भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 218, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 218

१८४ सार्थ तुकारामगाथा शब्दार्थ व टीपा : - गोवी- गुतागुल, साव घालणे-हाक मारणे, गुमान-गुप्त, आराधूक-सौख्य, निर्भर- पूर्ण, विश्वाती, सुटले-सपले अर्थ : - आज फारच नवल झाले, कारण मी या रानात आले व गोविंदाची अवचितपणे भेट झाली हो सर्व माणसे या भेटीविषयी फार गुतागुत सागत असत; पण हा नदाचा कान्हा माझ्या पूर्व पुण्याईने आज मला भेटला हो १ आता जे व्हावचे ते होऊन गेले आता दुसरा काही उपायच उरला नाही बरे, त्यावेळी कुणास तरी हाक मारावी तर कुणी दुसरे तिथे नव्हतेच मग तो श्रीकृष्ण माझ्या अगाशी जडला मग आता काय उरले? आता बाई सर्व गुप्तपणे ठेवावे, पुणास काही सांगू नये हेच खरे २ आतापर्यंत मला पुष्कळ कामे होती, एक संपले, की दुसरे उपस्थित होई मला कशी ती विश्वाती नव्हती पण आज मात्र मी ती सर्व कामे सोडली व येथे आले तो त्या श्रीकृष्णाने येथे आणलीनच एक नवे कौतुक रचले पाहा ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशी चिंता ती गोपी करीत असतानाच तो नारायणाने दूर केली दोघाची अगे एकमेकास मिळाल्यावर दोघानाही सपूर्ण सुख झाले व त्यामुळे पुन जन्मास येणे जाणे सपले ४ ३८१ मैं भुली घरजानी वाट । गोरस बेचन आयै हाट ॥ १ ॥ कान्हा रे मनमोहन लाल । सब ही बिसरू देखै गोपाल ॥ २ ॥ फाहा पग डारू देख आनेरा । देखें तो सब थोहिने घेरा ॥ ३ ॥ हुं तो यकित भैर तुका । भागा रे सब मनका धोका ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा : - मैं-मी, भुली-विसरले, हाट-बाजार, पग-पाऊल अर्थ - एक गोपी म्हणत आहे, मी या बाजारात गाईचे दूध विकण्यासाठी आले होते पण आता परत जाताना घराची वाटच विसरून गेले आहे १ या मनमोहन कन्हैयाने, लालाने माझे चित्त हरण केले या गोपा- ळाच्या नादात मी सर्व विसरून गेले २ मी आता पाऊल तरी कुठे टाकू ? जिकडे तिकडे त्याच्या रूपाने मला घेरले आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे सर्व लाघव पाहून ती गोपी चकित होऊन गेली. तिच्या मनातील सर्व प्रकारची भीती नष्ट झाली ४ विवरण - येथून पुढचे दोन व हा एक असे तीन अभग मराठी भाषेतील नाहीत ते हिंदी भाषेतील आहेत. मराठी सतार्नी हिंदी भाषेत फार मोठी रचना केलेली आहे राम व कृष्ण ही दोन प्रधान दैवते उत्तर हिंदुस्थानातील गगा, यमुना हिमालय द्वारका, मथुरा, वृन्दावन काशी, पुरी ही प्रमुख तीर्थस्थाने उत्तरेसच तेव्हा पूर्वीपासून यात्रेच्या निमित्तान उत्तर हिंदुस्थानात सारखी येजा असे नामदेव दोन वेळा उत्तरेत पजाबापर्यंत गेले होते पहिल्या खेपेस त्याच्याबरोबर ज्ञानेश्वरादिकाच सतसमळही होते एकनाथस्वामीनीही काशीयात्रा केलेली होती रामदास तर साऱ्या भारतात बारा वर्षापर्यंत भ्रमण करीत होते लोकस्थिती डोळसपणे पाहात होते उत्तरेचे साधुसतही दक्षिणेकडे रामेश्वरापर्यंत येत असत याच्या वैचारिक देवाण घेवाणीची भाषा अर्थातच सस्कृत किंवा हिंदी असावी श्रीकृष्णाच्या, श्रीरामाच्या भक्तिभावाने त एकत्र बाघले गेले होते सर्व भारतीय माधुसताची निष्ठा एक आहे अनुभूती एक आहे भक्तिमार्गाची चाल एक आहे भाषेचा, धर्माचा जातीचा विचार बाजून राहून या साधुसताच्या प्रचारकार्यात एक परमेश्वराची जवळीक हेच नान दृढ होते कबीर, तुलसीदास, सूरदास, थी चैतन्यदेव नरसीमेहता त्यागराज, पुरदरदास इत्यादी सतकवी श्रीकृष्ण, श्रीराम थोविठ्ठल याच्या प्रेमाने बद्ध झालेले असल्यामुळे त्याची अनुभूती समान होती मराठी संतानी हिंदी भाषेत वचने कशासाठी केली ? हिंदी भाषाच जाणणाराची सोय त्यात किती होती याविषयी तक करण कठिन आहे पण एक अदाज असा की सूरदास नददास, मीराबाई इत्यादी कृष्णभक्त कवीनी व सतानी हिंदी भाषेतून अवीटपणे श्रीकृष्णाचे स्तवन केले आहे त्याच्या लीला गाइल्या आहेत हिंदी, विशेपत ब्रजभाषा ही जणू कृष्णलीला गाण्यासाठीचे तयार झाली अनेक साधुसंताच्या व कृष्णलीलाच्या सहवासाने पवित्र बनलेली ही भाषा याच प्रेमापोटी एकदा वापरून पाहण्याची इच्छा मगाठी संताना व्हावी हे साहजिकच आहे या एका वृत्तीतून मराठी सताच्या हिंदी भाषेतील कृष्णलीलाकडे पाहाण्यासारखे आह

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ) · पृष्ठ 218, कुल 611 में से · BharatKosha