भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 226, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 226

वेगळेच आहे हे पोर तुझे आमच्या घरी शिंयावरचे दही, दूध, लोणी शिंयावर उरतच नाही कुठून येतो हा तुझा पोर? कारण दार पाहिले तर ते जसेच्या तसे लावलेले असते या तुझ्या मुलाने आमच्या मुलांमुलींना नादावून सोडले आणि आमच्या सुनांना वेड लाविले ना मा कृष्णाने १ तू अजून तरी याला नीट समजावून सांग ना या गोष्टी बऱ्या नाहीत असे याला बजाव नाही तर आम्ही आमच्या जियाची सुद्धा परवा करणार नाही आम्ही सर्वजणी मग मिळून आमचा नाश करून घेऊ मग मात्र तुमच्या आमच्यान अंतर निर्माण होईल २ हा तुझा पोरगा आपले परके असा लौकि- कातील काही भेदच ठेवीत नाही भलत्याच गोष्टी करीत असतो हा पाळत ठेऊन हा आम्ही घरी नाही असे पाहून हा आमच्या घरात शिरतो व आमच्या सुनांचे त्याच्या सोऱ्यास धरून चुंबन घेतो, आलिंगन देतो व त्याच्या बाजवर देखील लोळत राहतो हा तुझा मुलगा हा आमच्या दह्यादुधाचे घट कडाकडा फोडून टाकतो, यशोदाबाई याला धरू पाहावे तर हा हातात सुद्धा लागत नाही ३ आता मात्र याची भीडमुवत आम्ही काही ठेवणार नाही तो आमच्या हातात लागला तर मग आमच्या मनात येईल ते आम्ही करू आम्ही खूप दिवस याचा त्रास सोसला तुझे हे एकुलते एक पोर म्हणून आम्ही आतापर्यंत याच्या खोड्यांकडे दुर्लक्ष केले निवाडा केला नव्हता पण आता तो हातात सापडला म्हणजे आम्ही त्याचे पाय जवळच्या खांबास बांधून टाकू मग काही त्याचे चालणार नाही मग याने द्रव्य दिले प्राण दिला तरी आम्ही काही याला सोडणार नाही, मग जियाचे काय वाटेल ते होवो यशोदाबाई ! ४ तेव्हा यशोदा मातेने श्रीकृष्णाला धरून गोळणींच्या हाती दिले व म्हटले, 'हा पाहा माझा मुलगा तुम्ही सर्व निष्ठुर- पणे या माझ्या बाळात बोलाल व तुमचा हा क्षोम त्याला बाधेल मात्र याची गुणवत्ता अशी आहे की याचा हात जिथे लागेल तिथे दूधलोण्याचाच काय पण अमृताचाही पूर लोटतो' तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या स्वामीस पाहून मग त्या गौळणी देशास व स्वतःच्या देहभानास विसरून गेल्या ५

३९२ विरहतापें फुदे छंद करित जाली । हा गे तो गे सावधान सवेचि दुश्चितीं । न सामाळुनि अंग लोटी पाहे भोवतीं । वेगळीच पडो पाहे कुळाहुनिया ती ॥ १ ॥ खुंटलीसी झाली येथें अवघियाची गती । आपुलीं परावीं कोण नेंणे भोवती । त्याची' नांवें बोमे अहो अहो थोपती । नवलच हा येरां वाटोमिया हासती ॥ २ ॥ बाहेरीच धांवे रान। न धरीच घर । न कळे बघना जाला तेणे संचार । विसरोनि गेली सासुरे कीं माहेर । एका अवलोकी एका पडिला विसर ॥ ३ ॥ तुका म्हणे तुम्ही अवघ्या राहा निश्चळा । न ये आता येऊ येथें सर्वया बळा । त्याचा त्याच्या मुखें अवघाची निर्याळा । बहुता मते तर्कवाद निराळा ॥ ४ ॥

शब्दार्थ व टीपा - कुदे-हृदया दई, बोमे-हाका मारो, निश्चळ-स्तभ्य अर्थ - एक गोपी या श्रीकृष्णाच्या विरहतापाने हुदयो देत देत नानाप्रकारचे शब्द बरळत आहे ती म्हणते 'अग हा पाहा हरी तो पाहा हरी' मग लागलीच सावध होऊन उदास बनते ही मग तिला धीर निघत नाही ती पडून राहते सभोवती पाहते आपल्या जातिकुळातून तो वेगळीच झालेली असते १ तिला सावध करण्याविषयी सर्वांचे प्रयत्न संपले ती सभोवतीच्या माणसांनाही थापकी की दुसऱ्याची अशी ओळखीनाशी झाली फक्त श्रीकृष्णा श्रीकृष्णा, अशा हाका मात्र ती मारू लागली तेव्हा भोवतीच्या इतर गोळणींना नवल वाटून त्या हसू लागल्या २ ती गोपी घरात न राहता बाहेर रानावनातच धावू लागली तिला भगवद्भक्तीमुळे कुठलेच बंधन उरले नाही सासरमाहेर याचा तिला विसर पडला केवळ श्रीहरीलाच ती पाहात असल्यामुळे इतराचा तिला विसर पडला ३ तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही सर्व गोळणी आता स्तब्ध राहा आता येथे कुणी कसलीही बळजबरी करू नये ज्याच्या त्याच्या मुखाने येथे निर्णय झालेला आहे बहुमतनि व तर्कवादानेच येथे निर्णय ठरलेला आहे आता उगाच आपली वाद नको ४

१ त्याच्या नावे वो बोमे बोमे भावो श्रीपनी