भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 223, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 223

सार्थ तुकारामगाथा १८९ बाना इकडे, आपण त्याला काही शिकवू किंवा शिक्षा करू. घरी दारी सर्वत्र भारी त्रास देऊन त्याने सर्वांना कंटाळा आणला आहे, घरीसुद्धा ताक घुसळताना हा एकदम येतो व लोणी खाऊन जातो' ४ मग सर्वजणींनी मिळून एक दावे आणले व ते कृष्णाच्या गळ्यात घालून त्याला उखळीशी चांगले बांधून टाकले. तसा तो तेथे उभाच राहिला मग त्या श्रीकृष्णास म्हणाल्या, आता बरा सापडलास; आता करशील का चोरी ? असे म्हणून त्या एकमेकीकडे पाहून, डोळे मिचकावून हासू लागल्या ५ शेवटी त्या गोळणी आपआपल्या घरी गेल्यावर त्या उखळासहित श्रीकृष्ण चालू लागला दारातच शापाने दग्ध झालेले नलकूबर व मणिग्रीव या नावाचे दोन वृक्ष होते त्याच्या मादीत तो अडकला. थोडा जोर करताच कडाडून आवाज झाला वृक्ष मोडून गेले. आवाज ऐकून यशोदेस दम निघेना, ती त्वरेने बाहेर आली तिने धावत येऊन तुकोयाच्या स्वामीस आलिंगन दिले. ६ विवरण - या मागचे व पुढचे काही अभंग गोळणींच्या स्वरूपाचे आहेत श्रीकृष्णाने बालपणी गोकुळात ज्या खोड्या केल्या त्याचे अतीव मनोहर वर्णन मराठी संतानी अभंगातून केलेले आहे श्रीकृष्णाच्या खोड्या विविध प्रकारच्या असत दही, दूध, लोणी चोरून खाणे, नदीवर गौळणींची थट्टा करणे, सासूसुनात भांडणे लावणे, नवरा- बायकोत भेद निर्माण करणे अशा त्याच्या खोडपानी गोकुळात व गोपगोपींना त्रास निर्माण झाला होता परंतु हा त्रास कौतुकाचा होता श्रीकृष्णाचे सौंदर्य, त्याचे माहव रूप, त्याच्या लडिवाळ लीला, त्याचे लाघव, त्याची हसरी मुद्रा याचा लोभ सर्वांनाच असे त्याच्यावरील गोपींचा व यशोदेचा रागही लटकराच असे गोपी नाना प्रकारची गाऱ्हाणी यशोदा मातेकडे आणीत असत मग यशोदा त्याची समजूत काढीत असे कधी त्यानाच दोष देई, तर कधी आपल्याच मुलान दोष देई या कृष्णलीलावर मराठी संतांच्या गौळणी भक्तिरसानी आर्द्र झालेल्या आहेत श्रीकृष्णबाललीलाचे कौतुक त्यानी विविध प्रकारानी वर्णन केले आहे 'रांगत रांगणों चोरितु लोणी । धावोनि धरिती गोळभी', 'त्वचेचिया राना धाडू नको मना', 'काय सांगू तूतें बाई, काय सांगू तूतें' इत्यादी ज्ञानेश्वराच्या गोळणी प्रसिद्ध आहेत 'परब्रह्म निष्काम तो हा गवळिया घरीं । पाष्या बाळे अडु कृष्ण नवनीत चोरी', 'तळवे तळहात टेकीत । डाव्या गुडघ्यानें रांगत', 'बाळ सगुण गुणाचे तान्हें ग । बाळ दिसते गोजिरवाणें', 'कान्हू थबाल ले थबाल आपुल्या गाई' इत्यादी नामदेवाच्या गोड गोळणीनी उभ्या महाराष्ट्रातील भाविकाना कित्येक शतक गुग करून सोडले आहे श्रीकृष्ण भारी खोड्या करतो म्हणून तक्रार करणाऱ्या गोपी एखाद्या दिवशी श्रीकृष्ण आला नाही तर का नाही आला, म्हणूनही तक्रार करण्यात तयार असत एकनाथांनी तर या गोकुळच्या गोपींच्या गाऱ्हाण्यावर अनेक गोड गौळणी लिहून मोठी बहार केली आहे 'गौळणी सांगती गाऱ्हाणी । रात्रीं आले चक्रपाणी,' 'भिंगाचे भिंगुले खांद्यावर बागूले । नाचत तान्हुले यशोदेचे', 'कशी जाऊ बृन्दावना । मुरली वाजवि कान्हा', 'माझा कृष्ण देखिला काय । कोणी तरी सांगा गे', 'आह्या पाच गौळणी पाच रगाचे शुगार दारूनी' यासारख्या गोळणीतून नाथांनी श्रीकृष्णाचे सारे लाघव प्रतिमत उभे केले आहे या गौळणीच्या अभंगातून मुख्यत श्रीकृष्णाच्या बाललीलांचे किंवा खोडपाचे वर्णन असले तरी त्या निमित्ताने सुदरसा बोधही फार थोर दर्जाचा मधून मधून मिळतो या अभंगात सर्व गोळणींनी यशोदेपाशी तक्रार केल्यावर सर्वानी मिळून श्रीकृष्णास उखळाशी बांधण्याचा उल्लेख आहे या उखळासहितच श्रीकृष्ण भग अंगणात आला अगणात अर्जुन या नावाने दोन वृक्ष होते. ऐश्वर्य- मदाने उन्मत्त झालेल्या या दोन कुबेरपुत्राची कथा भागवतात आहे नारदाच्या शापामुळे हे वृक्षरूप पावलेले दोन कुबेरपुत्र नलकूबर व मणिग्रीव या दोघाचा उद्धार श्रीकृष्णाने यावेळळी केला या कुबेरपुत्रानी श्रीकृष्णाची प्रेमान स्तुती केली व श्रीकृष्णाने त्या उभताना अभयदान दिले. ३८९ गोरस घेउनी सातें निघाल्या गौळणी । तव ती कृष्णाची करणी काय करी तेथें । झाला पानसरा मिठी घातली पदरा । आधीं दान माझें सारा मग चाला पयें ॥ १ ॥