सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 29, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ३ वैशिष्ट्य मानावे लागेल इतर सर्वच स्वर्गासाठी, मोक्षासाठी बद्धहास असताना मराठी साधुसंत मात्र त्याकडे पाठ फिरवून आहेत श्रीविठ्ठलाची मुखशोभा पाहावयास मिळावी म्हणून व संतसंगतीची माधुरी अनुभवास यावी म्हणून अनेक जन्मांची येजा सुद्धा ते पसंत करतील 'मोक्षपदें तुच्छ केलीं या कारणे,' 'मोक्षा एवढें सुख । सुख नव्हेंचि तें दुख,' 'सांडूनि सुखाचा वाटा। मुक्ति मागे तो करंटा,' 'मोक्ष तुमचा ठेवा। तुम्ही दुर्लभ तो देवा' इत्यादी चरणांतून तुकारामबुवांनी ब्रह्मपद वा मुक्तिपद आम्हास काय कामाचे असाच भाव व्यक्त केला आहे ब्रह्मादिकांची प्राप्ती म्हणजे शेवटी दुःखच परिणामीम येणार असा भावार्थ पुण्याचा साठा संपल्यावर परत मृत्युलोकी जर यावे लागत असेल तर त्या स्वर्गसुखाची, मुक्तिसुखाची, ब्रह्मपदाची काय किंमत ? २ सुंदर तें ध्यान उभें विटेवरी । कर कटावरी ठेवोनिया ॥ १ ॥ तुळसीहार¹ गळा कासे पीतांबर । आवडे निरंतर² तेंचि रूप ॥ २ ॥ मकरकुंडलें तळपतीं श्रवणीं । कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥ ३ ॥ तुका म्हणे माझें हेंचि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीने ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - ध्यान-उभे राहण्याची ऐट, कर-हात, कटावरी-कमरेवर, तुळसीहार-तुळशीच्या मंजिऱ्यांचा हार, गळां-गळ्यात, कासे-कमरेला, पीतांबर-पिवळया रंगाचे रेशमी वस्त्र, मकरकुंडलें-माशाच्या आकाराची कुंडले, तळपती-चमकतात, श्रवणीं-कानात, कंठीं-गळ्यात, कौस्तुभमणि-श्रीविष्णूने कंठावर धारण केलेल्या रत्नाचे नाव, विराजित-शोभत आहे श्रीमुख-श्रीविठ्ठलाचे सुंदर मुख, आवडीनें-भक्तीने, प्रीतीने अर्थ - विठ्ठलाचे सुंदर रूप विटेवर उभे आहे, त्याने कमरेवर हात ठेविले आहेत १ त्याच्या गळ्यात तुळशीचा हार असून कमरेभोवती जरेचा पीतांबर त्याने नेसला आहे असे हे श्रीविठ्ठलाचे रूपच मला नेहमी आवडते २ त्याच्या कानात मत्स्याच्या आकाराची कुंडले चमकत आहेत आणि गळ्यात कौस्तुभमणी शोभत आहे ३. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठलाचे हे सगुण सुंदर रूप हेच माझे सर्वसुख आहे याच मुखाकडे मी मोठ्या प्रीतीने पाहात राहीन याच्या एकसारख्या दर्शनात माझे सर्वसुख आहे ४ विवरण - तुकारामबुवांचा हा अतिशय प्रसिद्ध असा अभंग असून वारकरी संप्रदायाच्या भजनाच्या सुरु- वातीसच हा अभंग नेहमी आपले आराध्य दैवत जे श्रीविठ्ठल त्याचे अतीव सुंदर, मनोहर व सुखकारक स्वरूप यात मोठ्या कोमलतेने बुवांनी वर्णन केले आहे श्रीविठ्ठलाच्या मूर्तीचे असेच बहारदार वर्णन स्वतः तुकारामबुवांनी व इतर अनेक संतांनी अगदी मनापासून पून पून केले आहे विठ्ठलरूपाचे वर्णन करणे, चिंतन करणे हाच एक सुखाचा ठेवा त्यांना वाटत असे श्रीविठ्ठलाचे ध्यान सुंदर आहे, ते विटेवर उभे आहे, त्याचे हात कमरेवर आहेत, त्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, तो पीतांबरधारी आहे, त्याच्या कानात मकरकुंडले चमकत आहेत, कंठावर कौस्तुभ- मणी शोभत आहे या सर्व वर्णनात श्रीविठ्ठलाचे रूप सामावलेले आहे श्रीविठ्ठल हा विष्णूचा अवतार असल्याच्या खुणा या अभंगात सहज सापडण्यासारख्या आहेत पीतांबर, तुळशीचा हार, मकरकुंडले, कौस्तुभमणी या वस्तू श्रीविष्णूलाही अती प्रिय असल्याचे आपणास माहित आहेच विष्णूचे व तुळशीचे सानिध्यही पुराणातून अनेक ठिकाणी वर्णन केले आहे वृन्दा ही जालंधराची पत्नी जालंधराने आपली सत्ता सर्वत्र पसरविण्यास आरंभ केला त्याची पत्नी वृन्दा ही थोर पतिव्रता असल्याने त्याचा पराभव अशक्य होऊन बसला विष्णूने तिचे कपटवेषाने पातिव्रत्य हरण केले वृन्देस याचे परम दुःख झाले तिने तुझ्याही भार्येचे हरण होईल अशी वाणी उच्चारून अग्नीमध्ये प्रवेश केला शाप्या प्रकाराने श्रीविष्णूचे मन अतिशय अस्वस्थ झाले तेव्हा त्यास शांत करण्यासाठी वृन्दामधून अग्निप्रवेशस्थली गौरी, लक्ष्मी व स्वधा यांच्या अंशांनी आवळी, तुळशी व मालती अशा वनस्पती निर्माण झाल्या, तेव्हा विष्णूचे मन स्थिर झाले श्रीविष्णूचा हा तुळशीशी संबंध, श्रीकृष्ण- यवतारातील वृंदावनलीला, कृष्ण व तुळस यांचा विवाह यातील रहस्य आता समजण्यासारखे आहे श्रीविष्णूच, कृष्णच, म्हणजेच पर्यायाने विठ्ठलाला तुळशीची माळ यासाठी प्रिय आहे आपल्या पुराणग्रंथातून तुळशीमाहात्म्यही १ गळा तुळसीहार २ आवडे निरंतर हेंचि ध्यान