सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 222, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें१८८ सार्थ तुकारामगाथा ३८८ मिळोनि गौळणी देती यशोदे गाऱ्हाणीं । दहि दुध तुप लोणी शिया मुरे काहीं । मेळवुनी पोरे तेथें रिघे एकसरें । बेगी आणोनी सामोरे तेथें लोणी खाय ॥ १ ॥ हरि सोकला वो हरि सोकला वो । सोकला तो वारी¹ तुज लाज नाहीं तरी । आम्हा सापडता उरी तुज मज नाहीं ॥ २ ॥ तुज वाटते कोड² यासि लागतसे गोड । काय हासतेसी वेड तुज लागले वो । आम्ही जाऊ तुजवरी पोरे चाळविल्या पोरी । काय सागो भाडखोरी लाज वाटे आम्हा ॥ ३ ॥ मुख मळिण वदन उभा हाडतिये घोणे । तब दसवती म्हणे आणा शीक लावू । चोर आणिला काटाळा घरी दारी लोकपाळी । डेरा रिघोनि मुसळा तेथें लोणी खाय ॥ ४ ॥ मिळोनि सकळा दाये लावूानया गळा । कैसा बांधिती उखळा येथें राहे उगा । बरा सापडलासी हरी आजिच्याने करिसिल चोरी । डोळे घालुनिया येरी येरीकडे हासे ॥ ५ ॥ फाकल्या सकळा उपडोनिया उखळा । मोडी वृक्ष विमळार्जुन दोन्ही । उठिला गजर दसवती नव्हे घोर । धावे तुकयाचा दातार आळंगिला वेगीं ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - रिघे-शिरतो एकसरे-एकदम, वारी-आवर कोड-कौतुक हाथचियाचे-गळयाखालचा खळगा, घोणे-माना खाला घालून बसण अर्थ - साऱ्या गौळणी मिळून श्रीकृष्णाच्या खोड्याबद्दल यशोदा मातेजवळ गाऱ्हाणी सांगू लागल्या त्या म्हणू लागल्या की, आमच्या घरी शिक्यावर दही, दूध लोणी तूप यापैकी तुझा मुलगा खोडरी काहीच उरू देत नाही : गावातील पोरे तो जमवितो व घरात एकदम शिरून शिक्यावरील लोणी आम्ह्यासमोर खातो १ हा तुझा हरी असा धीटपणा करून लोणी खायला सोकावला आहे तू त्याला आवर बाई, नाही तर तुलाही लाज नाही असे मानू आम्ही, मग तो आमच्या हातात सापडला तर मात्र मग तुझे आमचे नाते विसरून आम्हीच त्याला शिक्षा करू २ तुला या तुझ्या मुलाचे भारी कौतुक वाटते व त्यालाही ते मोठे गोड वाटते तू हसतेस काय ग? तुला काय वेडबीड लागले की काय ? आम्ही आपल्या तुझ्या मोठेपणामुळे याच्याकडे दुलक्ष करतो, पण या तुझ्या मुलाने आमच्या मुलींना नादी लाविले आहे भाडखोर बाई, तुला काय सांगू ? आम्हाला भारीच लाज आता याच्यामुळे वाटू लागली आहे ३ त्यावेळी जवळच श्रीकृष्ण म्लान मुख करून मान खाली घालून उभा होता त्यावर यशोदा माता म्हणाली, 'त्याला १ वरी २ कोडें