भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 217, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 217

सार्थ तुकारामगाथा १८३ ३७९ भरिला सांडूनि रिता करी घट । मीस पाण्याचे गोविदाची चट । चाले झडझडां उसंतूनि वाट । पाहे पाळतूनि उभा तोचि नीट वो ॥ १ ॥ चाळा लाविलेले गोप गोपीनाथें । जाणे आवडीचें रूप जेथें तेथें । दावो बहुतांच्या बहुवेषपंथें । गुणातीतें खेळ मांडियेला येथें वो ॥ २ ॥ मनीं आवडे तें करावें उत्तर । कांहीं निमित्ताचा पाहोनि आधार । उगा राहे कां मारिसी फंकर । मात वाढविसी उत्तरा उत्तर वो ॥ ३ ॥ धरिली सोडी दे टाकोनियां मागें । न ये विनोद हा कामा मर्जी संगें । मिठी घालीन या जीवाचिया त्यागें । नाहीं ठाउकीं पडिलीं तुझीं सोंगें रे ॥ ४ ॥ सुख अंतरींचें बाह्य ठसठसी । म्हणे विनोद हा काय सोंग यासी । तुज मज काय सोयरीक ऐती । नंदनंदन या थोरपणें जाती रे ॥ ५ ॥ खरी कारण तें कळों नेदी कोणा । सुख अंतरींचें बाह्य रंग जाणा । मन भिनलें रे तुका म्हणे मना । भोग अंतरींचा पावे नारायणा वो ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- उलंडूनि-सांडून, रिता-रिकामा, मीस-निमित्त, चट-सवय, फंकर-खडा अर्थ :- श्रीकृष्णाच्या दर्शनाची लालसा या गोपींच्या मनात पाहा किती आहे घरी पाण्याने भरलेला घट त्यांनी सांडून दिला व पाणी भरण्याचे निमित्त करून त्या गोविंदाच्या दर्शनास चटावलेल्या गोपी नदीपलीकडे निघाल्या श्रीकृष्णाकडे जाणारी वाट त्या झपाझपा चालू लागल्या आणि तो श्रीहरी आपलीच वाट पाहात आहे असे त्यांनी पाहिले. १ अशा प्रकारे या श्रीकृष्णाने या गोपगोपिकांना चांगलेच छेडावून सोडले आहे त्यांना आपल्या प्रीतीचे असे हे कृष्णरूपच जिथे तिथे दिसते. या गुणातीत श्रीकृष्णाने नाना वेष धारण करून हा खेळ मांडिला आहे. २ मनात जे आहे त्यास अनुसरून काही भाषण करावे त्याच्याशी, अशा आवडीच्या निमित्ताचा आधार घेऊन त्या म्हणू लागल्या, 'कृष्णा, उगी रहा ना ! उगाच खडा का मारतोस ? माझ्याशी बोलणे वाढवून का उत्तर देतोस ? ३ अशी ही पायीट सोड तू टाकून दे ना ही तुझी थट्टा माझ्यापाशी नाही चालणार. मी आपला जीव सोडून तुला मिठी देईन तुझे असली सोंगे मला चांगलीच माहीत पडली रे.' ४ अशा प्रकारे या गोपींच्या हृदयात साठवलेले श्रीकृष्ण- प्रीतीचे सुख बाहेर प्रगटून येते. त्या म्हणतात, 'असा या विनोदाचा अभिप्राय तू आमच्याशी का करतोस ? अशा ऐट्रीचे तुझे व आमचे नाते तरी आहे का ? तू नंदाच्या थोरपणावर जाऊ नकोस तू श्रीमंताचा पोर म्हणून ऐट दाखवू नकोस.' ५ तुकाराम महाराज म्हणतात, हा श्रीकृष्ण काय रूप धरील ते कुणासही समजून देत नाही या गोपींच्या बाह्य आचरणाचे रंग विविध प्रकारांचे असले तरी त्यांच्या मनातील सुख मात्र मोठेच आहे. या गोपींचे मन श्री- कृष्णाच्या मनाशी मिळून गेले आहे त्यामुळे या गोपींचे सर्व भोग त्या श्रीकृष्णालाच प्राप्त होतात ६ ३८० आजि नवल मीं आलें येणें राजें । भेटी अवचिती नंदाचिया कान्हें । गोठी सांगती वो सकळ ही जन । होतें संचित आगियेले तेणें वो ॥ १ ॥ गेलें होउनि न चले आतां कांहीं । साद घालितां जबळी दुजें नाहीं । अंगीं जडला मग उरलें तें काई । आतां राखतां गुमान भलें बाई वो ॥ २ ॥ बहुत कामें मज नाहीं आरावूक । एक सारितां तों पुढें उभें एक । आजि मी टाकोनि आले सकळिक । तंव रचिलें आणिक कवतुक वो ॥ ३ ॥ चिंता करितां हरिली नारायणें । अंगसंगें मिनतां' दोघेजणें । सुखें निर्भरे जालियें त्याच्या गुणें । तुका म्हणे खुंटलें येणे जाणें वो ॥ ४ ॥ १ जाता

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ) · पृष्ठ 217, कुल 611 में से · BharatKosha