सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 225, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा १९१ तुज लाज भय शंका नाहीं । मज तंव सज्जन पिशुन व्याही । आणीक मात बोलूं कांहीं । फसी भीड नाहीं तुज माझी ॥ ५ ॥ वचन मोडी नेदी हात । कळलें न साहेची मात । तुकयास्वामी गोपीनाथ । जीवन्मुक्त करूनि भोगी ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- टाळो-टावतीस, उगला-उगाच, सडसड-खरखरीत, बावळा-धोंगडी, आलगटा- छांदिष्टा, घुरट-उग्र, पिशुन-दुष्ट. अर्थ :- अरे श्रीकृष्णा, तुझा रग सावळा आहे, आणि मी तर चाफेकळीप्रमाणे गोरीपान आहे. तुझ्या दर्शनाने मी काळी होईन ना ! मग हे सर्व लोक मला टापतील रे. १ अरे उगाच राहा ना चाळा करू नकोस, तुला किती सांगावे रे ? अरे छदिष्टा, नंदकुमारा, तुला किती सांगावे रे? २ तू फार दूध तूप लोणी खातोस म्हणून तुझ्या अंगास उग्र वास येत आहे. लोकांच्या घरचे दूध लोणी बाहेर आणून तू खातोस आणि मी तर नाजूक धादणीच आहे ३ ते लोक मला हसतील, मला पाहून माझा धिक्कार करतील. तुझ्या दर्शनाने माझे काळे झालेले अंग पाहून ते माझी पुरतीच विटंबना करतील रे. ४ तुला माझी लाज भय शंका लोकांची चाड दिसत नाही. मला मात्र सज्जन व काही दुष्ट सोयरे धापरे व व्याही आहेत. आणखी किती हकीकत तुला सांगू रे ? तुला कशी भीड वा मर्यादा वाटत नाही ? ५ तुकाराम महाराज म्हणतात, हा माझा स्वामी श्रीकृष्ण गोपींना दिलेले वचन मोडतो. हातावर हात देत नाही त्याला त्यांनी सांगितलेली कुठलीच गोष्ट पटत नाही, सहन होत नाही. तो त्यांना भोग देऊन जीवन्मुक्ती देतो ६ ३९१ सात पांच गौळणी आलिया मिळोनी यशोदे गार्हाणें देती कैसें । काय व्यालीस पोर चोरटें सिरजोर जनावेगळेंची कैसें । दंहि दुध लोणी शिकों नुरेचि कांहीं कवाड जंशाचें तैसें । चाळवूनि नाशिलों कन्याकुमरें आमुच्या सुनांसि लाविलें पिसें गे वाइये ॥ १ ॥ आझुनि तरी यासि सांगें बरव्या परी नाहीं तरी नाहीं उरी जीवेसाटीं ॥ मिळोनि सकळे जणी करूं वाळा सखी तुज मज होईल तुटी गे वाइये ॥ २ ॥ नेणे आपपर लौकिक वेव्हार भलते ठायीं भलतें करी । पाळतुनि घरीं आम्ही नसतां तेथें आपण संचार करी । सोग्या चुंबन देतो आलिंगन लोळे सेजावाजावरी । शिकों कडा फोडी गोसाचे डेरे धरितां न सांपडे करों गे वाइये ॥ ३ ॥ आता याची चाट नाहीं आम्हां भीड सांगतां फोड पुरवूं मनिंचें । रोसिलें बहु दिस नव्हता केला निस म्हणुनि एकुलतें तुमचें ॥ चरण खांधीं जीवें बांधेन सरिता जवे न चले कांहीं याचें । अर्थ प्राण देतां न सोडी सर्वथा भलते हो या जिवाचें गे वाइये ॥ ४ ॥ घेउनी जननी हातीं चक्रपाणी देतिसे गौळणी वेळोवेळां । निष्ठुर वाद झणीं बोलाल सकळा क्षोभ जाईल माझ्या बाळा । जेंयें लागे हात वाढते नवनीत अमृताच्या कल्लोळा । देखोनि तुक्यास्वामी देश देहभाव विसरल्या सकळा गे वाइये ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :-कवाड-दार, विसे-वेड, वाळा-नाग, सोग्या-सोब्यास, निस-निवाडा, कल्लोळ-पूर अर्थ :- गोकुळातील पाच सात गोळणी मिळून कृष्णाने केलेल्या खोडयाबद्दल यशोदामातेजवळ गाऱ्हाणी सांगण्यासाठी जमा झाल्या व म्हणू लागल्या, 'काय या चोरट्या पोरास जन्म दिलास ग. मोठे शिरजोर असून मुलखा-