सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 220, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें१८६ सार्थ तुकारामगाथा आहे, हे माझ्या या अवस्थेवरून समजेल तुम्हांस. २ माझ्या मनाची ही अवस्था पुन्हा दुसऱ्यास सांगू नका बरं. त्या श्रीहरीशी एकान्त घडावा अशीच मनात उत्कट इच्छा आहे. यात आपले एकट्याचेच चित्त साक्षीत असावे. अहो भाग्य माझे केव्हा उदयास येईल ग ? ३ रुची, शोष, देहभान, निद्रा याचा नाश होऊन तटस्थ अशी अवस्था केव्हा प्राप्त होईल ? डोळे अर्धोन्मीलित कधी होतील ? सर्व काही नाहीसे होऊन त्या श्रीहरीचेच चरण मला केव्हा दिसतील बरे ?' तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जीवालाच जगवणाऱ्या त्या देवाचे दर्शन मला झाले. ४ ३८५ पडिली भुली धांवतें संराट । छंद गोविंदाचा चोजवितें वाट । मागें सांडोनि सकळ बोभाट । वंदीं पदांबुजें ठेवूनि ललाट वो ॥ १ ॥ कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी । होतें १ वहिले लपाला आतां खांदीं ॥ कोठें आड आली हे देहबुद्धी । धांवा आळवीं करुणा कृपानिधी वो ॥ २ ॥ मागें बहुताचा अंतरला संग । मुळें जयाचिया तेणे केला त्याग । पहिलें २ पाहतां ते हरपलें अंग । खुंटली वाट नाहीसे जाले जग वो ॥ ३ ॥ शोकें वियोगें घडला सकळांचा । गेल्या शरण हा अन्याय आमुचा । केला उच्चार रे घडल्या दोषांचा । जाला प्रगट स्वामी तुकयाचा वो ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- भुली-मोह, भ्रम संराट-स्वैरतेने, चोजविते-शोधिने, शुद्धी-शोध, वहिले-सत्वर अर्थ :-त्या श्रीकृष्णच्या नादाची भूल मला पडली आहे. मोह निर्माण झाला आहे. त्या गोविंदाचाच एक छंद मला लागला असून मी त्याचीच वाट शोधीत आहे. लोक काय म्हणतात हे सर्व सोडून मी त्याच्या चरणावर डोके ठेवून त्यास वंदन करीत आहे १ त्या गोविंदाचा शोध कोणी तरी करील काय ? हा सत्वर कुठे तरी झाडांच्या फांदी- मागे लपला काय ? का माझीच देहबुद्धी कुठे आड आली म्हणून तो मला दिसत नाही काय ? त्या करुणेच्या सागराला, कृपेच्या निधीला आळवून कुणी तरी बोलवा हो २ या कृष्णाच्यासाठी मी मागील सर्व संबंधियांचा संग सोडला; आणि हा सख्य ज्याच्यासाठी सोडला तोही मला सोडून गेला ना. पुढे त्याची मूर्ती मला आता दिसेना व मागच्या जगाचीही वाट खुंटल्यासारखीच झाली की हो ३ त्या गोपींचा घोर वियोगमुळे फार झाला. सगळ्यांना त्या प्रभूचा वियोग घडला. मग त्या श्रीहरीला शरण गेल्या आम्ही फार अन्याय केला असे म्हणू लागल्या. हातून घडलेल्या दोषांचा त्यांनी उच्चार केला आणि मग तुकाराम महाराज म्हणतात, माझा स्वामी प्रकट झाला ४ ३८६ काय उणे का करितोसि चोरी । किती सांगो तुज नाइकसी हरी । परपरता ३ तूं पळोनि जाशी दुरी । अनावर या लटिकिया बाहेरी वो ॥ १ ॥ माया करणा हे करिते बहुत । किती सोसूं या जनांचे ४ आघात । न पुरे अवसरु हेचि नित्यानित्य । तूं चि सोडवीं करूनि स्थिर चित्त वो ॥ २ ॥ बहुत कामें मी गुंतलियें घरीं । जासी डोळा तूं चुकावूनि हरी । करितां लाग न येसीच पळभरी । नाहीं सायासाची उरों दिली उरी वो ॥ ३ ॥ तुज म्हणीयें मी न सगँ अनंता । नको जाऊं या डोळियां परता । न लगे जोडी हे तुजयिण आतां । तुक्यास्वामी कान्होबा गुणभरिता वो ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- परपरता-परा वाचेच्या पलीकडील अर्थ :- श्रीकृष्णाच्या विविध खोड्या पाहून त्याची आई यशोदा त्याला एकदा म्हणाली, 'कृष्णा, अरे, आपल्या घरी काय कमी आहे रे ? म्हणून तू दुसऱ्याच्या घरी जाऊन चोऱ्या करतोस ? तुला सांगावे तरी किती रे • १ होते वाईले लपाले. २ पैल ३ परे परता ४ जगाचे