सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 224, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसर¹ जाऊं दे परता । मुळीं भेटलासी आतां । नाट लागलें संचिता । फेपा खुंटलिया ॥ २ ॥ आसुडी पदरा धरी आणीक दुसरा । येरी झोंबतील करा काय वेडा होसी । आलों गेलों बहु वेळां नेणो गोरा कीं सांवळा । सर परता गोवळा काय बोलतोसी² ॥ ३ ॥ आम्ही येथें अधिकारी मागें केली तुम्ही चोरी । आतां कळलियावरी मागें केलें त्याचें । बोलिल्या हांसुनी आम्ही सासुरवासिनी । कां रे झोंबसी दुरुनी करी मात कांहीं ॥ ४ ॥ यांयां परनारी फांसा धरसी पदरीं । तयां कळलिया उरी तुज मज नाहीं । जडला जिव्हारीं फांको नेदी तया नारी । जेथें वर्म तें घरी जाऊं पाहे तियेंचें ॥ ५ ॥ तया हातीं सांपडल्या हातों पाटीं चुकाविल्या । कृष्णमिळणीं मिळाल्या त्याही न फिरती । तुका म्हणे संती यांयां न धरावी चित्तीं । होते तुमच्या संचितीं बोडवलें आजि ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - सांतें-बाजाराम, पानसरा-आडवा, समोर, नाट-धक्का, परता-दूर, संती-चिंता. अर्थ :- सर्व गोळणी दही दूध डोक्यावर घेऊन बाजारास निघाल्या. त्यावेळी श्रीकृष्ण तिथे काय करू लागला ? तो त्यांच्या समोर आला व त्याने त्याच्या पदरास धरिले व म्हटले, आधी माझे दान द्या. मला दूध लोणी द्या व मग जा आपल्या मार्गाने. १ मग त्या म्हणाल्या, 'दूर हो, आम्हाला जाऊ दे मला त्याच वेळी तू भेटलास व आमच्या संचित फर्माला तू धक्का लावलास. आमच्या जन्ममरणाचे फेरे यामुळे चुकले २ यावर श्रीकृष्णाने लागली दुसरीचा पदर धरून तिलाही हासडले. त्यावेळी आणखी इतर गोळणी त्याच्या हाताला झोंबून बोलू लागल्या, 'अरे काय वेडा की काय तू ? आम्ही किती तरी वेळा या मार्गाने आलो व गेलो, पण तू गोरा की काळा हे देखील आम्हांस समजले नाही. गाईराख्या, चल दूर हो पाहू आधी उगाच काय भलतेच बोलतोस ?' ३ त्यावर श्रीकृष्ण त्यांना म्हणाला, 'मी या ठिकाणचा अधिकारीच आहे यापूर्वी तुम्हीच लबाडी करून अपराध केला आहे आता मला सर्व कळले आहे.' त्यावेळी सर्व गोळणी त्याला हसून म्हणाल्या, 'अरे कृष्णा, आम्ही तर सासुरवासिनी गरीब गोळणी आहोत, काही तरी खोडी काढून तू आमच्या अंगाला का रे झोंबतोस ? काय बोलायचे असेल तर ते दुरून बोल ना. ४ विनाकारण दुसऱ्याच्या स्त्रियांच्या पदरांस का धरतोस? ही तुझी करणी आमच्या घरच्या माणसांना माहीत झाली तर मात्र तुझ्याआमच्यात काही खरे सबंध राहणार नाहीत.' असे त्या गोळणी म्हणत आहेत तो त्याच्या हृदयात श्रीकृष्ण स्वतःच प्रकट झाला व त्यायोगे त्यांना दूर कुठे जाता येईना. त्याचे जे वर्म तेच त्याने धरून ठेविले त्यांच्या चित्तात तो दृढ झाला. ५ अशा प्रकारे बाजारात जात असताना त्या गोळणी त्याच्या हाती सापडल्या व त्यामुळे जन्माला येण्याजाण्याची यातायात चुकविली. श्रीकृष्ण स्वरूपाशी त्या मिळाल्या त्या काही परत लोकीक वृत्तीवर आल्या नाहीत तुकाराम महाराज म्हणतात, चित्तात व्यर्थ चिंता बाळगू नये तुमच्या प्रारब्धात असेल तसेच घडेल. ६ ३९० हरी तुझी कांति रे सांवळी । मी रे गोरी चांपेकळी । तुझ्या दर्शनें³ होइन काळी । मग हें वाळी जग मज ॥ १ ॥ उगला राहें न करीं चाळा । तुज किती सांगो रे गोवळा । तुझा खडबड कावळा । अरे नंदबाळा आलगटा ॥ २ ॥ तुझिये अंगीं घुरट घाणी । बहु खासी दूध तुप लोणी । घरिचें बाहेरील आणोनी । मी रे चादणी सुकुमार ॥ ३ ॥ मज ते हांसतील जन । धिःकारिती मज देखोन । अंगीं तुझें देखोनि लक्षण । मग विटंबणा होईल रे ॥ ४ ॥ १ सर जाउ दे रे तर जाऊ दे परता २ वेडा होसी ३ स्पर्शों.