भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 219, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 219

सार्थ तुकारामगाथा १८५ ३८२ हरिविन रहिया न जाये जिहिरा । कबकी पाडी देखें राहा ॥ १ ॥ क्या मेरे लाल¹ कवन चुकी भई । क्या मोहिपासितो बेर लगाई ॥ २ ॥ कोई सखी हरी जावे बुलावन । वार हि डारू उसपर तन ॥ ३ ॥ तुका प्रभु कब देखें पाऊ । पासीं आऊ फेर न जाऊ ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - जिहिरा-प्राण, पाडी-वाट, बेर-वेळ, तन-शरीर अर्थ - या श्रीहरीशिवाय माझा आता प्राण राहाणार नाही मी किती तरी वेळ झाला त्याची वाट पाहात उभी आहे १ माझ्या लाला, कृष्णा माझ्या हातून काही चूक झाली का रे ? माझ्याकडे येण्यास एवढा वेळ तरी का केलास ? २ कुणी एखादी सखी या श्रीहरीला बोलावणारी भेटेल तर मी तिच्यावरून जीव ओवाळून टाकीन ३ तुकाराम महाराज म्हणतात, या प्रभूची पायने मी कधी बरे पाहीन ? एवढा त्याच्यापाशी पोचल्यावर मग मी परत फिरणार नाही ४ ३८३ भलो नदाजीको डिकरो । लाज राखीलीन हमारो ॥ १ ॥ आगळ आवो² देवजी कान्हा । में घरछोडी³ आहे म्हागा ॥ २ ॥ उनसु कळना⁴ नव्हे तो भला । खसम अहकार दादुला ॥ ३ ॥ तुकाप्रभु परबल⁵ हरी । छपी आहे हु जगायी न्यारी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा -डिकरो-मुलगा, आगळ-पुढे, खसम-कंठव, रागाट परवल-बलवान अर्थ - ह्या नंदराजाचा मुलगा फार चांगला आहे कारण त्यानेच माझी लाज राखली आहे १ नदाच्या कृष्णा, जरा पुढे ये ना तुझ्यासाठी मी घर सोडून भेटण्यासाठी आले आहे २ माझा अहंकाररूपी पती फार रागीट आहे, त्यास कळता कामा नये नाही तर तो फार रागवेल ३ तुकाराम महाराज म्हणतात हा प्रभू फार बलवान आहे याच्या मागेच मी या जगापासून वेगळी होऊन लपली आहे ४ ३८४ नका कांहीं उपचार माझ्या शरीरा । करुं⁶ न साहती बहु होतो उवारा । मनोजन्य व्यथा वेध जाला अंतरा । लवकरी आणा नंदाचिया कुमरा⁷ ॥ १ ॥ सखिया वेशिया तुम्ही प्राणवल्लभा । निवेदिला भाव आर्तभूत या लोभा । उमटली अंगीं यो सांवळी प्रभा । साच हे अवस्था कळे मज माझ्या क्षोभा ॥ २ ॥ नये कळों नेदावी हे दुजियांसि मात । घडाया तयासी उत्कंठा एकांत । एकाएकीं साक्षों येयें आपुले चित्त । कोण्या काळें होईल नेणो भाग्य उदित वो ॥ ३ ॥ स्वाद सोण देहभान निद्रा खटन । पाहिले तटस्थ उन्मळित लोचन । अवघे वोसाऊन उरले ते चरण । तुका म्हणे दर्शनापें आले जीवन ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - उवारा-उष्णता वेशिया-आधार अर्थ - श्रीकृष्णाच्या विरहाने तापलेली एक विरहिणी आपल्या मैत्रिणीस म्हणत आहे माझ्या शरीराला काही शीतोपचार करू नका मैत्रिणींनो तुमचे उपचार काही मला आता सहन होत नाहीत त्यांच्यामुळे फारच उष्णता वाढत आहे माझा रोग माझ्या मनास झालेला आहे त्याचे दुख मनास होणारे आहे एकच उपाय करता येण्यासारखा आहे तो करा त्या नदाच्या कुमाराला लौकर आणा बर १ अग सख्यानो, मैत्रिणींनो, तुम्हीच मला अशा प्रसंगी मोठा आधार आहात म्हणून माझ्या मनातील हा सर्व भाव मी तुम्हांस सांगितला हो त्या श्रीकृष्णाचा वेध माझ्याकडे पाहा किती आहे त्याची सावळी प्रभा माझ्या अंगात उमटून आली आहे ही सब स्थिती खरीच १ जाउ २ आवे ३ मे घर छाडी आहे म्हागा ४ उन्हम् कळना वेतो भला ५ परबली ६ न साहवे मज बहु होतो उवारा ७ कुमारा वो ८ भावना वो तु गाथा २४