तुकाराम महाराजसुद्धा हे श्रीचरण हृदयाशी धरतात ६ ३७८ आजि का यो तू दिससी दुश्चित्ती । म्हणी एका मन लगे तुझ्या चित्तीं । दिले ठेवू ते विसरसी हाती । नेणो काय बैसला हरि चित्तीं वो ॥ १ ॥ सर सर परती जालीस आता भांड । कैसे दाखविसी जगासी या तोंड । व्याली माय ते लाजविली रांड । नाही थार दो ठायीं जाला खड वो ॥ २ ॥ होते तैसे ते उमटले वरी । बाह्य संपादणी अंतरीची चोरी । नाहीं मर्यादा निसंग' बावरी । मन हे गोविंदीं देह काम करी वो ॥ ३ ॥ नाहीं करीत उत्तर कोणासवे । पराधीन भोजन दिले खावे । नाही अचळ सांवरावा ठावे । देखो उदासीन तुज गे देहभावे वो ॥ ४ ॥ कोठें नेणो हा फावला एकांत । सदा किलकिल भोवती बहुत । दोघे एकवाटा बोलावया मात । नाहीं लाज धरिली दिला हात वो ॥ ५ ॥ करी कवतुक खेळ खेळे कान्हा । दावी लाघव भाउवी सासुसुना । परा भक्ति हे शुद्ध तुम्ही जाणा । तुका म्हण ऐसे फळो यावे जना वो ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - दुश्चित्ती-उदास भांड-भांडखोर, अचळ-पदर, किलकिल-बिलबिल, गोंगाट, लाघव- कौतुक अर्थ - एक सासू आपल्या सुनेला म्हणत आहे आज तू मुली, अशी उदास का ग दिसत आहेस ? एका कामात तुझे चित्त लागेल तर शपथ जी वस्तू ठेवून देतेस ते स्थान तू विसरून जातेस तुझ्या चित्तात काय त्या श्रीहरीने ठाण दिले आहे काय न कळे १ दूर हो तू दूर हो तू पुरतीच भांडखोर व निर्लज्ज झालीस आता या जगास तोंड कसे दाखवणार आहेस ? तुला जन्म देणारी तुझी आई रांडच म्हटली पाहिजे तिने रांडेलाही लाजविले आहे तुला जन्म देऊन सासरमाहेर या दोन्ही बाजूचा तुझा संबंध तुटला ना २ तुझ्या मनात जे काळेबेरे होते तेच बाहेर प्रकटले कितीही बाहेरची बतावणी केलीस तरी तुझ्या मनात जे चोरटपट होते ते प्रगट झालेच की तुला आता काहीच मर्यादा नाही राहिली तू अगदी निसंग व बावरी बनली आहेस तू वरवर कामात देह राबवीत असलीस तरी तुझ्या मनात त्या गोविंदाने कायमचे स्थान दिले आहे ३ तू धड कोणाशी बोलत नाहीस कुणाला उत्तर देत नाहीस पराधीनासारखी वागतेस, कुणी भोजन दिले तरच घेतेस, अंगावरला पदर सावरावा हेही भान तुला उरत नाही तुझा सारा देहभावच उदासीन होऊन गेलेला आहे ४ तसे पाहिले तर तुझ्या भोवती हा नेहमीच गजबजाट असतो पण तुला कुठे एकांत मिळाला कुणास माहीत ! दोघांनी एकत्र राहून कसे व कुठ बोलणे केलेत हे कळत नाही लाजलज्जा सोडून तू हरीच्या हातात हात दिलास तरी कसा ग ? ५ तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे तो श्रीकृष्ण कौतुकाने खेळ खेळतो सासूसुनांचे भांडण लावून कौतुक पाहतो तो परंतु ही श्रेष्ठ प्रकारची भक्ती तुम्ही जाणा सर्व लोकांनी ही भक्ती समजावून घ्यावी ६ १ निशंक