सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 261, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा २२७ सब ज्वानी निकल जाये । पीछे गधडा मटी खावे । गांवढाळ सो क्या लेवे । हगवनि भरी नहि धोवे ॥ ५ ॥ मेरी दारु जिन्हें खाया । दिवार दरगां सो हि पाया । तल्हे मुंडी घाल जाये । बिगारी सोवे क्या लेवे ॥ ६ ॥ बजारका बुझे भाव । वो हि पुसता आवे ठाव । फुकट बाटु कहे तुका । लेवे सोहि लें हिसका ॥ ७ ॥ शब्दार्थ व टीपा :- दारू-औषध, खुमासी-विषाद, रस-औषध, मटो-माती, दिदार-दर्शन अर्थ -- देवच देणारा अगर दुसऱ्यांकडून देवविणारा आहे. तो देवच औषध आहे. तोच औषध देणारा आहे. अल्लाशिवाय, देवाशिवाय दुसरे कोण आहे? तो करील तेच होईल. १ जो कोणी मर्द आहे तोच हे औषध नामरूपाचे घ्यायला तयार होईल. नामर्द हे काम करण्याचे धैर्य कसा दाखवील ? तुम्ही आपल्या मनाला प्रसन्न करून घ्यावे. तीन दमड्यांची काय बिसाद आहे ? २ सर्व औषधी सोडून द्याव्यात व एक भगवद्भजनाची गोळी मात्र घ्यावी. तोच सारभूत अशी आहे. विश्वास ठेवून या गोळीचे सेवन थोडे का होईना पण करावे. ३ ज्यांच्या- पाशी नीती झोपलेली आहे तेच पुरे पुरे म्हणून रडतात, त्यांच्या सप्तधातूत्मक व पंचभूतात्मक शरीरावर भार करून जिकणारी अशी ही भजनगोळी असल्यामुळे तिचा भवरोगावर उतार पडतो. ती पुन पुन. ते घेतात. ४ हे बादवी, सर्व तारुण्य संपल्यावर मग मातीच खावी लागेल तुला जे मूर्ख व खेडवळ आहेत ते काय माझी ही भजनगोळी घेऊ शकतील ? कारण त्यांच्या हगवणीचे कपडे त्यांच्याकडून धुतले जाईनात. ५ पण माझी भजनगोळी ज्याने घेतली आहे त्याने आत्मरूपाचे दर्शन घेतले; पण खाली मुंडी घालणारा तो बिगार-कामकरी काय तिचे महत्त्व जाणणार ? ६ तुकाराम महाराज म्हणतात, बाजारभाव विचारूनच तुम्ही माझी ही भजनगोळी घ्यावी. मी त्यांना फुकट वाटून टाकीन. जे कुणी सज्जन असतील ते ही भजनगोळी घेऊन सुखी होतील ७ विवरण - तुकोबांच्या या किरकोळ लोकरंजनात्मक अभंगाची भाषा फारसी-उर्दू मिश्रित अशी आहे मलंग, दरवेशी, मुढा, भजनगोळी देणारा वैदू याची भाषा अशी चमत्कारिक आहे. याचा अर्थ हा की त्यावेळी मुसलमानी राज्याच्या संबंधाने एकंदर हिंदुसमाजातही स्थित्यंतर होत होते देवधर्म, चालीरीती, समजुती यातील संघर्ष हा एक अभ्यासाचा विषय आहे मुसलमानी फकीर व मलंग यांचा संबंध हिंदुसंस्कृतीशी अनेक प्रसंगी येत राहिला लोक- जीवनात स्थिर होऊन राहिलेल्या या लोकांची ही तुकोबाकृत शब्दचित्रे होत गोंधळ - अभंग ३ ४४५ राजस सुंदर बाळा । पाहों आलिया सकळा वो । बिंबीं बिंबोनि ठेली । माझी परब्रह्म वेल्हाळा वो । कोटि रविशशि माझी । परब्रह्म वेल्हाळा वो ॥ १ ॥ राजस विठाबाई । माझें ध्यान तुझे पायीं वो । त्यजुनियां चोधींसी । लावी आपुलिये सोई वो ॥ २ ॥ सुकुमार साजिरी । कैसीं पाऊलें गोजिरीं वो । कंठीं तुळसीमाळा । उभी भीवरेच्या तिरीं वो । दंत हिरया ज्योति । शंखचक्र मिरवे करीं वो ॥ ३ ॥ निर्गुण निराकार । वेदां न कळेचि आकार वो । शेषादिक श्रमले । श्रुती न कळे तुझा पार वो । उमारोनि बाहे । भक्तां देत अभयकर वो ॥ ४ ॥